लॉकडाउनपर्वातील बाकरवडी

Submitted by Srd on 6 July, 2020 - 02:14

लॉकडाउनपर्वातील बाकरवडी

बाकरवडी हा काही घरी करण्याचा पदार्थ नाही परंतू सध्याच्या मास्कपर्वात सर्व मिठाई - नमकिनवाले बंद असल्याने घरी प्रयोग केला.

स्रोत : रसोई शो, कलर्स गुजराथी चानेल, ४ जुलै, जयगौरीपार्वती व्रतानिमित्त आषाढ महिन्यांतले पदार्थ. तिकडे गौरीला उपवासाचे पदार्थांशिवाय असे चमचमीतही लागतात.

फोटो १

tmp_16409_1.jpg

साहित्य
१) एक वाटी किसलेले सुके खोबरे,
२) धणे जिरे बडिशेप,तीळ,खसखस,लवंग,दालचिनी,शेंगदाणे थोडे,
३) लाल तिखट,मीठ,आमचूर,हळद,धणे पावडर,

फोटो २tmp_16409.jpg

४)चिंच कोळ/ पाणी

५) कणिक, मैदा आणि बेसन (१:१:अर्धा वाटी प्रमाण)

६)तळायला तेल

कृती
सारण
* क्रमांक (१ ) आणि (२) वेगवेगळे भाजून नंतर एकत्र करून भरड वाटल्यावर एक वाटीभर केले. त्यात क्रमांक (३) घालून बाकरवडीतील सारणाची चव आणायची.

* क्रमांक (५) थोडे मोहन घालून मळल्यावर त्याच्या चार पोळ्या करता येतात.

* पोळीवर चिंचकोळ लावून सारण चिकटवून गुंडाळी करुन कापून बाकरवड्या केल्या.
फोटो ३tmp_16409_0.jpg

त्या तळायच्या.

-----------
सूचना
तळून खुसखुशित करणे एक तंत्र आहे. चिंचकोळ फार पाणीदार लावल्यास वडी मऊ पडते बहुतेक.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारीक शेव पण घाला सारणात. चितळेच्या वडीचं उत्खनन केल्यास बरीच सापडते. लसणीचीही थोडी चव जाणवते.

चिंच आणि साखर मिक्सरमधे कोरडी फिरवून तेलात कालवून ती वापरा मिश्रण चिकटवायला. पाणी नको. त्यानं मऊ पडते.

शेव पण घाला सारणात.
होय. पण घरात शेव थोडीच उरलीय आणि अजून दहा दिवस किराणासुद्धा बंद आहे. कडक बंद आहे.

आई ग्ग काय दिसताहेत.. मी दोनदा उचलून तोण्डात टाकायचा प्रयत्न केला.. Happy

बाकरवड्या माझ्या फार आवडीच्या. अगदी त्याला आपण भाकरवड्या म्हणतो त्या वयापासूनच्या.
लहान असताना आई व्हीटीला जॉबला होती तिथून कुठूनतरी आणायची. ती चव आजही मिस करतो. त्या लांबोकड्या आकाराच्या कव्हर किंचित कडक असलेल्या कधी आजही कुठे दिसल्या की लगेच घेतो आणि फसगत होते. ती चव आजवर पुन्हा कधी सापडली नाही.
बाकी चितळे स्टाईल सुद्धा आवडतात. त्यांनी या पदार्थाचा ब्राण्ड बनवला म्हणून विशेष कौतुक वाटते.

मस्त. फोटो एकदम टेम्प्टिंग आलाय.
मीपण केल्या होत्या लॉकडाउन दरम्यान एकदा. फक्त लवंग, दालचिनी, शेंगदाणे घातले नव्हते. मी मधुराज् रेसिपी वरून केल्या होत्या.

वाह! मस्त!!
बादवे, कुणाला मऊ पडलेली बाकरवडी खायला आवडते का? मला बाकरवडी, जिलेबी, चकली मऊ पडल्यावर अधिक आवडते. Happy

@ सामो, छान झाली आहे.
-------
तो कलर चानेल voor app वर पेड आहे.
युट्युबवर हा एपिसोड आहे पण " not available in your country" म्हणजे काय?
बाकी केबल आणि डिशवर लागतोच.

बादवे, कुणाला मऊ पडलेली बाकरवडी खायला आवडते का? मला बाकरवडी, जिलेबी, चकली मऊ पडल्यावर अधिक आवडते. << जिलेबी अन चकली मउ पडलेली आवडते. विशेष करुन जिलेबीमधल्या ज्या मधे मधे गाठी येतात ना त्या फार आवडतात. Proud