चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिफ्टबॉय बद्दल अनुमोदन. फॅमिलीसोबत बघण्यासारखा आहे. (आजकाल कमीच आहेत तसे मुव्हीज)
मला खूप छान वाटला एकदम इन्स्पायरींग असा. मिसेस डिसुझांच काम छान आहे. फक्त शेवटी एकदम ते त्या फ्लॅटमधे राहायला कसे जातात? तिने काय विल मधे वगैरे असं लिहिलं असतं का? मेबी मिस केलं असेल

आदिश्री, तुमच्या मुलांच्या आवडी माहित नाही पण आमच्या मुलांना जनरली फूड नेटवर्क, त्यांचे कीड्स कुकिंग आवडते. मलाही मदत (लूडबूड टाइप) करत असतात. त्यांनी प्राइम वर एक सिरीज शोधली होती जी मी त्यांच्याबरोबर पाहिली आणि आम्ही तीआता स्टे होममध्ये पुन्हा पाहुया म्हणून विकेंडलाच चर्चा झाली. बघा तुम्हाला चालतं का, "जस्ट अ‍ॅड मॅजिक" नाव आहे. प्रत्येक वेळी एकच एपिसोड पाहायचा या बोलीवर आम्ही मागच्या हॉलिडे टायमाला पुरवली होती. मी आधी लिहिलंही असेल पण ठीक आहे पुन्हा लिहिते Happy

चित्रपटामध्ये काल मला वाटतं फॉक्स वर "मिलियन डॉलर बेबी" सुरु केला होता. मुलांसाठी जितका आम्ही पाहिला तितका तरी लँग्वेज बॅड नव्हती. फक्त मला स्वतःला बॉक्सिंग मधला तो मारामारी पार्ट पाहावत नाही फार वेळ म्हणून मी सोडला. मग काही तरी इमोशनल भाग आला (स्पॉयलर टाकत नाही) तेव्हा उरलेल्यांनी पण सोडला मला वाटतं. हा ऑस्कर विनर आहे. चांगला आहे. मी स्वतः नंतर केव्हातरी पाहीन उरलेला. हा चित्रपटही तुम्ही बघा हवंतर आधी आणि ठरवा. आणखी काही सुचलं तर नंतर कळवेन.

माझी मुलं आजकाल पुन्हा एकदा यु ट्युबवरचं चिंटू पाहतात (मला पुस्तकं पण वाचायला बसवलंय) मी तो चिंटूचा चित्रपटही शोधून त्यांना दाखवेन. आधी, म्हणजे तीनेक वर्षांपुर्वी, चिंटूची पुस्तकं आणली होती ती भारीच लाडाची झाली होती. नशीब डोनेट नाही केली गेली त्यामुळे आता तो एक नवा टीपी आहे एकत्र करण्यासाठी. गुडलक आणि हा असा बदललेला काळ (विथ मुलांची बदललेली वयं) एंजॉय करा. Happy

 आशुचँप , सान्वी, अंजली_१२ आणि वेका धन्यवाद.
Oddball आणि Lift boy नक्कीच बघू. फूड आणि travel shows बघतोच पण सिनेमे राहिले नाहीत जणू. Prime नाही माझ्या कडे फक्त नेटफ्लिक्स आणि इंडियन टिव्ही आहे आणि युट्यूब . जस्ट अ‍ॅड मॅजिक" हे पाहिले होते निक ज्युनिअर वर...आवडले होते.
@वेका ..हा असा बदललेला काळ (विथ मुलांची बदललेली वयं) एंजॉय करा. >>>करतो आहोत गं पण आधी हा सिनेमा बघणे bonding time होता तो मिस करत आहे.
कोको खरंच छान आहे. दोन वेळा पाहिलाय. सध्या नेटफ्लिक्स वर pet academy बघून संपवलय
@Netflix , Locke and key आणि Typewriter पाहिले.
दोन्ही जबरदस्त. काही भाग मुलांनी बघण्यासारखा नाही.
मी एकटीनं काल @Netflix....The curious case of Benjamin Button पाहिला. अर्धा झाला, आवडलाय !
सर्वांना विनंती कुठे पाहिला यासोबतच Family friendly आहे का ते लिहावे. उपयोग होईल . धन्यवाद Happy

नेफिवर Freedom Writers पाहा. मिडल्/हाय मधल्या मुलांना पाहण्यासारखा आहे. हिलरी स्वँक घरी असताना एक सीन आहे तो पळवा फक्त. पाहताना लक्षात येइल, की तो पळवायला पाहिजे.

आदिश्री - बेंजामिन बटन मध्ये एक सेक्स सिन आहे. बेडशीट मध्ये आहे - न्यूडिटी नाहीय पण thrust दाखवले आहेत.
बी केयरफुल इफ वॉचिंग विथ किड्स....

आमच्याकडे पूर्वी कधीतरी व्हीसीआरवर बघायला मि. इंडीयाची कॅसेट आणली होती लायब्रीतून. तर काटे नहीं कटते गाणं सुरु व्हायच्या जस्ट आधी माझा आठ वर्षाचा मामेभाऊ त्याच्या वडीलांना म्हणाला की बाबा आता कॅसेट पळवा पुढे जरा घाण घाण आहे.
बाबा - तुला कसं माहीत?
तो - कालच पाहून ठेवलंय.

आदिश्री, मुलांबरोबर आणि एकुणातच कुटुंबाने एकत्र बसून बघायला ' ये मेरी फॅमिली' सिरिज आहे. अतिशय गोड मुलगा आहे आणि एकुणातच खूप क्युट फॅमिली आहे. नक्की बघा, फक्त प्राईम की नेटफ्लिक्स विचारू नका. सगळीकडे सबस्क्रिप्शन्स असल्याने माझा कायम कुठे काय बघितलं तो गोंधळ होतो.
सगळ्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर बसून कधीही किंचितही ऑकवर्ड क्षण न येता बघता येण्यासारखी वेबसिरीज आहे.

नेटप्लिक्सवर 'कामयाब' सुरु केलाय पहायला, मस्त वाटतोय. पुढचा पहायला वेळ मिळेना. संजय मिश्रा बद्दल लिहायचीही गरज नाही इतका प्रतिभावान आहे. ती मुलगी मस्त वाटतीये, २ मिनिटेच झालीत म्हणा तिची एंट्री होऊन.

तीनेक वर्षांपुर्वी, चिंटूची पुस्तकं आणली होती ती भारीच लाडाची झाली होती. नशीब डोनेट नाही केली गेली त्यामुळे आता तो एक नवा टीपी आहे एकत्र करण्यासाठी.
--> तुमच्या मुलांना मराठी वाचता येते ?

>> (मला पुस्तकं पण वाचायला बसवलंय)
वाचलं का ?
ती वाचू शकतात थोडंफार पण पूर्ण पुस्तक वाचायचा पेशन्स नाही. अजून काही वर्षांनी बोलली तरी पुरे Happy

बाई दवे - वेका तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही आहे . मी मूळ रूपात टिपापा वर ऍक्टिव्ह असतो . थोडा विचार करा उत्तर मिळेल .
हिंट देऊ का ?

प्राईमवर एबी आणि सीडी पाहिला काल. अमिताभ आणि विक्रम गोखलेंचे पोस्टर बघून ओपन केला. सुबोध भावे पण एका छोट्या रोलमधे आहे.

तसा घिसापिटा थीमवरच आहे पिक्चर. विक्रम गोखलेंची बायको (नीना कुलकर्णी) गेल्यावर एकटेपणा उरलेला असतो त्यात मुलं सुना फार किंमत देत नसतात . नातवंडाना फक्त आजोबांबद्दल वाटत असतं की त्यांना घरात थोडातरी मान मिळावा म्हणून अमिताभ बच्चन त्यांचे शाळामित्र असल्याची बतावणी करतात. अमिताभकडून एका कार्यक्रमाला बोलावणं आल्याचं खोटं पत्र तयार करून घरी दाखवतात. मग आजोबांची सुनांकडून जरा विचारपुस केली जाते, हवं नको बघितलं जातं. शेवट अर्थात अपेक्षित असाच पण एकदा बघायला म्हणून पिक्चर ठिक वाटला. थोडा सिरिअस, थोडा कॉमेडी असा आहे. अमिताभ याचं सुखद दर्शन भाव खाऊन जातं. विक्रम गोखलेंनी नेहमीप्रमाणे सिरीअस टाईप रोल चांगलेच करतात यात थोडा कॉमेडी करायचाही प्रयत्न केला आहे.

ए बी आणि सि डी थोडा बघितला पण कंटाळवाणा वाटला. फाफा करून अमिताभला बघून घेईन. अमिताभने म्हणे स्वतःचे कपडे वापरले आहेत कारण मराठीचे बजेट कमी असते आणि आवाजही स्वतः चा वापरलाय कारण मराठी त्याला ओळखीची वाटते. प्राईम वर माझा बराच वेळ अशी माहिती वाचण्यात जातो आणि जे बघतेय ते लांबणीवर पडतं.

कोको <3

रिमेम्बर मी.. पोको लोको..
या लॉकडाऊन मध्ये दोनदा पाहिला आणि दोघांना बघायला रेकमेंड केला. खूप सुंदर सिनेमा :')

एकता कपूर ने सैनिक / त्यांच्या पत्नी बाबत सिरीयल मध्ये गैर प्रकार दाखवले म्हणून तिला देशद्रोही ठरवायचे फर्मान जारी झाले आहे.

अक्षयकुमार ने सैनिकांच्या विवाह बाह्य वर्तनावर रुस्तुम ही अख्खी फिल्म बनवून पैसे मिळवले,

तेंव्हा कोण बोलले नव्हते,
आणि ती फिल्म तर रियल स्टोरी होती , नानावटी केस

अजय देव आनंदचा तीन देवीयां पाहीला का? होय सो सो आहे तो सिनेमा. पण गाणी फार मस्त आहेत.>>>>>

हो.. गाण्यांसाठीच बघितला.. ख्वाब हो तुम या कोई हकीकत ह्या गाण्यामुळे चित्रपट बघायची इच्छा झाली..

Pages