काव्यमैथुन

Submitted by प्रजननविरोधी on 27 June, 2020 - 04:43

मोगरा फुलवून झाला
अंगणी मोर नाचवून झाला
दवबिंदू सुद्धा मनाच्या
पानावर खेळवून झाला

क्षण भराच्या सुखांचा
सण साजरा करून झाला
कण भराच्या दु:खांंचाही
डोंगर मोठा बांधून झाला

मळभ वगैरे दाटवून त्यावर
रिता पाऊस पाडून झाला
लपवून चेहरा, शुभ्र आरसा
आसवांनी भिजवून झाला

सूर लावूनी तुझ्याच कंठी
भाव मनीचा मांडून झाला
शब्द गुंफुनी तुझ्याच ओठी
रोष जगाचा थुंकून झाला

कल्पनेतल्या राक्षसांचा
मदांध तख्त फोडून झाला
वास्तवातल्या शोषितांचा
तुझ्यात वापर करून झाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझब

वाह

<कण भराच्या दु:खांंचाही
डोंगर मोठा बांधून झाला,
वास्तवातल्या शोषितांचा
तुझ्यात वापर करून झाला>>

हे उत्तुंग वाटलेलं आहे..! पुढील मैथुनासाठी शुभेच्छा.. Happy लिहीत रहा..

छान लिहिलं आहे तुम्ही प्रजननविरोधी 'दादा'. (मादी कधीच प्रजनन विरोधी नसते असं वाचलं होतं)