मायबोली गणेशोत्सव २०२० साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by Admin-team on 23 July, 2020 - 17:22

यंदा गणेशोत्सव २२ ऑगस्ट्ला सुरु होत आहे.

मायबोली गणेशोत्सव २०२० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक मंडळास हार्दिक शुभेच्छा !
दणक्यात साजरा होऊ दे ह्या वर्षीचा गणेशोत्सव.

संयोजक मंडळास शुभेच्छा आणि त्यांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल, आभार.
यावेळेचा गणेशोत्सव कसा साजरा होतो याबद्दल उत्सुकता आहे.

संयोजक मंडळास शुभेच्छा आणि त्यांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल, आभार.
यावेळेचा गणेशोत्सव कसा साजरा होतो याबद्दल उत्सुकता आहे.

संयोजक मंडळ सगळ्यात अगोदर हायझेनबर्ग यांच्याकडून शुभेच्छा घ्या.

Submitted by बोकलत on 29 July, 2020 - 08:50
शुभेच्छा नाही... माफीचा अर्जच द्या आतापासून...

संयोजक मंडळास हार्दिक शुभेच्छा !
दणक्यात साजरा होऊ दे ह्या वर्षीचा गणेशोत्सव.++१११

घाबरवु नका ओ नव्या मंडळीना Wink
----------------------+---------------संयोजनासाठी आणि होवू घातलेल्या स्पर्धा /उपक्रमातील नवीन नवीन संकल्पना / प्रयोग राबवण्याकरिता खुप साऱ्या शुभेच्छा.

<<<संयोजक मंडळ सगळ्यात अगोदर हायझेनबर्ग यांच्याकडून शुभेच्छा घ्या>>>> काहिही, हाब अगदीच चुकीचे नव्हते, गेल्यावेळच्या संयोजनात माझ्या मते तरी त्रुटी होत्या, अर्थात मी संयोजनात कधी भाग घेतला नाही तर मी बोलणे, योग्य की अयोग्य माहीत नाही. तरी हाब यांचा आक्षेप अन त्यांचे प्रश्न रास्त होते, संयोजक मंडळ जर गप्प न बसता, योग्य उत्तरे दिली असती तर तेवढा वाद झाला नसता असे मला वाटते.

असो,

संयोजक मंडळास हार्दिक शुभेच्छा !
दणक्यात साजरा होऊ दे ह्या वर्षीचा गणेशोत्सव.++१११

संयोजक मंडळास खुप खुप शुभेच्छा!!
नेहमीप्रमाणेच नाविन्यपूर्ण उपक्रमांनी सजू देत हा ही गणेशोत्सव.

VB +1
संयोजक मंडळास हार्दिक शुभेच्छा !

एकन्दर परिस्थिति पाहता सामाजिक उपक्रमान्चे आयोजन करु नये असं माझं मत आहे.

नवीन Submitted by jayant_kadam on 7 August, 2020 - 18:13>>>>
का बरं??? कोरोनामुळे बहुतांश लोकं घरातच आहेत. निगेटिव्ह वातावरण झालंय. लहान मुलं ही घरात कंटाळली आहेत. ऑनलाइन उपक्रम आणि स्पर्धा राबवल्या तर पॉझिटिव्ह वातावरण तयार होणार असेल तर का नकोय ते तुम्हाला???

Pages