Submitted by द्वैत on 14 July, 2020 - 07:17
कातरवेळी
ग्रीष्माच्या कातरवेळी
हे अर्घ्य वाहिले कोणी
क्षितीजाच्या डोळ्यांमध्ये
बघ दाटून आले पाणी
हृदयाच्या खोल तळाशी
मग असे हालले काही
लाटेवर लाट उसळली
ह्या दिशा बुडाल्या दाही
कुठलीशी हुरहूर जाणे
आभाळ व्यापूनी गेली
व्योमात अचानक आल्या
ताऱ्यांच्या दाटून ओळी
ह्या अगम्यतेच्या पोटी
गात्रांस पालवी फुटली
मी क्षणभर स्मरण कराया
ही धीट पापणी मिटली
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख…!
सुरेख…!
उच्च स्तरिय अलंकारीक भाषा
उच्च स्तरिय अलंकारीक भाषा
स्वत:ची लाज वाटली आपल्याला अस अजून लिहीता येत नाही.
मला प्रामाणिकपणे असंं वाटत की फार नाही कविता लिहीता आल्या तरी
लिहीलेल्या कवितांपैकी जर एखादी कविता वाचून एखाद्या वाचकाला जरी असं वाटल
आपल्या तळहातावरचं गंगाजल याच्या तळहातावर सोडून याला आपलं आयुष्यच देऊन टाकावंं
तिथे कवी चिरंजीव झाला.
आणि मला ही कविता वाचून अस वाटतय द्वैत!!!
धन्यवाद स्वाती, प्रगल्भ एवढं
धन्यवाद स्वाती, प्रगल्भ एवढं भरभरून लिहिलंस त्याबद्दल तुझे ही खूप खूप धन्यवाद ...
छान प्रवाह आहे कवितेचा;
छान प्रवाह आहे कवितेचा;
या अथांग सागरामध्ये जणू दडलेले आहे काही!
सुंदर रचना!
द्वैतजी अप्रतिम रचना
द्वैतजी अप्रतिम रचना
वा! सुंदर काव्य! विशेषत: ही
वा! सुंदर काव्य! विशेषत: ही कल्पना मनाला भिडली..
>>>कुठलीशी हुरहूर जाणे
आभाळ व्यापूनी गेली
व्योमात अचानक आल्या
ताऱ्यांच्या दाटून ओळी>>>
चंद्रमा, दत्तात्रय जी, चंद्रा
चंद्रमा, दत्तात्रय जी, चंद्रा सगळ्यांचे खूप खूप आभार
कुणीतरी ह्या कवितेला छान चाल
कुणीतरी ह्या कवितेला छान चाल लावून गायला पाहिजे.
प्रयत्न करून पाहीन प्रभुदेसाई
प्रयत्न करून पाहीन प्रभुदेसाई जी
मस्तच....
मस्तच....
वा! अप्रतिम!
वा! अप्रतिम.
धन्यवाद निरु, धन्यवाद
धन्यवाद निरु, धन्यवाद स्वप्नील
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
अहाहा! अप्रतिम.
अहाहा!
अप्रतिम.
धन्यवाद तो मी नव्हेच, धन्यवाद
धन्यवाद तो मी नव्हेच, धन्यवाद अरिष्टनेमी
अप्रतिम शब्दरचना...
अप्रतिम शब्दरचना...
धन्यवाद
धन्यवाद
धीट पापणी.......वा!
धीट पापणी.......वा!
धन्यवाद सुमित
धन्यवाद सुमित
वाह.... भारीच....
वाह.... भारीच....
छान आहे
छान आहे
धन्यवाद शशांक जी, धन्यवाद
धन्यवाद शशांक जी, धन्यवाद कविन
धन्यवाद शशांक जी, धन्यवाद
धन्यवाद शशांक जी, धन्यवाद कविन
जया एम नावाच्या कवयत्री
जया एम नावाच्या कवयत्री होत्या त्यांच्या कवितेसारखी काव्यशैली आहे .छान कविता.
ही कविताही आवडली. आपण पूर्वी
ही कविताही आवडली. आपण पूर्वी सुमंदारामाला या वृत्तात काही कविता वेगळ्या आय डी ने केल्या होत्या त्या खूप सुंदर होत्या.
धन्यवाद केशवजी, धन्यवाद हीरा
धन्यवाद केशवजी, धन्यवाद हीरा .... @हिरा मी मायबोलीवर ह्या एकाच ID वरून लिहितो ... त्यामुळे तुम्ही वाचलेल्या त्या कविता दुसऱ्या कुणाच्या तरी असतील
कविता सुंदर आहे. दुर्बोध
कविता सुंदर आहे. दुर्बोध वाटली पण आवडली.
द्वैत, काय प्रतिक्रिया देऊ मी
द्वैत, काय प्रतिक्रिया देऊ मी?..... अप्रतिम...!!!
मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई.....
धन्यवाद सामो, धन्यवाद
धन्यवाद सामो, धन्यवाद किमयागार
अतिशय सुरेख आहे, खुपच छान!!!
अतिशय सुरेख आहे, खुपच छान!!!!
Pages