बाटलीतलं झाड -भाग 3 (Growing edibles)

Submitted by अक्षता08 on 2 August, 2020 - 00:19

एखाद्या बाल्कनीमध्ये किंवा ग्रील मध्ये किचन गार्डन सुरू करणं म्हणजे थोड फार अवघड काम आहे कारण एकमेव "लिमिटेड स्पेस" (नाममात्र जागा). त्यामुळे horizontal space म्हणजेच आडवी जागा संपल्यावर पर्याय उरतो तो vertical space चा (उभी जागा) पुरेपूर वापर करण्याचा. आणि त्यात टाकाऊ बाटल्या ह्या खूप सहकार्य करतात. ज्या भाज्यांची मुळं खोलवर जात नाहीत त्यांच्यासाठी आडव्या बाटल्यांचा उपयोग करू शकतो (बाटलीचा रुंद भाग surface area म्हणून वापरला जातो )आणि ज्या भाज्यांची मुळं खोलवर जात असतील त्यांच्यासाठी उभ्या बाटल्यांचा कुंडी म्हणून वापर करू शकतो‌ (बाटलीचा अरूंद भाग हा surface area म्हणून वापरला जातो).
सगळ्या पालेभाज्या , गव्हांकुर, पूदीना, कोथिंबीर, इतर herbs, lettuce, microgreens, इ. आपण बाटलीत लावू शकतो. Vertical space चा पुरेपूर वापर करण्यासाठी ह्या बाटल्या एखाद्या hook ला अडकवून ग्रिलला लटकवू शकतो. ह्याचे दोन फायदे आहेत भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि मातीमध्ये aeration चांगले टिकून राहते. फक्त बिया फार जवळ लावल्यास पानांचा आकार लहान होतो.

किचन गार्डन ज्यांना सुरू करायच आहे किंवा फक्त try करून बघायच आहे किंवा ज्यांना कुंड्या विकत आणण्यावर जास्त खर्च करायचा नाही आहे त्यांच्यासाठी बाटल्यांमध्ये edibles लावणे हा उत्तम पर्याय आहे.

IMG20200728172840.jpgWhatsApp Image.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचे गार्डनिंगचे बोट खूप चांगले आहे.
उभ्या(1.5 लिटर किंवा 1 लिटरच्या) अरुंद तोंड कापलेल्या बाटलीत कोणती कोणती झाडे लावायला सुटेबल असतील?

@किशोर मुंढे
धन्यवाद Happy
हि मस्त कल्पना आहे (गाडीचे जुने टायर देखील वापरता येतात)

mi_anu
धन्यवाद Happy
सगळ्या पालेभाज्या , गव्हांकुर, पूदीना, कोथिंबीर, इतर herbs, lettuce, microgreens, इ. आपण १.५ लीटरच्या बाटलीत लावू शकतो