करोना काळात आणि नंतरच्या जगात काय व्यवसाय / उद्योग करता येतील?

Submitted by मामी on 9 May, 2020 - 01:26

जगायचं, तगायचं आहे आणि पुन्हा उभारीनं आयुष्याला भिडायचं आहे.

कबुल आहे, प्रसंग बाका आहे. नोकरीची शाश्वती नाही. खूप अनिश्चितता आहे. पण हातपाय गाळून बसून काय होणार? पेला अर्धा रिकामा आहे बघण्यापेक्षा तो अर्धा भरलाय हे लक्षात घ्या. आजूबाजूला वाईट घटना घडत आहेत पण आपल्या जमेच्या बाजूलाही अनेक गोष्टी आहेत. अनिल अवचट म्हणतात तसं 'तरी बरं...... अमुकतमुक घडलं नाही. " हा सकारात्मक दृष्टिकोन.

आपल्याकडे (निदान आपल्यासारख्या मध्यमवर्गाकडे. सध्या या धाग्यापुरतं आपल्यावर फोकस करू कारण ते करतानाच कदाचित आपण इतर वर्गाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकू ) मेंदू आहे, हात पाय धड आहेत, डोक्यावर छप्पर आहे, बँकेत थोडीफार का होईना शिल्लक आहे, हाताशी स्मार्टफोन / कॉम्पूटर / इंटरनेट आहे, व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुक / मायबोलीसारख्या साईटमुळे झालेले सोशल नेटवर्क आहे. बरंच आहे की भांडवल. जर गरज पडली तर किंवा यानिमित्ताने आपला व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करूयात का?

या धाग्यात खालील मुद्दे विचारात घेऊ :

* या करोनाच्या काळातही आपल्याकडे अजूनही हातात काय आहे? किंवा यामुळे काय मिळालंय?
* व्यवसाय करण्याची इच्छा आहे का? त्या दिशेने कधी विचार केला आहे का?
* कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येतील?
* आधीच कोणी सुरूवात केली असेल तर आपले अनुभव इतरांबरोबर शेअर करू
* तुम्हाला व्यवसाय करायचा नाहीये पण काही कल्पना मांडायच्या असतील तर त्या इथे मांडता येतील. इतर कोणाला त्यापासून स्फुर्ती घेऊन काही सुरू करता येईल.

Group content visibility: 
Use group defaults

सच मला अजून एक service/ अ‍ॅप मिळालं तर हवं आहे पण ते बरचंस स्वप्नरंजन ह्या category मधे मोडतं. रेसिपीज सांगणारे अनेक अ‍ॅप्स किंवा चॅनल आहेत. पण मला अशी काहीतरी सर्व्हीस हवी आहे: माझ्या घरात उपलब्ध असणार्‍या गोष्टी आणि माझ्याकडे असणारा वेळ, असा डाटा मी त्या अ‍ॅपला सांगितला की ते अ‍ॅप मला उपलब्ध साहित्यातून बनणार्‍या रेसिपीज सुचवेल.>>>
सोहा , भरपुर अ‍ॅप अव्हाईलेबल आहेत मार्केट मध्ये. फक्त भारतीय पदार्थांच आहे कि नाही माहित नाही. पण सध्या इकडे उपलब्ध असणार्‍या अ‍ॅपमध्ये भारतीय पदार्थ आहेत.
SUPERCOOK
dinner spinner

>>निव्वळ बनवायचे म्हणून अ‍ॅप बनवण्यात काही अर्थ नाही. मुद्दा हा आहे की त्यातून monetization कसे करणार म्हणजे पैसे कसे कमावणार?

मेम्बर शिप नसलेली किंवा काही न विकणारी अ‍ॅप्स अ‍ॅड चालवून पैसे कमवतात. हे पॅसिव्ह इनकम असते. बरीचशी लोक असे मल्टीपल अ‍ॅप्स बनवतात आणि त्यावरून पैसे कमवतात.

पर्यावरणवादी समुह अथवा पर्यावरण सुधारण्यासाठी काही काम करण्याची इच्छा असल्यास असे एखादे स्टार्टप सुरू करता येईल :

मोठमोठ्या सोसायट्यांमधून तयार होणारा सुका कचरा एकत्रितरित्या म्युनिसिपाल्टीत जातो. त्याऐवजी अशा सोसायट्यांशी बोलून जर रोज एका प्रकारचा सुका कचरा गोळा करता येऊ शकतो. उदा, सोमवारी कागद, मंगळवारी काच, बुधवारी प्लॅस्टिक, गुरुवारी बॉक्सेस, शुक्रवारी धातुचे सामान इ.

अशाप्रकारे गोळा केलेला कचरा पुढे रिसायकलिंग / रियुज साठी पाठवता येईल किंवा यातील एखाद्या प्रकारच्या कचर्‍याचे रिसायकलिंग करण्याचा व्यवसायही सुरू करता येईल.

कोणताही व्यवसाय करा, फक्त त्याची जाहिरात पेपर, रेडिओ , TV इ. वर करा, मोबाईलवर sms, WhatApp मेसेज पाठवून नको. (स्वतःच्या WhatsApp Status वर ठेवायला हरकत नाही.) लोकांनी त्यांचे फोन स्वतःच्या वापरासाठी, मनोरंजनासाठी घेतलेले असतात. ती काही तुमची वडिलोपार्जित संपत्ती (खूप सभ्य शब्द!) नव्हे की ज्यावर संदेश पाठवून तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करावी! मी अशाप्रकारच्या telemarketing / sms marketing च्या सक्त विरोधात आहे. https://www.maayboli.com/node/64119

त्याऐवजी अशा सोसायट्यांशी बोलून जर रोज एका प्रकारचा सुका कचरा गोळा करता येऊ शकतो >> असे अनेक व्यवसाय already सुरू आहेत. आमच्या सोसायटीत गेले २ वर्ष अशी सर्व्हिस एक private company देते. फक्त ते दर आठवड्याल येत नाहीत तर दर महीन्याला येतात.

काल एक व्हिडीओ आला वाॅशिंग पावडर बनवायचा जो निसर्गपुरक आहे. फार गुंतवणूक नाहीये व सोपा कोणीही करू शकेल असा आहे. पर्यावरणपुरक गोष्टींना स्कोप आहे.

आज दोन टिकटॉक विडिओ आले, एका जोडप्याचे. अगदी सर्वसामान्य छोट्या शहरातील गरिब-मध्यमवर्गातील मध्यमवयीन नवराबायको. ६०-७० च्या दशकातल्या हिंदी चित्रपटातील गाण्यावर, मोबाइलच्या छोट्याश्या उभ्या स्क्रिनमधे मावतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल इतका नाच करत होते. बरोबरीला पाठवणार्‍याची टिप्पणी असे विडिओ असल्यास चीनच भारतातून टिकटॉक बॅन करेल.
विनोदाचा भाग सोडल्यास लक्षात येते की एका विशिष्ट सामाजिक स्तरात स्वतःला एक्स्प्रेस करण्यासाठी अश्या एखाद्या प्लॅटफॉर्मची गरज आहे जी सध्या टिकटॉक पुर्ण करते आहे.
सध्याच्या आत्मनिर्भर भारताला अशा एखाद्या सॉफ्टवेर आंत्रप्रुनरची गरज आहे. एनि टेकर्स?

माझ्या नात्यातील एकांनी deep cleaning/सॅनिटीझशन चे ट्रेनिंग घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. घर/ऑफिसेस/मॉल्स/दवाखाना स्वच्छ करण्याची सेवा ते पुरवतात. सध्या मुंबई आणि परिसरात सेवा उपलब्ध आहेत. पुण्यात एकावेळी तीन ते चार काम असली तर तिथेही सेवा देऊ शकतात.

https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-rohan-pednekar-asking-for...

हे इथे पोस्ट केलेलं चालेल का, सहज बघण्यात आलं माझ्या. मी शाकाहारी असल्याने मासे खात नाही आणि दादर ते बोरीवली भागात पण राहत नाही. ह्यालापण ओळखत नाही मी पण तो काहीतरी मेहनत करतोय, मनोरंजन क्षेत्र ठप्प झाल्याने म्हणून शेअर करावासा वाटला.

काही कल्पना छान आहेत.
मी माझ्या व्यवसायात हँड सॅनिटायझर ही नवीन प्रॉडक्ट लाईन सुरू केली आहेत. सॅनिटायझर ला इथून पुढे काही महिने मागणी राहणारच आहे असं वाटतंय.

( on second thought ही जाहिरात वाटत असल्यास पोस्ट काढू शकते )

घर ऑर्गनाईज करून देणे ,किचन , कागदपत्र इत्यादी सॉर्ट करून लाऊन देणे असा व्यवसाय इथे अगदी जोरात चालतो. भारतात चालेल का ?

घर ऑर्गनाईज करून देणे ,किचन , कागदपत्र इत्यादी सॉर्ट करून लाऊन देणे असा व्यवसाय इथे अगदी जोरात चालतो. >>> हे काहीतरी नविनच आहे. जरा तपशीलवार लिही ना सीमा.

इथे अगं बर्‍याच जणांनी कंपनी स्थापन केल्या आहेत किंवा एकएकटे पण येतात. ही कंपनी सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे.
https://thehomeedit.com/
या दोघीजणी किम कार्देशियन वगैरे सेलीब्रेटीजचे घर ऑर्गेनाईज करून दिल्यामुळ खुप लाईमलाईट मध्ये आहेत. ह्यांचे कंटेनर स्टोअर्स (इथे फक्त ऑर्गानाईज करण्याच्या वस्तु मिळतात. अत्यंत आवडते दुकान ) बरोबर टाय अप आहे. त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन आणि सेलीब्रेटीजचे रिव्युज यामुळ यांना एकदमच प्रसिद्धी मिळाली आहे.
परंतु लहान प्रमाणावर एकएकटे येवून तुमचे घर ऑर्गनाईज करून देणारे पण भरपुर आहेत. अवरली रेट घेतात. आपण त्यांना आपले रुटिन , सवयी , सतत लागणार्‍या वस्तु वगैरे गरजा सांगायच्या. ते लोक प्लॅन करून दाखवितात. पसंत पडले कि काम सुरु करतात. सगळे सामान लावून दिले कि मेंटनन्स साठी परत दर तीन महिन्याला वगैरे चक्कर टाकतात.
आपल्याला वाटते त्यात काय आपण पण घर लाऊ शकतो पण बर्‍याच लोकांना ते खुप ओव्हर्व्हेल्मिंग वाटु शकते किंवा ते करण्याची कला अवगत नसते. हे लोक तुमच्या सवयींचा वगैरे विचार करून ऑर्गनाईज करतात .

आम्हाला जुन्या फोटोज च डिजिटल रूपांतर करून हवंय. आपण फोटोकॉपी कशी फास्ट काढतो तसं फास्ट. भारतात कोणी असं करुन देत का? अति पैसे घालवायचे नाहीत. घरी scanner आहे पण खूपच फोटोज आहेत त्यामुळे सुरुवात पण करायला कंटाळा येतो.

यावरून सुचली एक कल्पना :

जसा पूर्वी संस्थानिक / अति श्रीमंत घरांतून एक मॅनेजर असे तसा कधी कधी आपल्याकडेही असावा असं वाटतं. म्हणजे घरातल्या रोजच्या बारीकसारीक गोष्टींकरता फक्त अश्या मॅनेजरला फोन करायचा की things will be taken care of.

हल्ली सिनियर सिटीझन्स करता अश्या सर्व्हिसेस देणारे लोकं आहेत तेच ही कामं करू शकतील. बाहेरून काही आणणे / आणवणे, घरातील बारीकसारीक रिपेअर्स, बदल, खरेद्या इ.

जरा विस्कळीतच आहे माझी कल्पना पण यात अजून विचार करून रंग भरता येतील.

आम्हाला जुन्या फोटोज च डिजिटल रूपांतर करून हवंय. आपण फोटोकॉपी कशी फास्ट काढतो तसं फास्ट. भारतात कोणी असं करुन देत का? अति पैसे घालवायचे नाहीत. घरी scanner आहे पण खूपच फोटोज आहेत त्यामुळे सुरुवात पण करायला कंटाळा येतो.

>>> आईशप्पथ मलाही हे करून हवंय. कोण करणार हे बोअर काम असं झालंय.

https://www.youtube.com/watch?v=TfC691rw2Ww
इथे बघा प्रिंट फोटो कसे डिजिटल करता येतात ते. पण भारतात फोटो जिथे डेव्हलप कऋन देतात तिथे देत असणार आहेत.
त्यावरुन आठवलप, जुन्या बर्‍याच कॅसेट होत्या कोल्हापुरात घरी. त्या MP3 करून हव्या होत्या . अ‍ॅमेझॉनवर गॅजेट मिळाल त्यासाठी.

एक खाऊ पिऊ बिझिनेस मॉडेल : मी नुकताच एक शिवाजीपार्क भागातील व्हॉट्सअ‍ॅप गृप जॉईन केला होता. ज्या माणसानं हा गृप काढला होता, तो आणि त्याची आई जेवणाचा एखादा पदार्थ अथवा काही स्पेशल नाश्ता करतात आणि हे आधी ४-५ दिवस गृपवर घोषित करतात. उदा. मंगळवारी तो अनाउन्स करतो की येत्या रविवारी बटर चिकन करणार आहे. एक पोर्शन = ३०० ग्रॅम. डिलिवरीची वेळ : दुपारी १२.००. एकच प्रकार फक्त.

मग त्या गृपवरचे (आणि शिवाजीपार्क परिसरातच रहाणारे) लोकं आपापली ऑर्डर नोंदवतात. कोणी १, कोणी ३, कोणी २ ....... तो शनिवार संध्याकाळ पर्यंत ऑर्डर स्विकारतो आणि मग रविवारी दुपारी अर्ध्या-पाऊण-एक तासात सरळी डिलिवरी पूर्ण करून टाकतो. सगळे अगदी जवळच रहात असल्यानं तो पटापट टू व्हिलरवर डिलिवरी करतो. मला वाटतं तो गेटवरच डिलिवरी देतो त्यामुळे स्कूटर पार्क करा रे, बिल्डिंगमध्ये जा रे, चार वाक्य बोला रे वगैरे वेळ वाचतो. जर त्याला अपेक्षित आहे तितकी ऑर्डर मिळाली नाही तर सरळ कॅन्सल करतो. मी जॉईन केल्यावर त्या रविवारी त्यानं मटण ठेवलं होतं. ( रु. १७५ पर पोर्शन म्हणजे ३०० ग्रॅम) मीच त्यातल्या त्यात लांब म्हणून स्विगी जिनीवरून पाठवलं. छान घरगुती चव होती. मग एकदा त्यानं मधल्याच कोणत्यातरी वारी दुपारी बटाटेवडे आणि चटणी असा बेत जाहीर केला. रु. ७५ पर प्लेट म्हणजे २ ब.व. हे मी मागवले नव्हते. पण गृपवर लगेच सगळ्यांनी अभिप्राय दिले त्यावरून साईज मोठी होती आणि चविष्ट होते. एकदा त्यानं साबुदाणा वडा आणि अजून काहीतरी करण्याचा बेत आखला. पण त्या दुसर्‍या पदार्थाला फार मागणी नव्हती म्हणून तो पदार्थ आदल्या दिवशी वगळून टाकला आणि फक्त साबुदाणा वडा केला.

स्विगी जिनीवरून वगैरे मागवणं बोअर झालं म्हणून मी तो गृप सोडला. पण हे मॉडेल कोणाला हवं तर वापरून आपल्या सोई सवडीनं पण पुरेश्या रेग्युलरली पदार्थ करून आजूबाजूच्या परिसरात बिझिनेस करू शकता. सुरवातीला अगदी पाच लोकं असतील पण घरगुती, चविष्ट, ताजे, योग्य दरातील पदार्थ आणि तत्पर डिलीवरी अशी चोख सेवा दिली तर पुढे अजूनही कस्टमर्स मिळत राहतील.

मोठी बिल्डिंग, मोठी सोसायटी असेल तर उत्तम मागणी असेल.

हे असं ऑलरेडी चालू आहे बऱ्याच सोसायटीमध्ये. आमच्या सोसायटी ( एकूण 10 बिल्डिंग) मध्ये एप्रिल पासून चालू आहे. पण हौस म्हणून आहे मोस्टली . सेम पद्धत आहे आणि विकली मेन्यू असतो , बऱ्यापैकी महागच असतो. म्हणजे रगडा पॅटिस रु. 100, पिझ्झा 200, सामोसे 60, मोदक 35 ला एक. मल्टिप्लेक्स रेट्स थोडक्यात. आमच्या इथे आधी किचनची तपासणी होते त्यात पास झाला तरच विकता येतात पदार्थ. आता 4/5 महिनायनी सॅलड वर आले आहे , वजन वाढली लोकांची. सलाड अजून महाग फक्त Happy पॅकिंग मात्र खूप टकाटक असत.

आमच्याही सोसायटीत हे चालू आहे.

करोनाच्या आधीपासून काही लोक करत होते..... करोनाच्या दरम्यान काही लोकांनी नव्याने सुरुवात केली.

प्रतिसाद पण बरा असावा.
बाहेरुन पूर्णपणे अनोळखी लोकांकडून काही मागवण्यापेक्षा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय वाटत असावा लोकांना!

माझ्या एका मित्राचा आधीपासूनच फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता.... करोना सुरु झाल्यावर एकदोन महीन्यात त्यानी contactless (पायाने दाबून ऑपरेट करता येणारे) सॅनिटायझर स्टॅंड बनवून विकले.... सुरुवातीला खुप खपले.... नंतर बरेच जण उतरले या मार्केटमध्ये आणि मग किमतीही उतरल्या.

Pages