मालवणी टोप-पोळी

Submitted by अन्नपूर्णा on 2 June, 2020 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

आमचं लहानपण कोंकणातल्या एका खेड्यात गेलं. फारशा दळणवळणाच्या सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी. तेव्हा वाढदिवस साजरा करायचा म्हटलं कि माझी आई सकाळी अंघोळ- देवपूजा झाली कि आम्हाला ओवाळायची आणि काहीतरी गोडाधोडाचं आमच्या आवडीचं खायला करायची. मग कधीतरी वाढदिवसाला cake कापण्यासाठी आमचा हट्ट सुरु झाला. पण त्या गावी cake मिळणं दुरापास्त. मग आईने एक शक्कल लढवली. तिच्या आजी- पणजी पासून चालत आलेला एक पारंपारिक पदार्थ बनवून ती आम्हाला cake म्हणून द्यायची. आम्ही महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जाईपर्यंत याच cake सोबत आमचे सगळे वाढदिवस साजरे झाले. तर आता नमनाला घडाभर तेल ओतून झाल्यानंतर मी या पदार्थाची सविस्तर कृती सांगते. पदार्थाचं नाव आहे टोप-पोळी. आता हे नाव कसं पडलं ते अज्ञात. पण कोकणातील खासकरून सिंधुदुर्गातील कोणत्याही घरी केल्या जाणाऱ्या गोडाच्या पदार्थांपैकी हा अव्वलच.

साहित्य: कोकणातील ८०% पदार्थासाठी जे असते तेच.
पाव किलो तांदूळ(उकडा असेल तर धावेल), पाव किलो गूळ, २ चमचे तूप, १ कप ओल्या नारळाचे खोबरे, पाव कप शेंगदाणे(भाजून सोललेले), १/२ चमचा वेलची पावडर, हळद पाव चमचा, काजू आवडीनुसार, चिमूटभर मीठ(ऐच्छिक). [या प्रमाणासाठी मी Wonderchef Granite Die-Cast कॅस्सेरोळे चे मधल्या आकाराचे भांडे घेतले होते. त्या आकाराचा कोणताही जाड बुडाचा टोप चालेल.]

क्रमवार पाककृती: 

कृती: प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा. नंतर ते भाजून घ्या. (करपता नयेत). मग मिक्सरमध्ये जाडसर भरड काढून घ्या.(रव्यापेक्षा जाडसर). १ तांब्या पाणी तापत ठेवा. त्यात वेलची पूड, गूळ, खोबरे, शेंगदाणे, हळद व चवीनुसार मीठ टाकून ढवळा. नंतर तूप टाका. पाण्याला चांगली उकळी फुटल्यावर त्यामध्ये तांदळाची भरड थोडी थोडी घाला आणि सतत ढवळत राहा. गुठळी होता काम नये. हे जरा कौशल्याचे काम आहे. मिश्रण घट्ट झाले कि गॅस मंद करून झाकण लावून ठेवून द्या. ५ मिनिटांनी गॅस बंद करा. पूर्ण थंड झाले कि एका ताटात टोप उपडी घालून टोप- पोळी काढून घ्या. cake प्रमाणे तुकडे करून खायला तयार.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

वर दिलेला वेळ अंदाजे आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

आम्ही, ” टोपातला“ म्हणतो. वरती निखारे ठेवून भाजतो.
सिंधूदुर्गातच नाही करत. रत्नागिरीत पण बनवतात.
शेंगदाणे नाही घालत. कोकणात , कुठले शेंगदाणे होते मॉप..

हा एकच प्रकार आहे... यात अ‍ॅडीशनल फक्त तवसं घातलं आहे..साधारणतः हे असच बनतं.>>चवीत थोडा फरक पडत असेल बहुधा.
शेंगदाणे नाही घालत. कोकणात , कुठले शेंगदाणे होते मॉप..>>हे जरा अपग्रेडेड version

व्व्वा अन्नपूर्णा . मस्तच . माझा अतिशय आवडता पदार्थ.
माझी आत्या , अजूनही कधी माहेरी आली की माझ्यासाठी बनवून आणते .

मस्त रिसिपी अनघा.

आठवणीतला पदार्थ, आमच्याकडे हल्ली क्वचितच करतात. वर्षातुन अगदी एखाद्या वेळी.
टोपातलं आणि टोपपोळी एकच प्रकार. नावे प्रदेशानुसार बदलतात आणि एखादा दुसरा जिन्नस अ‍ॅडलेस होतो बास.
यामध्ये काकडी / तवसं घातल की त्याच नाव धोंडास.