गिल्गिट बाल्टिस्तान (Passu Cones, Hunza) - डिजिटल पेंटिन्ग

Submitted by अश्विनी के on 21 June, 2020 - 14:46

चित्र Paint 3D मध्ये mouse वापरुन काढले आहे.
PASSU CONE 8 with Car 1 WM.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच झाले आहे. फेसबुक वर पाहिले होते. चांदोबाच्या कथेत अश्या प्रकारचे एक चित्र होते. गिल गिट बाल्टिस्तानचे फोटॉ फेसबुक वर येतात एका गृप मध्ये अति शय अप्रतिम सुंदर जागा आहे. आणि दुर्गम

फारच सुंदर.
हुंझा हा बुद्धिस्ट आर्किओलॉजीकल अवशेषांचा खजिना आहे. म्हणून या प्रांताविषयी फार पूर्वीपासून आकर्षण आहे.

मी_अस्मिता, सीमंतिनी, अमा, कंसराज, हीरा आणि धनुडी - धन्यवाद Happy

हो अमा, The Himalayan Club वरून रेफरन्स फोटो घेतला आहे. बरेच दिवसांपूर्वी त्या मेंबरने दुसऱ्या एका फोटोखालच्या कमेंटमध्ये मला त्याच्या कुठल्याही फोटोवरून चित्र काढायला सांगितलं होतं. मी कबूल केलं होतं. त्याचा हा फोटो चित्रासाठी चांगला वाटला. जमेल तसा वेळ काढत चित्र पूर्ण करून त्या ग्रुपवर पोस्ट केलं त्याच्या रेफरन्स फोटोची लिंक देवून. कमेंटमध्ये त्याला टॅग केलं. फोटो बघताच खूप खूश झाल्याचे त्याने तिथे लिहिले. कुठला फोटो घेणार आहे वगैरे त्याला माहित नव्हते. त्याने हे ही लिहिले की तो कोविड पॉझिटिव्ह detect झालाय आणि recover होतोय. आजारी व isolation मध्ये असलेल्या माणसाला आपल्या नकळत आनंद दिला गेल्यामुळे मी पण खुश Lol

तो ग्रूप खूपच सुंदर आहे.
-----

हुंझा हा बुद्धिस्ट आर्किओलॉजीकल अवशेषांचा खजिना आहे. >>> बरोबर. लडाखचे ते extension आहे त्यामुळे त्यांची संस्कृतीही मिळती जुळती आहे. लडाखमध्येही बालटी लोक आहेत. तरी असं म्हणतात की तिथे व मुझफ्फराबाद, मिरपूर भागात आता लाहोर वगैरे पंजाब प्रांतातील लोक जाऊन सेटल झाले आहेत त्यामुळे pure ती संस्कृती उरली नाही फारशी.