अशक्य ते शक्य केलं कोरोनाबाबांनी

Submitted by मिरिंडा on 16 July, 2020 - 06:11

कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंब ईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली ,मग ती सरकारी असोत की खाजगी. टपप्प्यानी कार्यालयात जाण्याची पद्धत सुरु झाली. एरवी नियमित दांड्या मारणारे कर्मचारी "आता मी कधी ऑफिसला जाणार असं मानभावीपणे विचारु लागले. खरंतर त्याना बरंच वाटत असावं. जसं काही हे कर्मचारी सगळं ठीक होतं तेव्हा नियमित ऑफिसला जात होते. आता रजेसाठी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रं पर्यायानी मेडिकलची बिलं देण्याची गरज उरली नाही. पण यात डॉक्टरांची आवक थोडी कमी झाली हे खरं.

पगार कमी झाले. आधी १०%,मग २०%,आणि आता ३० ते ५०% ही झाल्येत म्हणे. आता तर घरुनच काम करा. म्हणजे कसे चोवीस तास कामाला जुंपलेले राहा. केव्हाही फोन येतो कामाला जुंपलं जातं. ऑफिस चालू असताना " ऑफिस टाईम " होता. तो नाहीसा झाला. टी टाईम , लंच टाईम आणखीन कसला टाईम बंद झाला. आता घरच्या घरी टी पण पिऊ देत नाहीत आणि लंच पण घेऊ देत नाहीत. सारखा कॉल येतो आणि हातातला घास तोंडापर्यंत जाता जाता थांबतो. कोरोनाबाबांनी सतत उद्योगात राहण्याचं महत्व फुकटात पटवून दिलं. थोडक्यात "रिगरस ट्रेनिंग प्रोग्राम " ( सक्तीचं प्रशिक्षण) झाला. ....काय ही अवस्था ? कधी संपणार हे सगळं ? असं लोक कंटाळून म्हणू लागले. कोरोनाची आरती तयार झाली असंही ऐकलंय. पण आरतीला घरातलीच माणसं हजर राहू लागली. काहीनी कविता लिहिल्या, प्रहसनं लिहीली. टीव्ही सीरियलमधेही कोरोना डोकावूं लागला.सीरियलचे जुनेच भाग बघावे लागतात. बाहेर पडायचं नाही. तोंड झाकून बाहेर पडा, जणू गुन्हा केलाय. दुकानं बंद, भाजी बंद, थेटरं बंद, शाळा बंद शेवटी हॉटेल बंद त्यि बरोबर बारही बंद. बारकरी आता, " बार बंद झाले, दारु बंद झाली, आता मी कशाला, जगू सांग प्यारी " असली गाणी घरच्या घरी म्हणू लागले. काहीजण व्हॉट्स अपवर हे गाणं एकमेकाना पाठवू लागले. बच्चे कंपनी घरी बसली.त्यांचं खेळणं बंद झालं. असं रोज मरण्यापेक्षा मरण बरं असं वाटू लागलं.

लग्न समारंभ मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होऊ लागले. आमची एवढी माणसं तुमची एवढी माणसं, हे वाद थांबले. केटरिंगचा व्यवसाय जो कोरोनापूर्व काळात तेजीत होता तो भलताच खाली आला. कंत्राटदारांचे फायदे कमी झाले. लोक आपसात विचारीत असत " कितीचं पॅकेेज घेतलंत, तीन लाख ,पाच लाख,दहा लाख? मंत्री संत्री असतील तर एक कोटी,दोन कोटी पाच कोटी, इ.".सगळे कसे माजले होते.ते सगळेच एकदम खाली आले. "अभी सबको आटेदाल का भाव मालूम पड गया ". काहींच्या नोकऱ्या गेल्या. काहींनी कीचनं सूरु केली. कारण खाण्याला मरण नाही. त्यामुळे गिर्हाईक नक्की. कारण बाहेर काही मिळत नाही. ऑर्डर करुन मागवा....घरातल्या नोकरांच सूख पळून गेलं. उलट "आत्मनिर्भर" बनून स्वत:. काम करा. आणि नोकरांना घरी बसून पैसे द्या. असा फतवा निघाला. घरातली पुरुष मंडळी कामाला लागली. स्वयंपाक शिकली. ग्रुहीणीना आराम मिळू लागला. सकाळी उठून त्या आरामात पेपर वाचू लागल्या. ग्रुहिणींच्या कष्टांची किंमत समजू लागली. मंदिरं, तीर्थस्थानं ओस पडली. अभिषेक. एकादष्ण्या, पूजा, महापूजा बंद पडल्या. पुरोहित वर्ग आणि मंदिर मालकांची आवक घटली. रांगा बंद पडल्या. तासन् तास रांगेत उभं राहून मिळणाऱ्या दर्शनाचं समाधान मिळेनासे झालं. भक्तांच्या तावडीतून देव सुटले. देव , घरातच आहे हा साक्षात्कार कोरोनाने लोकांना घडवला. इतक्या शतकांत संतांना जे जमलं नाही ते कोरोनाने अवघ्या काही महिन्यात घडवून आणलं. भजनींं मंडळं बंद पडली. भजनांच्या स्पर्धा थांबल्या, सफरी, सहली, गिर्यारोहणं बंद पडली.
फार काय अहो, तळ्याकाठी बसणारी तरुण जोडपी बसेनाशी झाली. सोशल डिस्टनसिंग आणि मास्कमुळे " मग कशाला बसायचं "
अशी तक्रार करु लागली. याचा अर्थ, जे काय करायचं ते घरीच करा. बाहेर पडण्याची गरज नाही. आधी रिहर्सल करा, मगच तळ्याकाठचा शो करा. अशी शिकवण कोरोनाने दिली.
अशा कोरोनाची कहाणी रंजक, भंजक की फायदेमंद म्हणायची,तुम्हीच ठरवा. Choice is yours.

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीलयं. आवडले. वास्तववादी आहेच. पण लोकांनी खरच काळजी घ्यावीच.

वाईटातून चांगलं काहीतरी.
सगळ्यात भारी म्हणजे ५००-१००० लोक जमवून होणारी आणि खर्चाचा अक्षरश: डोंगर मांडणारी लग्नं २०-५० लोकांत छान पार पडली.
आणि कारणाशिवाय तासंतास रांगा लागून भरणार्या देवाच्या दानपेट्यांना आराम मिळाला. यंदा शिर्डी देवस्थानाला ४ कोटींचं नुकसान (?) झालं म्हणे.ह
आस्तिकांच्या भाषेत जर देवच सगळं देतो तर फक्त भावाचा भुकेला असलेल्या त्याला आपण पैसे द्यायची काय गरज? आणि नास्तिकांच्या भाषेत जर ती फक्त दगडाची मुर्ती आहे तर तिला पैशाची काय गरज?

आणि हो...स्वच्छतेच्या सवयी नव्याने आणि प्रखरतेने लागल्या.

आताच सनसनाटी न्यूज वाचली.

Dr. Maria Van Kerkhove from WHO stated that some times corona virus is asyamptomatic and for asyamptomatic patient neither need to be isolated nor quarantined nor social distanec needed and it can not be transmit from one patient to another.

ऐश्वर्या आणि आराध्या ह्या दोघीपण asyamptomatic patient आहेत. म्हणजे असे किती पेशंट असतील?? आणि विनाकारण किती अशा लोकांना त्रास सहन करावा लागला असेल?.

येता -जाता होणारं online shopping बंद झालं आणि फेसबुक वर Myntra, Amazon ऐवजी रेसिपी चॅनेल चे suggestions यायला लागले .
हॉटस्टार ,नेटफ्लिक्स च streaming वाढलं Happy Happy

asyamptomatic patient neither need to be isolated nor quarantined nor social distanec needed and it can not be transmit from one patient to another.
>>>>

आधी तर अश्यांना सायलेंट कॅरीअर म्हटले जायचे.
रोज नवीन न्यूज येत आहेत.