Submitted by मिल्या on 13 November, 2009 - 02:27
हिला गझल म्हणण्यापेक्षा हझल म्हणणे जास्त संयुक्तिक होईल
कसे ठकविले जगास सार्या नको गर्व हा फुका
नशीब बेणे कधीतरी लावेल तुलाही थुका
खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका
जगण्यामध्ये आताशा कसलाच समन्वय नसे
म्हैस पाहिली टीव्हीवरती नाव जिचे नाजुका
पैशापुढे न झुकतो कधिही स्वाभिमान आमुचा
त्यासाठी तर आणा भरुनी डॉलरने संदुका
नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा
गेलास घ्यायला उंटाच्या टिंब टिंब (...) चा मुका
जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका
भेकड नेते का दिल्लीचे पाय सदा चाटती?
मायमराठी पुजते आता हिंदीच्या पादुका
गुलमोहर:
शेअर करा
मस्त!!! खुल्या दिलाने
मस्त!!!
खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका>> आवड्या!
सर्वसमावेशक झाली आहे हझल
सर्वसमावेशक झाली आहे हझल .... छान आहे आवडली.
फक्त मला लयीत पुटपुटता येत नाहीये..
मस्त! अगदी चपखल शेर सगळे. हझल
मस्त! अगदी चपखल शेर सगळे.
हझल नाही 'वास्तववादी गझल' आहे
फक्त मला लयीत पुटपुटता येत
फक्त मला लयीत पुटपुटता येत नाहीये >>मग पुटपुटू नको. मोठ्याने गा
अगं शक्य आहे.. लय सुधारायला अजून वाव आहे ह्यात
साधारण ८ ८ ८ ३ असे वाच
व्वा सही !
व्वा सही !
खुल्या दिलाने स्वीकारूही
खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका
हाहाहाहा!!!!!!!!!
सही गझल!!!!!!!
जेवण तयार श्रेष्ठी तरिही
जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका >>>
मिल्या सहीच रे. बाकी त्या
मिल्या सहीच रे. बाकी त्या टिंबटिंबचा इमोटीकॉन मस्त आहे.
सहीच बॉस..... तोड नाही.....
सहीच बॉस..... तोड नाही.....
परत एकदा आभार सर्वांचे
परत एकदा आभार सर्वांचे
>>भेकड नेते का दिल्लीचे पाय
>>भेकड नेते का दिल्लीचे पाय सदा चाटती?
मायमराठी पुजते आता हिंदीच्या पादुका >>
जबरी रे .... १ नंबर!
सहीच रे मिल्या... आवडली हझल..
सहीच रे मिल्या... आवडली हझल..
परत एकद धन्यवाद सगळ्यांना
परत एकद धन्यवाद सगळ्यांना
झकास आहे
झकास आहे
यार सहीए
यार सहीए
मस्तय ही हझल!
मस्तय ही हझल!
धन्यवाद
धन्यवाद
अशक्य सही लिहीलीय.... आवडेश
अशक्य सही लिहीलीय.... आवडेश
~योगी
{मी इथेही:- अंजुमन-ए-अर्श}
मस्तय एकदम.
मस्तय एकदम.