Submitted by _तृप्ती_ on 20 May, 2020 - 23:06
कालचा पाऊस खिडकीशी थडकला, गालावर ओघळला
तसे त्याचे येणे जाणे नित्याचे, कधी भरतीचे, कधी सरतीचे
वीज कडाडली, काच तडकली,आवाजही झाला
ढगांचा गडगडाट, तुटण्याचा आवाज मीच ऐकला
त्याला पर्वा नव्हती कशाची,कोसळत होता
आडवा तिडवा, बेभरवशी अन सैरावैरा
मेघ आटले, तोही थकला अन मग थांबला
आता मला कळले तो मला आरपार भिडला
तो मोकळा झाला आणि मी कोसळत राहिले
तडकलेल्या त्या काचेबरोबर तुटत राहिले
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान....
छान....
आवडली
आवडली
मस्त
मस्त
छान तुलना केली आहे.
छान तुलना केली आहे.
अप्रतिम! कविता आवडली..
अप्रतिम! कविता आवडली..
सगळयांना खूप खूप धन्यवाद !
सगळयांना खूप खूप धन्यवाद !
तो मोकळा झाला आणि मी कोसळत
तो मोकळा झाला आणि मी कोसळत राहिले
तडकलेल्या त्या काचेबरोबर तुटत राहिले >>>
या कडव्याला भुवया उंचावल्या! मग कविता पुन्हा वाचली समजून घेतली.
व्हाट ए ब्यूटी!!!! _/\_
फार दिवसांनी बेहतरीन कविता वाचली!!
आवडली.
आवडली.
@जव्हेरगंज, तुम्ही भरभरून
@जव्हेरगंज, तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद. मी फारश्या कविता लिहीत नाही. गोष्ट सहज होते. पण सध्या कविता उतरते आहे तर लिहिते आहे. अजून काही लिहिलं तर पोस्ट करेन.
@सामो, धन्यवाद.
सुंदर कविता
सुंदर कविता