ऊरला नकाशा...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 22 May, 2020 - 03:11

अशी काजळली रात
चंद्र ढगात लपला
जीवनाचा तो प्रकाश
प्रिये कोठे ग लोपला

कसे विझले अकाश
नाही चांदनी पेटत
झोप गेली दुर देशी
नाही पापनी मिटत

अशी एकटीच वाट
का केंव्हाची सरेना
लाख जपल्या जखमा
त्याला काळीज पुरेना

झाला श्रावण पाहुणा
अता ग्रीष्मात जगणे
खडे फेकत नदीत
गोल तरंग बघणे

झाले ओसाड जीवन
वांझ मनाची या आशा
गांव मोडला स्वप्नांचा
फक्त ऊरला नकाशा

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख रचना.
कवितेचा कल थोडा निराशाकडे झुकलेला असला तरी कविता आवडली! Happy