नवे शब्द

Submitted by नितीनचंद्र on 2 August, 2020 - 11:21

काय करतो आहेस ? बायकोने विचारले.

नेटतोय मी एका शब्दात उत्तर दिले.

बायको ला काही समजले नाही. तिचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून मी इंटरनेट वर काहीतरी करतोय अस सांगीतल. हा काळ २००९ ते २०११ जेव्हा हाॕल मधे बसुन लॕन केबल लॕप टाॕपला जोडून नेटायचा जमाना होता.

ववी, पुलेशु, धन्स असे एका मागुन एक बाॕऊन्सर पडायला लागल्यावर बायकोने ही डिक्शनरी कुठली याची चौकशी केली.

मायबोलीवर मी पडीक असायचो हे बायकोला फारसे रूचत नव्हते.

त्यात विबासं ह्या शब्दाची भर पडली. कुणाचा तरी मला वि करून पहायच आहे हा विनोदी लेख वाचुन इकडे विबास सर्रास होते की काय असा तीचा समज झाला.

त्यामुळे मी ववि ला जाऊ नये असा रोडा तिने घातला. हा आॕगस्ट २०२० मधला मायबोलीबाह्य शब्द आहे.

तुकडे तुकडे गॕग, लिब्राडो तसा रोडा गॕग हा शब्द बहुदा झी न्युज ची निर्मीती आहे.

लहानपणी मी रहात असलेल्या गल्लीत असे अनेक शब्द निर्माण व्हायचे पण त्याचा प्रसार गल्ली पुरता असायचा.पण सोशल मिडीया, टॕग मुळे अश्या शब्दांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि जनाधार मिळत आहे.

या शब्दांमुळे विनोद ही निर्मीती होते. अगदी हाहाहाहा नसला तरी गालात हसावे इतपत विनोद निर्मिती करण्याचे सामर्थ्य ह्या शब्दात आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users