कोरोना !

Submitted by prernapatkar48 on 6 July, 2020 - 12:18

कोरोना !
पृथ्वी ही वैतागलेली
समजावून लेकरांना,
युगाचा मालक आहे ‘कली’
शांतपणे जगा ना.. ll

पण नाही…
ऐकेल तर तो माणूस कसला?
माणुसकी हरवलेला…
मीच माझा स्वामी म्हणतं,
अहंकाराने धुंद झालेला… ll

कामासाठी भरा तुंबडी,
प्रामाणिकांची उचलबांगडी
राक्षसी वासनेसाठी
वय वर्षे चार वा उलटू दे साठी.. ll

पैशासाठी काहीही,
सतेसाठी हाणामारी..
पापांनी भरली गोदामे,
तरीही सुटेना लाचारी.. ll

भगवान श्रीकृष्ण ही थांबले,
शिशुपालाचे शंभर अपराध
कधी नव्हे ते देवही बंदिस्त
पाहावेना त्यांना अस्त.. ll

उत्पत्ति, स्थिती, लय
हे त्रिकालाबाधित सत्य…
देवही बांधील नियमांना,
वैश्विक अरिष्ट ‘कोरोना’… ll

आठवा तो निर्गुण निराकार,
अंतःकरणातून घाला साद..
होईल तुम्हाला साक्षत्कार
कोरोनाची जाईल ब्याद.. ll

Group content visibility: 
Use group defaults