माझ्या घरचे “रसमलाई” प्रकरण -

Submitted by म्हाळसा on 4 June, 2020 - 01:07

“घरची प्रकरणं बाहेर मांडायची नाहीत” असं आई नेहमीच सांगायची..पण नियम मोडायची सवयच असल्यामुळे हा पोस्ट लिहायचा मोह काही आवरला नाही. असो...महिन्यातून एकदा तरी माझ्या घरी रसमलाई बनतेच बनते. पण रसमलाईचा हा प्रवास तितका सोप्पा नक्कीच नव्हता.

लग्नानंतर सासरची मंडळी खाण्याचे शौक़ीन आणि सासुबाई उत्कृष्ट cook त्यामुळे खवाय्येगीरी शिकण्या पालिकडे काही पर्यायच नव्हता. माझं सासर वडाळ्याचं..तिथला “ब्रिज अलबेला” मिठाईवाला अगदी फ़ेमस आणि आमच्यासाठी जणु देवच. त्याची गाथा गाताना नवरोबा कधीच थकत नसत. त्यात रसमलाई आणि रसगुल्ला हया विषयावर भरभरून बोलत असत. तेव्हाच ठरवलं, लवकरच रसमलाईचा फडशा पाडायचा.

तसं रसमलाई प्रकरण फारसं कठिण नाही, पण मराठी कुटुंबां मधे क्वचितच बनवला जाणारा आणि पुरणपोळीची जागा मुळीच न घेऊ शकणारा हा पदार्थ शिकण्यात अनेक अड्थळे येतच होते. “YouTube हाच आपला गुरु” अस समजून केलेल्या कित्तेक प्रयत्नांनंतरही यातनाच भोगत होते. लग्न होऊन ५ वर्ष उलटली होती पण रसमलाई हवी तशी काही जमली नव्हती. त्यात अधुन मधून कामानिमित्त आमच्या विदेश वाऱ्या होतच होत्या. अशाच एका विदेश वारीत एक अप्रतिम रसमलाई बनवणारी व्यक्ती भेटली. ती मूळची UP मधली म्हणून डोळे झाकून पण कान उघड़े ठेवुन रेसिपी अगदी व्यवस्थित ऐकुन घेतली. दूध फाड़ायची एक विशिष्ट पद्धत, अलगद हाताने वळलेले गोळे, दूध साखरेची रबड़ी आणि त्या वर वेलची केशरचा साज, हया सग़ळ्या गोष्टी तीने अगदी बारकाइने संगितल्या. झाल तर मग, घरी जाता जाता सर्व साहित्य घेऊन गेले आणि बनवली एकदाची रसमलाई.

देर आए पर दुरूस्त आए!
चमच्याने हळुवार पणे तुटेल, तोंडात घालता क्षणीच विरघळेल अशी मऊ लूसलूशित रसमलाई नवरोबा च्या स्वागता साठी तय्यार होती. घरात पाउल टकताच “आज काही तरी गोड़ बनवलेलं दिसतय “ असं म्हणणाऱ्या नवरोबाला रसमलाईची वाटी देताना ज़ो आनंद झाला तो निराळाच.. त्यावर “ही रसमलाई तर अगदी हलवायाच्या रसमलाई सारखीच झाली आहे” अस बोलून नवरोबा अतिशय चतुराईने भविष्यातील रसमलाई ची सोय केली. त्या नंतर सगळे खरकटे साम्राज्य नवरोबा कडे सोपवून मी मोकळे झाले.

नवरोबा प्रमाणेच आमच्या वंशाच्या दोन्ही पणत्यांना देखिल रसमलाई तितकिच प्रिय. त्यामुळे ही रसमलाई तू फ़क्त माझ्यसाठी नक्कीच बनवली नसणार “ असं बोलताना नवरोबा अजीबात डगमगत नाही.

चला तर मग.. ह्या प्रकरणाची सांगतां माझ्या सतत उपदेश देणाऱ्या आई, सांभाळून घेणाऱ्या सासुबाई आणि चुका काढणारे नवरोबा ह्यांचे आभार मानून करते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त
फोटो पाहिजे इतकं रसभरीत वर्णन असलेल्या रस मलई चं.

अनु + १
फोटो तर हवेतच.
पण लगे हाथो तुमची खास रसमलाई ची रेसिपी पण शेअर करून टाका. Happy

बाकी छेन्याचे पदार्थ आवडणारे अन त्याचे गोडवे गाणाऱ्या बंगाल्यांनाही जमत नाहीत. ते ओडिशात {जगन्नाथाच्या } पुरीला धावतात. खीरमोहनही केलं का?

हे आमच्या घरून
नवीन सभासदाच्या धाग्याला हातभार Happy

..

सॉरी पण दुधात टाकलेल्या इडल्या वाटताहेत.

म्हाळसा, तुमचा फोटो हलवायाला शोभेलसा आहे. लेख छान आहेच पण पाकृ नसल्यामुळे खूपच वाईट वाटतेय. कृपया पाकृयोजाटा.

रसमलाईची कृती-

लागणारा वेळ:
1 तास

जिन्नस:
पनीरसाठी लागणारे साहित्य -
दूध - ३ लिटर
विनेगर - ४-५ टेबलस्पून

पाकासाठी-
साखर - १ कप
पाणी - ४ ते साडेचार कप

रबडीसाठी लागणारे साहित्य -
दूध - अर्धा लिटर
कंडेन्स मिल्क - 14 oz
एव्हॅपरेटेड मिल्क - 14 oz (ॲाप्शनल)
केशर
वेलची पूड
पिस्त्याचे काप
वॅनिला इसेन्स - १ टिस्पून

क्रमवार पाककृती :

१.एका गॅसवर रबडीसाठी तर दूसऱ्यावर पनीरसाठी दूध चढवावे.
२.दूध उकळेपर्यंत एका कपमधे दोन चमचे गरम दूधात केशर भिजत ठेवावा. पिस्त्याचे काप तयार ठेवावेत. एका मोठ्या भांड्यावर चाळण ठेवून त्यावर सूती कपडा पसरावा.
३. पनीरसाठीचे दूध उकळले की त्यात विनेगर टाकून दूध फाडावे. ते दूध तसच कपड्यातून गाळून घेत थंड पाण्याखाली छान धुऊन घ्यावे. कपड्यात गुंडाळून पिळून त्यातला पाणी काढावे. पनीर ओलसर ठेवावं. त्यानंतर छान ७-८ मिनिटे मळून घ्यावे व पाक तयार होइपर्यंत झाकून ठेवावे.
४.रबडीच्या दूधात कंडेन्स मिल्क, एव्हॅपरेटेड मिल्क घालून उकळावे. कमी गोड वाटल्यास थोडी साखर घालावी. वेलची पूड, पिस्ता, इसेन्स आणि केशरचं दूध घालावे.
५.एका भांड्यात १ कप साखर व ४ कप पाणी घालून ते उकळेपर्यंत पनीरचे गोळे करून घ्यावे.
६.पाक तयार होताच ७-८ गोळे सोडून झाकण ठेऊन ५-५ मिनिटे दोन्ही बाजूंनी शिजवावेत. नंतर काढून थोडे थंड करून हलक्या हाताने दाबून रबडीत सोडावेत.

हे आमच्या घरून
नवीन सभासदाच्या धाग्याला हातभार>> धन्यवाद. तुमचीही रसमलाई चवीला छानच झाली असेल.

अनु धन्यवाद Happy

अहो च्रप्स, बायको लॉकडाऊनला काही बाही शिकून बनवत राहते आणि मी मध्ये लुडबुड करत फोटो काढत राहतो. बाऊल घ्या. सजवा, मांडणी करा फोटो आकर्षक येईल हे बघा याची मला स्वताला आवड असली तरी बायकोला माझ्या लुडबुडीचा त्रास नको म्हणून आहे तश्यातच क्लिक करून घेतो Happy

आणि हो, या म्हाळसा प्रोफेशनल आहेत. पदार्थ बनव्ण्यातही आणि आता फूड फोटोग्राफीचाही छंद बाळगून आहेत. त्यांच्या फोटोखाली माझा फोटो येता तो आणखी फिका वाटणे स्वाभाविक आहे Happy

फोटो छान.
कृतीत तिसऱ्या पायरीला ( २ दोनदा पडलाय)
रबडीसाठीचं दूध फाडा असं लिहिलंय.