ओढ

Submitted by द्वैत on 19 July, 2020 - 10:55

ओढ

वादळांना सांगुनी कळणार नाही
जीवनाचा डाव मी हरणार नाही

हे उभे आयुष्य अवघे सांधल्यावर
सोडुनी अर्ध्यात मी पळणार नाही

वाळवंटातील एका मी प्रवासी
मी तुझ्या छायेमध्ये रमणार नाही

बोलती हे शब्द माझे सांजवेळी
कैफ हा वेड्या तुझा सरणार नाही

तू फुलांचा गंध हो मी श्वास होतो
वेगळे दोघा कुणी करणार नाही

मर्त्य आहे ही धरा अन चंद्रमा ही
ओढ ह्या दोघांतली मरणार नाही

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान