शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

Submitted by अनिथ on 23 July, 2020 - 01:22

शेतकरी आमचा बाप
कधी राहिल टिपटाप ?

आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||

असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?

मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख,
आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||

पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात,
शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला,
हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात |
त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ||

टिप:
ही माझी पहीलीच कविता आहे जस सुचल तस लिहल चु.भू माफ असु द्या, काही चुका असतिल तर मोठ्या मनाने सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तवदर्शी कविता आहे. शेतकऱ्याची व्यथा ज्यांनी शेतात काम केलयं तेच जाणू शकतात असं मला वाटतं.