मी आणि पुस्तके - २०२०

Submitted by अज्ञातवासी on 16 January, 2020 - 03:32

दोन तीन महिन्यापूर्वी मी नारायण धारपांच्या पुस्तकाविषयी धागा काढला होता.
आता २०२० मध्ये वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहण्यासाठी हा धागा...
(जर नारायण धारपांच्या पुस्तकाविषयी माहिती त्याच धाग्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये येईल!)
आणि शक्यतोवर मराठीच पुस्तके असतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'जिहाद' हे हुसेन जमादार यांनी लिहिलेलं पुस्तक पूर्ण वाचलं. खरं सांगायला गेलं तर अशा पुस्तकांमध्ये मला अजिबात रस नसतो.
हुसेन जमादार यांची आत्मकथा असं जिहादच वर्णन करता येईल. त्यांचं बालपण, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई यांच्याबरोबरीने केलेलं काम, तलाक मुक्ती मोर्चा, अशा अनेक घटना यात येतात.
मुस्लिम समाजातील अनेक चालीरीती आणि अनिष्ट परंपरा या पुस्तकातून कळल्या.

नॉट विदाउट.... मी देखील वाचलं आहे. खूप दिवस मनावर परिणाम करणारे पुस्तक आहे हे. तितकाच सुटकेचा भाग रोमांचक आहे.

@ आदू - नॉट विदाऊट माय डॉटर हे बरंच गाजलेलं पुस्तक आहे, पण कधी वाचावेसे वाटले नाही Happy
थँक्स फॉर अपडेटिंग.

मी वाचलेलं पुढील पुस्तक म्हणजे तुंबाडचे खोत. जबरदस्त आहे. कोकणचे वातावरण, पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष, बेरकी कोकणी माणसे यांचं जबर चित्रण आहे.

- नॉट विदाऊट माय डॉटर हे बरंच गाजलेलं पुस्तक आहे, पण कधी वाचावेसे वाटले नाही >>> मी ही बरेच दिवस वाचायचे टाळत होते.
एकदा नेटाने वाचायला घेतले. सुरुवातीचा बराचसा भाग , बेटीचे विचार , वागणं पूर्वग्रहदूषित वाटलं.
पण तिच तिथे अडकणं , सुटकेचे प्रयत्न ,सुटका सगळं थरारक आहे.

लोकहो, सध्या कोण काय वाचतंय यावर चर्चा करण्यासाठी वाचनकट्टा हा धावता धागा आहे.
https://www.maayboli.com/node/38865

वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल लिहिण्यासाठी 'मी वाचलेले पुस्तक ०२' हा धागा आहे.

हा अज्ञातवासी यांचा वैयक्तिक ट्रॅकर धागा आहे.

@स्वस्ति - वेळ मिळाल्यावर वाचून बघावं लागेल मग. पण हे दहशतवाद, धार्मिकता वगैरे वाचायला बोअर होतं. Lol
@ललिता प्रीती - लिहू द्या हो. मलाही वाचायला काही नवीन मिळेल, कारण बरीच चांगली पुस्तके इथल्या चर्चेतूनच कळतात.

ललिता प्रीति+१.
अमकं पुस्तक वाचलं, आवडलं , इतकंच लि हीत असाल तर ठीक. पण सविस्तर अभिप्राय लिहीत असाल तर मी वाचलेले पुस्तक वरच लिहा.

Mi hi..vachlay..charchowghi..original little women..tumbadche khot maze all time favourite..2 khand ahet...padghavali..vachlay.go ni dandekarani kokanch itke sunder varnan kelay....kokan jaun baghen ale....not without my daughter..vachlay..avdale..

शांताबाई शेळके यांनी भाषांतर केलेले "चारचौघी" . निरागस वयातल्या बहिणींंची गोष्ट. अप्रतिम आहे......सहमत.
हे पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचते. याने मला मार्मीसारखे पालकत्व आणि मुलींसारखे मैत्र शिकवले. पिक्विक क्लब आणि पोस्ट , मेग चे प्रेम, ज्यो चा संघर्ष, बेथचा आजार Amy ची युरप ट्रिप, Lorry, Aunt March, बाअर....
I can't stop talking about it..So I better stop now Happy !
पडघवली मलाही खूप आवडले.

ते ३५ दिवस हे पुस्तक वाचून संपवलं. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या वेळी झालेल्या घडामोडींचा यात वेध घेतला आहे. जर या दिवसात बातम्या नीट फॉलो केल्या असतील, तर हे पुस्तक वाचण्याची गरज नाही. काही प्रकरणे तर मुद्दाम घुसवली आहेत.
परवाच पडघवली सुरू केलं वाचायला. सुंदर आहे. तुंबाडसारखच.. Happy
इथे आलेले प्रतिसाद बघून आता चारचौघी वाचाव असं वाटतंय

ओरिजिनल 'Little Women' आणि शांता शेळकेंचं "चौघीजणी " दोन्ही मस्त च आहेत. ज्यो प्रचंड आवडते.
कोणी भालचंद्र नेमाडेंचे 'हिंदू ' वाचले आहे का ? मी सुरवात केलीये पण, झेपतच नाहीये.

मीसुद्धा हिंदू वाचायला सुरुवात केली होती, समहाऊ नाही कनेक्ट होऊ शकलो.
किंबहुना मी नेमाडेंशी कनेक्टच नाही होऊ शकलो. कधीच नाही.
मग वेळ होता, म्हणून काजळमाया पुन्हा वाचून काढलं Happy

कोणी भालचंद्र नेमाडेंचे 'हिंदू ' वाचले आहे का ? मी सुरवात केलीये पण, झेपतच नाहीये.>>>>>> मी वाचले.आधी वाचायची टळली होती.पण बऱ्याच वर्षांनी वाचायला घेतली.पहिल्यांदा आपण काय वाचत आहोत हेच कळत नाही.नंतर कादंबरी आपली पकड घेते.जरूर वाचा.

आज दोन कादंबऱ्यांचं पुन्हा binge रिडींग केलं

१. Accidental Prime Minister - मनमोहन सिंग यांच्या upa १ च्या कार्यकाळात आधारित हे पुस्तक. यात साचेबद्धरित्या बऱ्याच घटना आल्या आहेत. संजय बारू यांचा त्यांचं महत्व पंतप्रधानांना किती वाटत होतं, हेच ठसवण्याचा प्रयत्न दिसतो. मनमोहनसिंग यांनी असहायता, मात्र त्यातही त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व यात चांगल्या रित्या समोर येत.
२. समांतर - वेबसिरीज बघून ही कादंबरी वाचवीशी वाटली. एक अतिशय सुंदर कल्पना शेवटाकडे जाताना साधारण व अतिरंजित वाटू लागते. शेवटही अतिशय वाईटरित्या गुंडाळला जातो, आणि फ्रँकली, बरचस रहस्य आधीच कळून जातं आणि लूप होल्स ही आहेतच.

मी विक्रम सेठचे टु लाइव्ह्ज नुकतेच संपवले. बरेच जाडजुड आहे. नाझी काळात जर्मनी आणि इंग्लंडम्ध्ये वास्तव्य केलेल्या विक्रम सेठ यांच्या काका व काकूची कहाणी आहे. फार हृदयस्पर्शी असून खूप सुंदर शैली आहे. विशेष करून नाझींनी त्यांच्या काकूच्या माहेरच्या लोकांसाठी औश्विट्झची मूळ कागदपत्रे त्यात असल्याने अंगावर शहारा येतो. अत्यंत सुंदर शैली आणि त्या कालात परदेशात स्थायिक झालेल्या वा द्वितीय महायुध्दात भाग घेतले ल्या भारतीयांचे उत्तम चित्रण आहे. शांती हे त्यांचे काका व हेन्नी ही त्याची मूळ ज्र्मन काकू. काकांचा एक हात महायुध्दात गमावला गेला अहे. ते लंडन मध्ये एका हाताने दंतवैद्य म्हणून प्रॅक्टिस करायचे.... मला खूप वाचनीय वाटली

रेवयु तुमच्या डिटेल रिवयु साठी थँक्स Happy
प्रज्ञा मी सुवर्णगरुड वाचलंय, अतिशय सुंदर आणि वाचनीय पुस्तक...

Pages