ढासळला वाडा

Submitted by पाषाणभेद on 29 May, 2020 - 02:55

खालील फोटो पाहून सुचलेली कविता:

85152221_713202812750586_7242273081144639488_o.jpgफोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune

ढासळला वाडा

ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती

सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या
दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या

टणक होते जूनेर लाकूड, उन वारा पाऊस खाऊन
भुगा केव्हाच झाला त्यांचा, अंगी खांदी वाळवी लेवून

भक्कम चिर्‍या दगडांची ढिसळली छाती
लेपलेल्या चूना पत्थरांची झडली माती

पक्षी उडाले, गडी माणसे गोतावळा गेला
कुबट भयाण गूढ अंधार काळा उरला

जुन्या पिढीने भोगले, जूनेच वैभव लयास गेले
नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे आले

- पाषाणभेद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(या वरूनच सुचलेल्या आगामी आकर्षणाची झैरात येथेच उरकून घेतो. Happy . )
(लॉकडाऊनमुळे एकाच स्क्रिनवर खेळ दाखवण्यात येईल. तिकीट दर जास्त असू शकते. त्वरा करा अन थेटरमध्येच पहा.)

नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे.

- क्रमशः

जुन्या पिढीने भोगले, जूनेच वैभव लयास गेले
नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे आले

वाह! मस्तच आहे कविता.

छान आहे कविता.. आमच्या आजीचा खेड्यावर असाच भक्कम जुना वाडा होता. लहान असताना लपाछपी खेळायचो, आता वाडा गेला, ढीग तेवढे उरलेत.

मिसळपाव वर पूर्ण वाचले, छान . पण तिकडे आम्हाला लॉकडाऊन आहे.

साक्षात्कार म्हणून शिरवळकरांची कथा आहे

एक मनुष्य खूप वर्षांनी खेड्यात जातो, तिथे सगळे बदललेले असते,
त्याला उगाचच आलो असे वाटू लागते, वाडा पाडून नवीन बांधलेला असतो , गाव बदललेले असते.

शेवटी पुन्हा घरी परततो तर रात्र होते
तो कसाबसा जेवतो, बाल्कनीतून बघतो तर एक मनुष्य कावराबावरा होऊन फिरत असतो
हा कोण ? म्हणून तो हळूच त्याच्या मागे जातो तर तोही मनुष्य बडबडत असतो, पूर्वी इथे आम्ही एका वाड्यात रहायचो, आता सगळे बदलले आहे, ही बिल्डिंग बांधून त्यात हे नवे लोक रहात आहेत
Proud

त्यातले गावाचे , वाड्याचे वर्णन अगदी तुमच्यासारखेच आहे. एकच मनुष्य आणि 8 - 10 पाने नुसते वर्णन , कळत नाही , ह्यात कथा कुठे आहे ? पण शेवटच्या 8-10 ओळीत कथा बदलते.

तुम्ही त्या वाड्याकडे गेलात तेंव्हा तुमच्या आताच्या बिल्डिंगकडेही कुणीतरी येऊन गेला असणार !
Proud