डुप्लीकेट धागा

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 July, 2020 - 17:20

34 वर्षा नंतर शैक्षणिक धोरणात बदल

सविस्तर बातमी ईथे वाचा

https://www.bbc.com/marathi/india-53578620

हायलाईटस साधारण अश्या

१. दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार आहेत

नवीन ५+३+३+४ आराखडा लागू होणार आहे.

पहिला टप्पा: पूर्व प्राथमिक ते दुसरी - पाच वर्षे
दुसरा टप्पा: तिसरी ते पाचवी- तीन वर्षे
तिसरा टप्पा: सहावी ते आठवी - तीन वर्षे
चौथा टप्पा: नववी ते बारावी- चार वर्षे

म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे !

२. शिक्षण व्यवस्थेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला जाणार आहे. देशातील सर्व पूर्व प्राथमिक शाळांना हा अभ्यासक्रम लागू असेल.

३. पाचवी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण - हे नक्की काय आणि कसे याबाबत मी खूप उत्सुक आहे ! Happy
ईंग्रजीचे महत्व कमी होणे अत्यंत गरजेचे आहे. याकडे आपण पहिले पाऊल टाकले आहे हे फार दिलासादायक आहे.

४. सहावीपासून व्होकेशनल अभ्यासक्रम शिकता येणार आहे. यामध्ये कारपेंटर, लाँड्री, क्राफ्ट अशा विषयासाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करता येईल.
म्हणजेच व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाणार आहे.

५. रिपोर्ट कार्डमध्ये विद्यार्थी, वर्गमित्र आणि शिक्षक यांचाही शेरा असणार आहे. शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थी काय शिकला याचाही उल्लेख करायचा आहे.
एखाद्याची क्षमता जोखायची पद्धतच नाही तर शिक्षणाकडे बघायचा एकूणच दृष्टीकोण बदलतोय. पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडचा विचार जो अगदी बारावीपर्यंत आपण केला नाही तो येणारी पिढी करेल.

६. महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कला आणि विज्ञान या शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. यामध्ये मानवी शिक्षण, विज्ञान, कला, स्पोर्ट्स, वोकेशनल कोर्स असे पर्याय असतील.
थोडक्यात, कला, वाणिज्य आणि शास्त्र असा शाखा निहाय फरक रद्द केला असून एकूण 8 सेमिस्टर चा हा कोर्स असेल ज्यात भाषा, गणित आणि शास्त्र हे विषय बंधनकारक करून इतर कोणतेही विषय आपल्या आवडीनुसार निवडता येतील.

एकूणच फारच आशादायी बदल आहे Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वत:ला हे बदल आशादायक वाटायचे पर्सनल कारण म्हणजे मला चौथी आणि सातवीला स्कॉलरशिप मिळालेली. पुढे आठवीत गणित प्रज्ञा परीक्षेत मुंबईतून पहिला आणि महाराष्ट्रातून मेरीटमध्ये आल्याचे मेडल मिळाले होते.

पण शालेय अभ्यासक्रमातले भाषा विषय न रुचल्याने. ईतिहास भूगोलाचा रट्टा न जमल्याने. दहावीला जेमतेम ७५ टक्के मार्क पडले. त्यात ईंग्लिशमध्ये ४९ !
गंमत म्हणजे बाईंनी शाप दिला होता की तू ईंग्लिशमध्ये ५० च्या पुढे जात नाही Happy
ते असो, त्यांचा राग नाही
पण एकूणच या मार्कलिस्टमधून आलेला न्यूनगण्ड घेऊन पुढे कॉलेजला गेलो आणि बारावीत नापास झालो.
पुढे ईंजिनिअरींगला अभ्यासपद्धती बदलल्याने माझा अगदीच र्हास नाही झाला. पण एकूणच सदोष शिक्षणपद्धतीचा फटका मला बरेच प्रमाणात बसला असे आजही वाटते.

त्यामुळे शिक्षणपद्धती बदलो न बदलो मुलांसाठी आपण पुस्तकी शिक्षणाच्या मार्गाने न जाता त्यांना ज्यात गती आहे तिथेच एंकरेज करायचे हे ठरवलेच होते. आशा करतो शिक्षणपद्धतीत होणारे बदल आता स्वत:च हि काळजी घेतील.

जर धाग्याचे शीर्षक बदलून 'नवीन शैक्षणिक धोरण' असे ठेवलेत तर योग्य ठरेल. चर्चाही विषयाला धरून व्हावी ही अपेक्षा.

नवीन धोरण काळाशी सुसंगत दिसते आहे. फक्त अंतिम परीक्षेतील गुणांवर प्रवेश न ठेवता सर्वागीण प्रगतीवर प्रवेश, व्होकेशनल/प्रॅक्टिकल अनुभवावर भर वगैरे चांगले मुद्दे आहेत. हे राबवले कसे जाणार हा कळीचा मुद्दा आहे.

शेखर गुप्तांनी घेतलेला उत्तम आढावा:

https://youtu.be/i7YnGK2eCtk

धन्यवाद टवणेसर.
माझ्याकडे जी बातमी आली तिचे हे शीर्षक होते.
दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार, केंद्राचे नविन शैक्षणिक धोरण
तेच ठेवलेले कॉपी पेस्ट करून
असो आपण म्हणता तसे बदलतो. सुटसुटीतही होईल. उगाच राज्य आणि केंद्रावरून ईथे वाद नकोत

होमवर्क

डुप्लिकेट धागा रद्द करणेत यावा , या विषयावर एडमिन यांना विचारपूस मध्ये निरोप लिहा.

5 गुण