पाऊस

Submitted by _तृप्ती_ on 20 May, 2020 - 23:06

कालचा पाऊस खिडकीशी थडकला, गालावर ओघळला
तसे त्याचे येणे जाणे नित्याचे, कधी भरतीचे, कधी सरतीचे

वीज कडाडली, काच तडकली,आवाजही झाला
ढगांचा गडगडाट, तुटण्याचा आवाज मीच ऐकला

त्याला पर्वा नव्हती कशाची,कोसळत होता
आडवा तिडवा, बेभरवशी अन सैरावैरा

मेघ आटले, तोही थकला अन मग थांबला
आता मला कळले तो मला आरपार भिडला

तो मोकळा झाला आणि मी कोसळत राहिले
तडकलेल्या त्या काचेबरोबर तुटत राहिले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान....

मस्त

तो मोकळा झाला आणि मी कोसळत राहिले
तडकलेल्या त्या काचेबरोबर तुटत राहिले
>>>

या कडव्याला भुवया उंचावल्या! मग कविता पुन्हा वाचली समजून घेतली.

व्हाट ए ब्यूटी!!!! _/\_
फार दिवसांनी बेहतरीन कविता वाचली!!

@जव्हेरगंज, तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद. मी फारश्या कविता लिहीत नाही. गोष्ट सहज होते. पण सध्या कविता उतरते आहे तर लिहिते आहे. अजून काही लिहिलं तर पोस्ट करेन.
@सामो, धन्यवाद.