डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सायपरमिथ्रिन १० पीपीएम् सोल्युशन स्प्रे करून मरतील

Submitted by अज्ञानी on 26 July, 2020 - 22:09
नेहमीच्या वापरातले फिनाईल टाकून लादी पुसली आहे सध्या तरी..

लाल हिट असेल घरात तर वापरून बघा. असे नाही पण एक अगदी बारीक पण थोडे उडणारे मागे झाले होते, अति सूक्ष्म होते, शूज वगैरे ठेवतो त्या छोट्या लाकडी कपाटात असायचे, जमिनीवर पण दिसायला लागले तेव्हा लक्षात आलं. मी लाल हिट मारलं तिथे प्लस मेन डोअर आसपास, त्यानंतर थोडं थोडं सगळीकडे मारलं hall, बेडरूम, gallery. धुस्कारा होतो थोडा, त्रास होतो लाल हिटचा काळ्या हिट पेक्षा. त्यामुळे फार थोडं मारलं बाकी ठिकाणी. इथे मी desktop समोर बसते त्या स्क्रीन वर पण एखादा यायचा उडून. पण लाल हिटने ते मेले. नंतर दिसत नाहीयेत, तरी मी पंधरा दिवसांनी ते कपाट आणि दरवाजा आसपास मारते हिट.

अंजु थँक्स..
हे अजूनतरी उडताना नाही दिसले थँक गॉड..
गूगल करून पाहिले.. लेमन ज्यूस आणि वॉटर चा स्प्रे किंवा इसेंशीअल ऑइल चा स्प्रे करायचा असे दिसतेय...
लेमन ज्यूस स्प्रे पण ट्राय कारेन

हा फोटो एखाद्या पेस्ट कंट्रोलवाल्याला कायप्पा वर पाठवुन टाईप आणि उपाय विचारा. ते नक्की सांगतील.
घाबरू नका.

मुंग्या खूप येत आहेत सध्या. दिसायला काळ्या दिसतात पण चावणार्‍या आहेत. घरी २ मांजरी असल्याने फार स्ट्राँग वासाचं किम्वा ते चाटतीला आणि अपाय होईल असं काही टाकू शकत नव्हते. गुगल वर बेकिंग सोडा आणि पिठीसाखर टाकायला सांगितलंय. साखरेचा चिकटपणाचा अजून व्याप होईल म्हणून फक्त बेकिंग सोडा टाकलाय. कमी वाटतेय प्रमाण मुंग्या येण्याचे.

बहुतेक ढेकूण असावा असे वाटतेय.मसुरीएव ढा आणि तशाच रंगाचा असतो.मी पहिला नाही ऐकीव वर्णनावरून लिहितेय.
Submitted by देवकी on 26 July, 2020 - 11:58
>>>
ढेकूण न पाहिलेले लोकही आहेत जगात??? मला तुमचा हेवा वाटतो...

Submitted by च्रप्स on 27 July, 2020 - 01:47

>>>

च्रप्स Happy
पण सिरीअसली
देवांनाही ढेकणांनी सोडले नाही म्हणून कोणी कमळात, कोणी हिमालयात तर कोणी समुद्रात शेषनागावर राहतो अश्या आशयाचे एक संस्कृत सुभाषित आहे.

कमले कमला शेते , हरश्शेते हिमालये ।
क्षीराब्धौ च हरिः शेते मन्ये मत्कुण शंकया ।।

तात्पर्य : जर एखाद्या मनुष्याने खरेच ढेकूण पाहिला नसेल तर त्याचा जरूर हेवा करावा Happy

@jui.k
हे गोचीडच आहेत (ticks). पण ते खूप नसतात अगदी मुंग्यांसारखे. थोडेफार असतील. पण मला वाटतं इतकी काळजी करायचं कारण नाही. चिमटीत पकडून / कागदावर घेऊन, साबणाच्या पाण्यात / नुसत्या फिनाईलमध्ये टाका. मरतात.
Online शोधलंत तर यासाठीचे फवारे मिळतील.

ढेकूण न पाहिलेले लोकही आहेत जगात??? मला तुमचा हेवा वाटतो...

Submitted by च्रप्स on 27 July, 2020 - 01:47
>>> मी पण आहे च्रप्स, ढेकूण कदाचित पुण्यात जास्त असावेत असे वाटते, माझा भाऊ जेव्हा पिजी म्हणून होता पुण्याला तेव्हा तो बोलायचा की तिकडे खूप ढेकूण आहेत. जेव्हा तो परत आला ठाण्याला तेव्हा मम्मी ने अक्षरशः त्याचे जवळजवळ सर्व सामान गरम पाण्याने धुतले होते, इकडे ढेकूण नको व्हायला म्हणून.

ढेकूण मी पण फार पुर्वी डोंबिवलीत एकांकडेच बघितलेले, आमच्या शेजारच्या चाळीत. तरी बाकी कोणाकडेही नव्हते झाले. नंतर एकदम तो प्रकार पुण्यात बघितलेला.

त्यामुळे असू शकतील ढेकूण न बघितलेली लोकं. मुंबई आसपास, ठाणे जिल्ह्यात बहुतेक फार होत नाहीत असे ढेकुण, क्वचित कोणाकडे होतात. झुरळं मात्र होतात.

धन्यवाद सगळ्यांना Proud
फिनाईल टाकून लादी पुसली त्यानंतर पाणी+ लेमनग्रास ऑइल+ लिंबाचा रस+ कडुलिंबाच्या रस हे सगळं एकत्र करून स्प्रे केला सगळीकडे.. सगळे एक एक करून बाहेर आले आणि ते झाडूने एकत्र करून टाकून दिले Proud खूप उस्तवार झाली पण केमिकल्स फवारण्यापेक्षा बरे आहे हे..

अरे वा छान उपाय.

ते केमिकलविरहीत रेडीमेड मिळायला हवं Wink , नाहीतर खरंच फार मेहनत आहे त्यात.

अंजु इतकाही त्रास नाही..
lemangrass ऑइल दुकानात मिळत ते 1 पार्ट आणि पाणी 1 पार्ट अस मिक्स वापरलं तरी चालतं.. आम्हाला हे लवकर घालवायचे असल्याने जालीम उपाय केले Proud

lemangrass ऑइल चा वासही चांगला येतो.
माझ्याकडे दर उन्हाळ्यात मुंग्या घरात शिरकाव करतात. तेव्हा रोज रात्री सगळे आवरल्यावर टिश्युपेपर वर lemangrass ऑइलचे काही थेंब घेऊन त्याने ओटा पुसुन घेते. शिवाय कापसाचे बोळे थोडेसे त्यात भिजवून कपाटाच्या कोपर्‍यात, दरवाज्याच्या कोपर्‍यात ठेवते. वास गेला कि परत येतात. मग काही दिवसांत त्यांचे परत परत येणेही बंद होते.

(मूर्ख) मांजर अपडेट
आमच्या सोसायटीत काही जणांच्या प्रीमियम गळ्यात पट्टा वाल्या मांजरी आणि बाकी भटक्या मांजरी आहेत.
भटक्या मांजरी सोसायटीभर फिरून रोज सर्वांच्या दारात शी करतात.(5मांजरी आणि पिले आहेत)बाल्कनीत शी करतात.(माती भरपूर आहे पण त्यात शी करत नाहीत)
कोणत्याही कामवाल्या मावशीना अशी शी धुवायची नसते.ज्यांच्या दारात शी करतात तेच लोक धुतात.
मांजरे मलापण आवडतात.त्यांना हाड म्हणायला मनाला फार घट्ट करावं लागतं.पण हा शी चा उपद्रव सर्वाना खूप होऊ लागला.मग सोसायटीने कमिटी काढली. त्यात या मांजरांना प्रेमाने खाऊ घालणारे त्यांची शी पण साफ करतील असं ठरलं.(सगळाच विनोदी प्रकार. कोण खाऊ घालतं हे बघायला काय मांजरीच्या गळ्यात सीसीटीव्ही बांधणार का)
मग असा प्रस्ताव निघाला की हाऊस किपिंग वाल्यानी साफ करायचं आणि त्यांना याबद्दल जास्त पैसे/बोनस देऊन ते पैसे मांजरीना खाऊ घालणाऱ्या लोकांनी भरायचे.
मग असा प्रस्ताव निघाला की मांजरीना मेडिकली नीट तपासलेलं झोपेचं औषध देऊन मग कारमध्ये घालून फिश असलेल्या एखाद्या ठिकाणी सोडायचं म्हणजे त्यांचे खाण्याचे हाल पण होणार नाहीत.
याला अनिमल क्रुएलटी म्हणून विरोध झाला.
आता काल सगळ्यांकडून 300 रुपये घेतले आहेत.बघू काय मार्ग निघतो.
सध्या मीटिंग चालू असताना ड्राय बाल्कनीत मांजर शी ला बसायच्या पोझ मध्ये दिसली की मी जोरात हाड म्हणून ओरडते.टीम वाल्याना सवय झालीय.
मी स्वतः फिनेल ओतून ठेवते पण तो वास गेला की परत शीसत्र चालू होते.काकडी वगैरे ठेवून झाली.दालचिनी पावडर टाकून झाली.
मला या माऊ फार गोड वाटतात.त्यांना पण कळत असेल माझ्या चेहऱ्यावरून बहुतेक.बरेचदा 'मूर्ख कुठली, तुझ्या बापाचं घर आहे का वगैरे डायलॉगही शेजारून ऐकू येतात.
सगळाच विनोदी प्रकार आहे.बहुतेक शेवटी 'ज्याने त्याने आपल्या दारातली शी पटकन धुवून टाकावी' असा सोपा पर्याय निघेल.

आमच्या सोसायटी तही असे काही प्रकार होतात .
एका विंगमध्ये तळाला राहणार्‍या एक बाई डिक्लेअर्ड प्राणिमित्र आहेत. त्या रोज आपल्या खिडकीखाली मांजरांसाठी खाऊ ठेवतात. बाई फक्त दिवसाच्या इथे राहतात.
त्या खाऊमुळे जायच्या यायच्या वाटेशीच घाण होते. मांजरं त्यांच्या बाजूच्या दोन्ही विंगमधल्या जिन्यांत रात्रीची विव्हळतात. जिन्यात अगदी थेट चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन शीसू करतात.
पहिल्या मजल्यावाल्यांच्या ग्रिलमध्ये जाऊन बसतात. त्यामुळे त्यांना आपल्या खिडक्या उघड्या ठेवता येत नाहीत.

सध्या मीटिंग चालू असताना ड्राय बाल्कनीत मांजर शी ला बसायच्या पोझ मध्ये दिसली की मी जोरात हाड म्हणून ओरडते >> Lol Lol Lol Lol

सध्या मीटिंग चालू असताना ड्राय बाल्कनीत मांजर शी ला बसायच्या पोझ मध्ये दिसली की मी जोरात हाड म्हणून ओरडते.टीम वाल्याना सवय झालीय.>>>>>>>
Rofl Rofl

असाच एक स्वैर पालोलॉग
रात्रीची निरव शांतता. ओटा धुतला.मग मागचं दार लावायला जाताना वरची जाळी दिसली.साध्या झाडूने ही जाळी काढणं अशक्य होतं.ज्याच्या उंचीला हे शक्य होतं तो गनीम आधीच झोपायच्या खोलीत पडून गाड्यांचे व्हिडिओ बघत बसला होता.मग स्टुलावर चढून ही जाळी काढली.आणि चहा केला. एका हातात चहा चा कप..दुसऱ्या हातात शेणाच्या गोवरीचा तुकडा.(खरं तर दुसऱ्या हातात बिस्कीट असायला हवं.पण फेऱ्या वाचवण्यासाठी रात्री हनुवटीच्या गॅप मध्ये पाण्याची बाटली, वाळत घालायचे 2-3 कपडे, एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात अगदी झोपताना जाळायची डासासाठी शेणाची गोवरी.इतक्या वस्तूत बिस्किटाला त्याग करून मागे राहणेच उत्तम होते.पि. सौ. मध्ये एक विशिष्ट 2 महिन्याचा काळ असतो त्यात इतके डास येतात की आम्ही सगळं एकावेळी करतो.कॅटरिना तेल(म्हणजे सिट्रॉनेला) आणि पाणी वाला स्प्रे पायावर मारणे, हाताशी बॅट ठेवणे, धूप कापूर आणि गोवऱ्या जाळून धूर,थोबाड व हाताला ओडोमोस लावणे, भिंतीला गुडनाईट लावणे, पंखा फुल भुर्रर्र वर ठेवणे, आणि स्वतःचे हात व नजर तल्लख ठेवणे.

तर अचानक पालीचा स्प्रे आठवला.याचा वास इतका कमालीचा घाण आहे की माणसं पण पळून जातात.चहा आणि हातातला संसार बाजूला ठेवून फ्रिजमागे, कचरा कपाटात, बाथरूम च्या कोपऱ्यात,खिडकीच्या कोपऱ्यात सगळीकडे स्प्रे मारला.आता त्या घाण वासाच्या आठवणी ठेवत परत कप आणि संसार उचलणार तर सिंक पाशी ओल्या कचऱ्याचा बाउल पूर्ण भरलेला दिसला.संसारातली भांडणं आणि कंपोस्ट साठी घरात ठेवलेला ओला कचरा, दोन्हींवर रात्र उलटू द्यायची नसते.घाण वास येतो.मग दार उघडून कंपोस्ट पाशी गेले आणि तो संसार टाकून नीट झाकण बंद केलं.तितक्यात एक काळी टगी खुनशी पाल बाहेरच्या भिंतीवर होती ती दाराच्या चौकटीवर आली.हिला म्हशीला आत मारलेल्या स्प्रे चा ढिम्म फरक पडला नव्हता.(कदाचित श्वास रोखला असेल तिने.) तिची दिशा पाहता ती आतच आली असती.मी शुक किंवा आरडा ओरडा केला असता तरी आतच आली असती.
आता गाड्यांचे व्हिडीओ बघत पडलेल्या गनिमाला हाका न मारता (पुढे आमच्यात 'मी अजिबात मारणार नाही.तुझी तू हिट मारून पाल मार.लग्न करताना मी सर्व पाली मारायच्या असं आपलं ठरलं नव्हतं' वगैरे प्रेमळ संवाद होतात.) मी शांतपणे चौकटीत 2 उंचावर असलेल्या पालिकडे बघत मनात स्टे, स्टे चा जप करत आत आले आणि तुंबाड मधल्या हस्तर राक्षसाच्या तोंडावर लावावं तसं धाडकन दार आणि ग्रील च दार लागलं आणि सुटकेचा श्वास सोडला.चहा परत गरम करून घ्यावा लागला.पण ते काहीच नाही.रात्रीची किंचाळा किंचाळी, हिट, काठी शोधणे हे सर्व आजच्या पुरतं टळलं होतं.
#स्प्रेभंपकआहे

काही दिवसांपासून रोज रात्री दोन तीन पाली फिरताना दिसताय घरात. मला खूप प्रचंड भीती किळस जे काही वाईट ते सगळं काही आहे त्या पालींच. काहीतरी खात्रीशीर उपाय सुचवा प्लिज. हीट ने मरता का त्या? पण हीट मारण्याएवढी पण हिंमत नाहीये खूप भीती वाटते. मारून टाकणे तर दुरच. शिवाय हाकलून लावली बाहेर तरी परत येतात बहुतेक स्लाईडींग काचांमधे फट असेल. त्यासाठीचे स्प्रे असतील तर सुचवा किंवा इतर काही.

नवीन Submitted by mi_anu on 4 April, 2021 - 12:11 >> Lol
एक हातात कप, एक हातात गोवरी, ,हनुवटीखाली बाटली ... भारीच

आमच्याकडे मुंगळे झालेत आणि मुंग्यासुद्धा

खडू मारता येत नाही जास्त फरशीवर कारण रमाबाई खाली पडलेलं उचलून खातात
जरी पोळी हातात असेल तरी तो तुकडा तीन चार वेळा फरशीवर टाकून मग उचलून खातात

सारखं झाडून घ्यावं लागतं.

हे नांदेडमधलं जमिनीवरचं घर आहे, इथे बाजूला open plot आहे तिथले विविध प्राणी घरात येण्यासाठी प्रयत्न करत असतात तो तर वेगळाच किस्सा आहे.
Flat परवडला खरंच

mi_anu, या वेळेस पि. सौ. मध्ये नेहमीपेक्षा जरा जास्तच डास झाले आहेत. बहुधा रस्त्यांच्या कामांमुळे खड्डे खणले आहेत त्यातील साठलेल्या पाण्यामुळे झाले असावेत. ही डासांची जात वेगळीच आहे. पटकन मरत नाहीत. ऑल आऊट, गुड नाईट, हीटचा पण फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही संध्याकाळी अलार्म लावून सगळी दारे खिडक्या बंद करतो. गोवऱ्या जाळून फरक पडतो का?

Pages