कंदील मुक्याने जळतो

Submitted by द्वैत on 4 August, 2020 - 10:07

कंदील मुक्याने जळतो

कंदील मुक्याने जळतो
जा खुशाल तो ही विझवून
मी स्वप्न उषेचे बघतो
गर्भात तमाच्या राहून

दे शाप मला भोगाया
दे पीडा गतजन्मीची
मी कविता सांधेन त्यातून
तुटलेल्या अवशेषांची

जाळून जरी मी उरलो
मातीत गाडूनी टाका
धरतील तरी धरणारे
माझ्या गीतांवर ठेका

भेदून तुझी तटबंदी
तोडून पहारे सारे
हे सूर व्यापतील माझे
गगनातील स्वप्नील तारे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा
दे शाप मला भोगाया दे पीडा गतजन्मीची
मी कविता सांधेन त्यातून तुटलेल्या अवशेषांची>>>> अप्रतिम