प्रेमाचा सट्टा

Submitted by sumitm on 19 May, 2020 - 23:58

प्रेमाचा सट्टा

सट्टाच म्हणायचा की रे ह्याला,
ह्यात शाश्वती कुणालाच कशचीही नसते !

काही प्रेक्षकात बसलेले, काही शर्यतीत उतरलेले, काही नुसतेच उभे झेंडे फडकवायला!
सगळ्यांचच काही ना काही दाव्याला लागलेल!

कुणाची मैत्री,कुणाची नाती,कुणाची जाती किंवा  कुणाची माती;
निवड कशाची ह्यावरून ठरत नाही परीक्षा त्या प्रेमाची!

निवडी पल्याड आणि एकमेकांशिवाय, तिच्या आणि त्याच्या रुपाने ते जगणार!
ते जगणार आणि व्यक्तीपल्याड  तरणार ह्याची खात्री मात्र नक्की असते!

म्हणुनच पुढच तिकिट काढून,जमलच तर शर्यतीत;
नाहीतर निदान प्रेक्षकात तरी गर्दी करायची असते!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>जमलच तर शर्यतीत;
नाहीतर निदान प्रेक्षकात तरी गर्दी करायची असते!!!>>> हे आवडलं. 'तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' वाले प्रेक्षकही व्हायला आवडते.

प्रेम म्हणजे सट्टा तेव्हा होईल जेव्हा तुम्हाला त्यातून काही मिळण्याची अपेक्षा असेल.
आणि प्रेम म्हणजे फक्त प्रेम. हे तेव्हाच शक्य असेल जेव्हा ते निरपेक्ष असतं.
फक्त माणसाचा मध्येच कधीतरी अपेक्षा प्रेम होतं.

आणि ते जर नसेल तर तुम्ही जनावरात मोडता.