आयुष्याच्या वळणावर.....

Submitted by prernap1412 on 13 June, 2020 - 11:07

आयुष्याच्या वळणावर…. !
आयुष्याच्या वळणावर भेटती कित्येक चेहरे
किती खोटे किती खरे मना पडे संभ्रम रे.. ll
कुणी स्वागत करतं हसून
कुणी जातं डंख मारून
स्वागत दोघांचे करावे हसून
असतं आपल्या मनावर हेच खरे जीवन रे
आयुष्याच्या वळणावर भेटती कित्येक चेहरे… ll
कुणी फसवी गोड बोलून
तर कुणी जाणून बुजून
बोलावं अशांशी मोजून मापून
नाचू नये त्यांच्या तालावर स्वतःला सावरी रे
आयुष्याच्या वळणावर भेटती कित्येक चेहरे… ll
नाती-गोती सुद्धा असून
तपासणी करिती कसून
प्रसंगी जाती निसटून
रागवायचं कुणावर प्रश्नचिन्ह हे पडे रे
आयुष्याच्या वळणावर भेटती कित्येक चेहरे… ll
जग हे असे चुकलंय कळून
अखेर त्याला स्मरुन
आळवावे कळवळून
भार सारा अव्यक्तावर तूच आता तारी रे
आयुष्याच्या वळणावर भेटती कित्येक चेहरे
किती खरे किती खोटे मना पडे संभ्रम रे ll

प्रेरणा पाटकर

Group content visibility: 
Use group defaults

खरंय!
माझी अशीच एक कविता आठवली. तिची रिक्षा!
आयुष्याच्या वाटेवर..
https://www.maayboli.com/node/70368