थरार

Submitted by सामो on 20 July, 2020 - 08:43

------------------ कथा थोडी नॉनव्हेज आहे. आवडत नसल्यास इथुनच माघारी वळू शकता. -------------

संध्याकाळचे ६ वाजलेले होते. सॅण्डल्स चा टिकटॉक आवाज करता अंजली कॅफे ब्लु हेरॉन मध्ये शिरली. इथे तशी ती कितीदा तरी येऊन गेलेली होती. आशुतोषच्या आवडीचा कॅफे होता हा आणि कितीतरी पावसाळी दुपारी, उन्हाळ्यातील रम्य संध्याकाळी दोघानि येथेच व्यतीत केलेल्या होत्या. इतक्या कि आता येथील वेटरही त्यांच्या परिचयाचे झालेले होते. पण आज तिला तो कॅफे जास्त उन्मादक वाटतं होता. कदाचित आज जे काही घडणार होते ते तिला नवीन होते म्हणूनही असेल. पण एकदम अनोखा थरार घेउन ती आता प्रवेश करती झाली. "हाऊ मेनी?" अशरच्या शब्दांनी भानावर येत तिने उत्तर दिले "५. आमचे रिझर्वेशन आहे." यावर रिसेप्शनिस्टने विचारले "नेन्सी या नावाखाली ?" अंजलीने मानेनेच रुकार दिला व अशरने दाखविलेल्या दिशेकडे मुकाट्याने जाऊ लागली. मैत्रिणी येईपर्यंत काय मागवावे असा विचार करत तिने एका Fanta मागविला. बाकी उत्तेजक पेयांना कधी हात लावलेला नव्हता म्हणजे तसे ते वाईट असतात .... अग्ग बाई!!! अव्वा वगैरे भावना नसून बस कधी प्यावेसे वाटलेच नाही एवढीच तिची भूमिका होती. तशी त्या पाच जणींमध्ये तीच सोज्ज्वळ म्हणता येईल अशी होती. बाकी नेन्सी आणि सुधा धीट होत्या. शिरीन आतल्या गाठीची होती ती फारशी बोलत नसे. आणि गुरमिताचे तर नुकतेच लग्न ठरलेले होते.
विचाराची साखळी गुरमीतपाशी येऊन ठेपली आणि अंजुने परत एकदा घड्याळाकडे नजर टाकली, हम्म सव्वासहा म्हणजे बाकीच्यां जणी एव्हाना यायला हव्या होत्या इतक्यात तिला सुधा व नेन्सी दिसल्या. दोघीनी रिव्हिलिंग कपडे घातले होते म्हणजे नेन्सीने स्तनांची घळ दाखविणारा तर सुधाने पारदर्शक, बराचसा झिरझिरीत.चला आता गप्पा तर सुरु होतील. येताच हाय हॅलो केल्यानंतर थोड्याफार सेटल झाल्यावर नेन्सीने अंजुला विचारले "डर तो नही लग रहा है ना? नही तेरा ये पहिला टाइम है इसलिये..." डोळा मारता ती म्हणाली. यावर लाजता हसून अंजु म्हणाली "डर नही लेकींना सुबह से अजिबा लग रहा है! क्योकी घर मे किसीको पता नही और आशुसेभी छुपाया है अभितक बताया नाही " यावर नेन्सी हसून म्हणाली "अर्रे यार कुछ नाही होता. सबा कुछ हम पे है क्यो सुधा?" यावर सुधा खांदे उडवीत म्हणाली "बात तो सही है. आपण जितकी ढिला देऊ तितकाच तो पुढे जाणार. आपण ढील नाही दिली तर तो बळजबरी तर नाही करणार." त्या "बळजबरी" शब्दावर अंजुच्या पोटात्त पुनर्रएकवार खडडा पडला. खरं तर तिने आशूला सांगायला हवे होते असे पुन्हा एकदा वाटून गेले. नेमके तेव्हाच सुधाने विचारले "सगळं काय आशुतोषला विचारून करणारा काय? तो सांगतो का तुला? कशावरून तो स्टॅग पार्टीज ना गेलेला नसेल?" यावर अंजु काहीच बोलली नाही. कारण ते खरेच होते कि. आतापावेतो नेन्सी व सुधाने ब्लडी मेरी व अन्य कोणते तरी कॉकटेल मागवून झालेले होते. व त्या गप्पा मारण्यात गुंग झालेल्या होत्या.
गुरमीत धापा टाकता येताना दिसली. तिच्या मागोमाग लगेच शिरीनही. गुरमीत आल्या आल्या तिघीनी तिचे स्वागत केले. आफ्टरऑल उत्सवमूर्ती तिचा तर होती. लग्न तिचे,bachelorette पार्टी तिची. गिफ्टस आता नको रूमवर गेल्यावर उघडू असे सर्वांच्यात एकमत झाले. गप्पा सुरु झाल्या. चावट गप्पाना ऊत आलेला होता. मग त्यात नेन्सीचे adventures ते पुरुषांचे साइझेस shapes सर्व सामिष गप्पानचा समावेश होता. अंजु ला मजा येऊ लागली होती, खरं तर संध्याकाळला मस्त रंग चढता होता. सुधा खूपच बोल्ड होती खरे तर ती स्त्री-पुरुष असा भेदभाव मानता नसे आणि कोणत्या टायपात कोणती बलस्थाने असतात याची चविष्ट वर्णने ती सांगता होती. "म्हणजे कसं बायकांना बायकांचे योग्य ते स्पॉट्स माहीत असतात ज्यात पुरुष अनभिज्ञ असतात." या तिच्या वाक्यावर शिरीन आणि नेन्सी खिदळल्या. बहुतेक आता चढू लागली होती. अंजुही त्या चावटपणावर बेहद्द हसत होती. थोडेफार खाल्ल्यावरती पाची जणी बुक केलेल्या हॉटेल रूमवर निघाल्या.
रूमचा तो कृत्रिम व खोटा क्लीन सुगंध , पेस्टल अँबियन्स, अंधुक‌ उजेड् सगळंच उत्तेजित करणारं होतं. जरा स्थिरस्थावर झाल्यावर व प्रत्येकीने सोफा, खुर्ची , बेड अशी आपापली आवडीची जागा निवडल्यानंतर गिफ्ट ओपनिंग चा प्रोग्रॅम सुरु झाला. शिरीनची गिफ्ट गुरमीत ने पहिली उघडली. तिच्यात "अंधारात स्पष्ट पाहू शकणारा चषमा होता." यावरून सगळ्याजणी नि हसून घेतले. कि रात्री बेरात्री शेजारच्यांच्या बेडरूम मध्ये डोकावायला मजा येईल पण गुरमितला रात्री वेळ मिळाला तर ना ; ) वगैरे. मग सुधाच्या गिफ्टची वेळ होती, तिने एका मोठ्ठाले फ्लेवर्ड कोंडोम्स चा पॅक आणला होता ज्यात वेगवेगळ्या साइझेस चे व स्ट्रॉबेरी, बनाना , मँगो वगैरे फ्लेव्हर्स चे कोंडोम्स् होते. यावर सगळ्यानि तिची थट्टा केली कि काय हे गुरमितापेक्षा नेन्सीला त्याचा उपयोग होईल. कारण गुरमीत अन तिचा नवरा कोंडमा कशाला वापरातील डॉंबल्याचे. एवढे साधे तिला कळू नये? अंजुने साधी सुंदर लेसवाली लॉन्जरी आणली होती जी सर्वाना खूप आवडली. गुरमिताला हि खूप आवडली.अंजुची गिफ्ट आतापर्यंत प्रॅक्टिकल ठरली होती. पण अजून बॉंब म्हणजे नेन्सीची गिफ्ट उघडायचीच राहिली होती. गुरमितने उत्सुकतेने हसत हसत ते wrapper उघडले आणि Whoa!!!! आतून डिल्डोज , व्हायब्रेटर्स आणि काय काय Toys निघाले. सर्वजणी खूप हसल्या. खरे तर त्यांना सर्वाना ती गिफ्ट आवडलेली होती.
पण मुख्य कार्यक्रम अजून बाकीचा होता.गुरमितसाठी बाकीच्या चौघीनी काँट्रीब्युशन काढून मेल स्ट्रीप टीझरला बोलावले होते.खरं तर कल्पकतेला वाव देण्यासाठी त्याने चेहेरा ना दाखविता मॅस्कॉट बनून शो करावा असेही additional चार्जेस देऊन मागविले होते. तो येणार होता ७:३० ला. आणि आता तर पावणेआठ वाजायला आलेले होते. एव्हाना अंजुच्या पोटात टेन्शन मुळे पार पिळा पडला होता. कुठून या पार्टीला रुकार दिला असे झालेले होते. आशूला कळले तर तो काय म्हणेल याची फार काळजी नव्हती कारण तो तसा stuck up कधीच नव्हता. काळजी हि होती कि सुधा, नेन्सी व कदाचित शिरीन कशा वागातील? एका मन म्हणता होते - खरं तर तिने यायलाच नको होते अशा पार्टीला पण आता निघणारा कसे. पण दुसरे मन मात्र साहसप्रिय होते ते हा थरार मनापासून एंजॉय तर करत होतेच पण कधी एकदाचा तो स्ट्रीपटीझ करणारा येतोय असे सर्वाना झाले होते.
पावणेआठचे आठ झाले, सव्वाआठ झाले. आता मात्र सर्वाना कंटाळा येऊ लागला होता व त्या एजन्सीला फोन करायचे सर्वानुमते ठरले.सुधाने फोन लावला - "हॅलो d'amore एजन्सी आहे का?: वगैरे बोलत ती बाल्कनीत जाऊन विचारणा करू लागली व अन्य बाकीच्यांनी गप्पा सुरु ठेवल्या. सगळ्याजणींचा एक कान मात्र सुधाकडे होता. थोड्याच वेळात सुद्धा निराश चेहेरर्या ने परत आली व तिने रहस्यस्फोट केला कि काही कारणांनी तो मनुष्य , तरुण व्हॉटेव्हर काही येऊ शकता नाही तेव्हा दुसर्या एखाद्या दिवशी हीच ऑर्डर लागू एनकॅश करता येईल अथवा पैसे परत मिळतील. पण एजन्सी दिलगीर आहे. अंजली सोडून सर्वांच्या चेहर्यावर निराशा स्पष्ट झळकली. " आता कसले डोंबल्याचे गुरमितचे लग्न आले आहे आठवड्यावर" असे सुधा रागारागाने उदगारली. अंजलीला मात्र मनातून उकळ्या फुटत होत्या कि चला एक संकट तर टळले.
सगळ्याजणी परत निघाल्या. अंजली आशूला फोन लावणारा होती. हुश्श् तिच्या साध्याशा स्वप्नाळू बिनरिस्की आयुष्यात आलेली वावटळ तर टळली होती आणि परत ती अशा पार्टीला रुकार देणारा नाही हे तिने पक्के ठरविले होते. तिची पावले अधीरतेने घराकडे वळली , फेसटाईम विथ आशु. युहु!!! मस्त मस्त!! कोणत्याही अनावश्यक थरारापेक्षा हि अधिक उत्कंठेने ती आशुबरोबर गप्पा मारण्यास उत्सुक होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हात्तिच्या, मला वाटलं तो आशूच निघतो की काय! Lol>>>>> वावे, माझ्याही मनात तेच आले होते, पण म्हणले जरा बाकी प्रतीक्रिया येऊ देत. Proud

नॉनव्हेज ?
काहीतरि चावट वाचायला मिळेल या अपेक्षेने वाचली पण ....

ठीक आहे. जर तो आशूच निघता तर थरार शिर्षक शोभलं असतं.
गोष्टीत भरपूर शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्या दुरुस्त करता आल्या तर बरं.
ही गोष्ट मी आधी वाचल्यासारखी वाटतेय. इथेच टाकली होती का सामो?

खरं तर कल्पकतेला वाव देण्यासाठी त्याने चेहेरा ना दाखविता मॅस्कॉट बनून शो करावा

वरिल वाचून तेच वाटले होते की तो आशूच असणार

अरे हे काय ! नॉन व्हेज लिहायचे अ‍ॅडवेन्चर करायचे ठरवून मग रद्द केले का अंजू प्रमाणे Light 1 मलाही वाटले तो आशू निघणार म्हणून. Happy

थरार घडायला भरपूर वाव होता -
मलाही वाटलं तो आशूच निघणार. तो खरा थरार ठरला असता. +1 >> +१
गुरमितचा भावी नवरा
सुधा आणि गुरमित एकमेकींना 'क्लिक' होणे (सुधा स्त्री-पुरूष भेद मानत नसे Wink )
एजन्सी तर्फे जो जॉन अब्राहमछाप देसी बॉईज आला त्याच्याशी अंजूला लऊऊ अ‍ॅट फर्स्ट साईट होणे...
ह्युमन फिमेल सेक्श्युअ‍ॅलिटी अँड माईंड एक्स्प्लोरेशन मिशन अशी संपावी.... Happy
आवडली गोष्ट पण ते व्हिगनवाले चिकन विंग्ज देतात तसं झालं... मी आवडते म्हणते, लगेच बाकीचे सर नाही बघ ह्याला नॉन-व्हेजची पटवायला येतात... Wink

>>>>आवडली गोष्ट पण ते व्हिगनवाले चिकन विंग्ज देतात तसं झालं>>> हाहाहा
आमची सरड्याची धाव कुंपणापर्यंतच झाली खरी Happy

Happy असू दे, असल्या विषयांवर कुंपणापर्यंत जायला पण लईच टशन लागतं. सबके बस की बात नही. अभिनंदन. Wink

असू दे, असल्या विषयांवर कुंपणापर्यंत जायला पण लईच टशन लागतं. सबके बस की बात नही. अभिनंदन. Wink>> हे खरय

गोष्ट आवडली... थरार अजुन रंगवता आला असता.. करोना मिक्स करायचे ह्यात... म्हणजे सेफ्टी म्हणून बायकांनी आणि पुरूषांनी सर्वांनी मास्क लावला असे दाखवायचे पण मास्क वाला स्ट्रीप टीझर आणि मास्क लावलेली अंजू एकमेकांना शरीरावरील विशिष्ठ भागावरील तीळावरून ओळखतात असे दाखवायचे..

वर काढते आहे. या कथेत सर्वांच्या कल्पनेचे वारु प्रतिसादात चौखुर आणि बेफाम उधळले आहेत.
धाग्यापेक्षा प्रतिसाद बेहतर - असे खरच झालेले आहे.

असच सुचतय म्हणून जरा वेगळा शेवट सुचवतो..
>> सगळ्याजणी परत निघाल्या. अंजली आशूला फोन लावणारा होती. हुश्श् तिच्या साध्याशा स्वप्नाळू बिनरिस्की आयुष्यात आलेली वावटळ तर टळली होती आणि परत ती अशा पार्टीला रुकार देणारा नाही हे तिने पक्के ठरविले होते. >> तिने पटकन कॅब केली आणि ड्रायव्हरला सांगितलं " फिनिक्स मॉल". तिथून तिचं आवडत "रिव्हिएरा लाऊंज" अगदी चालत पाच मिनिटावर होतं. आणि ऱोबर्टोची शिफ्ट सुरु झाली असेलच हे तिला महिती होतं... हे असं चार चौघीत अवघडून जाण्याची अ‍ॅक्टींग करत बसण्यापेक्षा ते जास्त बरं. आपल्याला स्वतःचा 'पर्सनल शो' मिळत असण्यातला आणि ते गुपित आपल्याशीच बाळगण्यातला थरार नक्किच जास्त होता!

अरे मस्त आहे हे... मी मिसले होते वाटते. नॉनवेज आहे, मागे फिरा. हे शीर्षकातच लिहायचे होते की, म्हणजे न चुकवता धाग्यात शिरलो असतो Happy

पण हे काही समजले नाही <<<< कारण गुरमीत अन तिचा नवरा कोंडमा कशाला वापरातील डॉंबल्याचे. एवढे साधे तिला कळू नये?<<< नवरा बायको पण वापरू शकतात आई मीन वापरतात की कोंडमा? (छान शब्द आहे कोंडमा, हैदराबादी टोनमध्ये उच्चारायला मजेशीर वाटतेय)

बाकी मलाही तो आशू वा गुरमीतचा नवराच वाटला. ऐनवेळी बदलला का शेवट? ते स्ट्रीपटीझ करतानाचे वर्णन मायबोली सेन्सॉर बोर्ड धोरणाच्या अंतर्गत मान्य होणार नाही अशी भिती वाटून Happy

>>>हे शीर्षकातच लिहायचे होते की, म्हणजे न चुकवता धाग्यात शिरलो असतो Happy
हाहाहा खरे आहे ही क्लिक्बेट ठेवत जाइन यापुढे मग भले स्पिरिच्युअल धागा का असेना Happy
>>>>पण हे काही समजले नाही
मलाही आता आठवत नाहीये असे का ते Sad ती चूक झालीये. गुड कॅच.
>>>>>मायबोली सेन्सॉर बोर्ड धोरणाच्या अंतर्गत मान्य होणार नाही अशी भिती वाटून Happy
लोल