युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता, तुमच्याकडे भारतातले आंबे आले की सा. अमेरिकेतुन?>> नाही नाही यन्दा भारतिय आन्बे अजुनतरी नाहि आले, एरवी मॅरेथॉन, केन्ट वैगरे येतात पण तेही नाही आले, हे आपले असेच अमेरिकन ग्रोसरी मधुन आणलेत.
त्याच्या बॉक्स मध्ये गवतावर असतील तर तसेच राहू देत. पिकतात १-२ दिवसात >> योकु ही एश फक्त देशात रे ! इकड काही नाही तस, फ्रिज शेजारी ठेवलेत बहुधा पिकतिल तसेच अस वाटतय, सध्या वॉर्म पण आहे वेदर.

जुन्या स्वेटर मध्ये गुंडाळून ठेवले आंबे तर मस्त आणि लवकर पिकतात हा लंडनच्या उन्हाळ्यातल्या थंडीत घेतलेला अनुभव आहे.

वर ममो म्हणाल्या तसे करा किंवा जुन्या चादरीत गुंडाळून आंब्यावर वर्तमानत्र पांघरा.सध्या मी तेच केलंय.
दुसरी पेटी आली आहे,पण सांगितले गेलंय की ५-६ दिवस पेटी उघडू नका म्हणून.नाहीतर आढी घालायची होती.

Gas वर कढईत/ pan मधे केलेले पाव/ब्रेड बेक चांगले झाले तरी वरून पांढरेच रहातायत..वरून ब्राऊन रंग येत नाहीये,वरच्या साईडने gas flame लागत नसल्यामुळे.
पलटी करून अजून थोडावेळ ठेवले तर एकदम कडक होतायत.
दुध/eggwash लावुनही काही फरक पडला नाही.

वेगवेगळ्या Youtube video मध्ये पातेल्यात केलेले पाव तसेच वरुन पांढरे दिसत आहेत.

मी हल्लीच इनो घालून पाव ची कृती बघितली आहे,कोणी केलंय का,नक्की जमतील की कणिक वाया जाईल?काही दुसरी आयडिया आहे का बिना यीस्ट चे पाव बनवायची?

इनो घालून पाव ची कृती बघितली - आयरिश सोडा ब्रेड without yeast सोडा बाय carb वापरून करतात. कदाचित तीच रेसिपी लादीपाव ला वापरली असेल.

रणवीर ब्रार च्या रेस्पीज मध्ये बर्‍याच टीप्स मिळाल्यात त्यातली ही एक आजकाल नेहेमी वापरतो.
कुठलंही ओलं वाटण करताना त्यात ३-४ आईस क्युब्ज घालाव्यात आणि मग पुढे वाटण वाटावं. वाटणाचा पोत, रंग आणि सुवास इनटॅक्ट राहातो. मिक्सरच्या फिरण्यानी जी हीट जनरेट होते ती बर्फानी मिनिमाईज होते. स्पेशली हिरवे वाटणं मस्त हिरवेगारच राहातात.

धन्यवाद देवकी. खरं तर जाळी नव्हत्या पडल्या मला वाटतं बरणी रिफिल करायचं काम ऑटसोर्स केलेलं त्याने थोडा पाण्याचा हात लावला गेला असावा. काही लोकं अशा गोष्टी मस्त लपवतात Wink चाळणीत हलवल्यावर नाहीसे झाले ते जे काही जाळीसारखं दिसत होतं ते. पण पोरं मजा म्हणून सगळं चाळतील असं दिसतंय. युक्तीसाठी धन्यवाद. या अशा परिस्थितीत खराब होऊ नये म्हणून तुम्ही म्ह्टलं तसं भाजून ठेवेन नंतर.
धन्यवाद Happy

Gas वर कढईत/ pan मधे केलेले पाव/ब्रेड बेक चांगले झाले तरी वरून पांढरेच रहातायत >>>>>> पाव बेक करताना वरून झाकण म्हणून गरम केलेला तवा उपडा ठेवायचा म्हणजे वरच्या बाजूनेही व्यवस्थित हीट लागून छान रंग येईल.

भारतातली मंडळी वाळवणाचे प्रकार करुन राहिलीत अन इथे किमान तापमान अजून ३५-४० डि फॅ आहे. कमाल तापमान देखील ६०-६५ च्या वर जात नाहीये. सांडगे कुरडई प्रकार इथल्या उन्हाळ्यात म्हणजे जुलै ऑगस्टमधे करता येतील. तोवर ओव्हनमधे थोडेसे करून बघावेत असा विचार आहे. कोणी करुन बघितले आहे का ? मिपा वर एक रेसिपी होती त्यात २५० डि फॅ वर २०-२५ मिनिटे वाळवा असे लिहिले आहे. मला तरी तेव्हढा वेळ पुरेल असे वाटत नाही. कोणी थंड हवेच्या प्रदेशात ओव्हनमधे केले आहेत का सांडगे ?

इंग्रोला जाणे बंद आहे सध्या लॉकडाउन मुळे. घरात डाळी आहेत पण नस्ते पराक्रम करून डाळी वाया घालवायची वेळ येऊ नये.

आज तुनळी वर पाककृती बघून आंबा शिरा केला. पण फार डोकं न चालवता, नेहमीप्रमाणे २ वाट्या रवा घेतला. त्याला समप्रमाणात आंब्याचा गर, दुप्पट दूध ह्या सगळ्या वाढता वाढता वाढे प्रकरणामुळे भरपूर शिरा झाला. चव चांगली झाली, पण जरा गोडच झाला. आधीच घरी शिरा प्रकार फार आवडीचा नाही, त्यामुळे भरपूर शिल्लक राहिलाय.

आता तो फ्रीजमध्ये डब्यात आराम करतोय. त्याचा काही वेगळा पदार्थ होऊ शकतो का? आहे का काही युक्ती?

शिरा भरुन साटोरी / पुरणपोळी सारखी शिरा-पोळी होते.
ताटात थापून वड्या पाडून येता-जाता एकेक वडी खायची. हे मी गुळाच्या शिऱ्याच करते पण साखरेचं कधी केलं नाही.

आंब्याचा गर दीर्घकाळ कसा टिकवावा? शक्यतो प्रीझर्वेटीव्ह नकोत अशी पद्धत आहे का? नेट वर शोधले तर एकीने नुसताच गर डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवला. एकीने गर खूप शिजवून आटवून फ्रीजरमध्ये ठेवला.
तुम्ही कसा टिकवता?
हाच प्रश्न पाककृती पाहिजे या धाग्यावर पण टाकलाय मी.

गर खूप शिजवून आटवून फ्रीजरमध्ये ठेवला.>>+१
मागच्या भारतवारीत मी असा हापूसचा आटवलेला गर(मावा) विकत घेतला होता. ६ महिने टिकला(म्हणजे संपला).
खूप गर असेल तर त्याची लागेल तशी विभागणी करून ठेवायचा. म्हणजे हवा तेवढा घेऊन वापरता येतो.

मला शिरा बनवताना शिर्याचा रंग थोडा brownish कसा येईल कोणी सांगेल का? मी गोड पदार्थ फारसे बनवत नाही सो काही माहीत नाही मला.. मला एकदम सफेद सफेद दिसणारा शिरा आवडत नाही अजिबात..

एक दिवस आधी केलेला शिरा कढईत मंद आचेवर गरम होऊ द्यायचा. एकदम ब्राऊन आणि कुरकुरीत होतो. अहाहा, पाणी सुटलं तोंडाला.

रवा रंग बदलेपर्यंत चांगला खमंग परतून घ्या तुपावर. आवडत असेल तर साखरेऐवजी गूळ किंवा ब्राऊन शुगर वापरा. नुसत्या पाण्यात शिजवा. (दूध घालू नका).

मला शिरा बनवताना शिर्याचा रंग थोडा brownish कसा येईल कोणी सांगेल का >>>> तुपावर चांगला परतून घ्या आणि भरतनी सांगितलेला उपाय . कडाह प्रसाद बनवताना बराच फरक पडलेला बघितलाय साखरेचं कॅरॅमल करून

कुल्फी साठी म्हणुन condensed milk आणलं. खूप उरलंय. अति गोड आहे. सोप्पं साधं कमी कटकटीचं काही करता येईल काय?

१ वाटी साजुक तूप, ज्या वाटीनी तूप घेतले, त्याच वाटीनी मोजून एक वाटी रवा, तेव्हढीच साखर आणि दोन वाट्या दूध (तापवून, सायीसकट) + लागलं तर अजून. आवडीप्रमाणे केळ्याचे काप, सुकामेवा, केशर इ.

वाटीभर तूप गरम करून त्यात रवा भाजायला घ्यायचा, चांगला सोनेरी रंग आला की थोडं, थोडं गरमच दूध घालून फुलवायचा. नीट शिजल्या सारखा झाला की केळ्याचे काप, सुकामेवा (हा आधी तुपात तळून निराळा ठेवून यावेळी घालता येइल), केशर मंडळींना प्रवेश द्यावा. नीट हलवून साखर घालावी. आणि झाकून ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. सुरेख शिरा होईल.

रवे निरनिराळे असतात, पोतांत फरक असतो सो लागेल तसं अजून दूध घालायला लागेल रवा फुलवायला.

नेहेमीच्या शिर्‍यांच्या अलिखित नियमांप्रमाणे जरा मुरू देऊन नंतर खायला घ्यावा खुमारी आणि चवही जास्त चांगली लागते.

कुल्फी साठी म्हणुन condensed milk आणलं. खूप उरलंय. अति गोड आहे. सोप्पं साधं कमी कटकटीचं काही करता येईल काय? >>> अरे ये पीएसपीओ नही जानती. हे घ्या - मलई बर्फी

Pages