Submitted by मनोजकुमार देशमुख on 31 May, 2020 - 04:52
पाहता वळून मागे
दिसते गर्दी चूकांची
सोडून मोती ते सारे
केली वेचणी फुकांची
डोळे भरून हिरवा
नाही पाऊस पाहिला
आतून सूर लावत
नाही मल्हार गायिला
जोडून छंद नवखे
कुठे स्वानंद शोधला
अर्थार्जनात केवळ
तो मी आनंद शोधला
मी जाऊन मंदिरात
ना अहंकार सांडला
देऊन दान भक्तीचा
कसा बाजार मांडला
इवलेच पोट माझे
हे उशिराच कळाले
क्षण अनमोल सारे
ते हतातूनी गळाले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर प्रयत्न. पाहता वळून
सुंदर प्रयत्न. पाहता वळून मागे ......
सुंदर कविता
सुंदर कविता
धन्यवाद किशोर मुंढे
धन्यवाद किशोर मुंढे
रूपाली विशे - पाटील
सुरेख !
सुरेख !