झण्ण!

Submitted by नीधप on 14 May, 2020 - 03:56

एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात.
तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही.
तो ग्लानी तुटू देत नाही.
आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो.
लिखित शब्द, चित्रित कथा
कशातही अडकू देत नाही.

'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?'
ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो.
मी कशातच अडकू शकत नाही.
मी कशातच थांबू शकत नाही.
मी थांबून काहीच करू शकत नाही.
मी गुंगीतच असते.

डोळ्यासमोर चालू असतात
माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या,
अविरत दळले जाणारे विनोद,
याच्या त्याच्या नावाची अवतरणे,
गुंगी तुटत नाही.
माझ्या आत काही झिरपत नाही.

त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने
उन्मळून, कोसळून पडू देत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या आनंदाने
भरभरून फुलू देत नाही.

झण्ण विस्तारत चाललाय.
हा प्रखर प्रकाश, हे मेलेले वारे
झण्णला पोसतायत.

भविष्य, भविष्याचे बेत वगैरे अफवा झाल्या आहेत.
नजिकचा भूतकाळ झण्णच्या अस्तित्वाचे दाखले आहेत.

फक्त झण्ण असणारे.
माझा गाभा, माझे शरीर, मी व्यापलेली जागा
सगळं झण्ण होणार!
मी नाहीच उरणार.

- नी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे झण्ण!!
नेमक काय असावं?
कवियत्रीच्या मनात
खोलवर दडलेलं गुपित असावं!

का गुपित नसुनी एक
प्रश्न असावा?
कि असावी साद?
अंर्तमनाने दिलेली..

शब्द होऊन माझे मन
विचारे प्रश्न मला
काय असावे?
'झण्ण' जे जाणिवले
पर उमगले न मला...

- Dipti Bhagat

मेंदूला झिणझिण्या आल्यात. गुंगी आलीय जशी काही .
बाहेरची वेदना आत पोचत नाहीय आणि आतली संवेदना बाहेर उमटत नाहीय.
प्रतिभेची ठिणगी मृत्यूभस्माने झाकोळलीय.
चिताभस्माची राख किंवा विभूती
जो शब्द आवडेल तो फासून पडावं निपचित..
भूतभविष्य गेलं खड्ड्यात .
वर्तमान तरी कुठे आहे?
काळच हरवला आहे कुठे तरी.
या गुंगीत शोधणार तरी कसं.
हातांतून सुटला अस्तित्वाचा हात
साराच झिनझिनाट

थँक्स ऑल!
हिरा, असंच झालंय काहीतरी सध्या. Happy

ही वैयक्तिक अनुभुती वाटते...
माणूस चिवट आहे...अशा किती महामारी आल्या आणि गेल्या...
मी नाहीच उरणार...हे तर अती वाटतं... मृत्यू दर ४ ते ५% ... कितीतरी लोक अगदी ९४ वय, १०० वय असलेलेही बरे होतायेत. माणसाला हादरवलं, विचलित केलं हे खरं असलं तरी तो झुंजतोय. कंपन्या चालू होतायेत. तुमचं, माझं दुःख थोडंतरी मखमली असावं हातावर पोट असणाऱ्यां पेक्षा...
ताई मन खंबीर करा... निश्र्चित उजाडेल.... कृपया सकारात्मक घ्या...माझा उद्देश तुमच्या कवितेवर प्रतिक्रिया देणें नाहीच मुळी...मला तुमची सकारात्मकता जागवायची आहे.... आवडते छंद जोपासा... कुटुंबियांना वेळ द्या... मा. बो. वर लिहा....

कविता आवडली. Honest and intense असल्याने तर फारच Happy .
******
प्रत्येकात असते झण्ण ....Survival instinct असतील हे मनाचे !! सगळे गाभ्याला स्पर्श करू लागले तर जगणे अवघड होईल म्हणून कदाचित. मग हे झण्ण आपल्याला एक नशा देते ज्यामुळे आपण रोज नव्या दिवसाला गुंगीत (under influence ) का होईना सामोरे जातो.
धन्यवाद Happy .

झण्ण असतोच प्रत्येकात. पण त्याचं केवळ असणं एक गोष्ट पण त्याचं विस्तारत जाणं, आणि विस्तारता विस्तारता त्याने आपल्याला पूर्ण व्यापून टाकणं ही दुसरी गोष्ट - जास्त गंभीर, विचार करायला लावणारी. या झण्ण शी समतोल / समझोता कसा साधावा? गहन प्रश्न आहे.
नी - कविता खूप आवडली!

अगो बाई बाई...मला वाटले की कोणीतरी कानाखाली लावून दिली की एकदाची तुमच्या. त्याचाच झण्ण आवाज. त्यावर पण लिहा.

या कवियत्री म्हणजे त्या ब्युटिपार्लरवाल्या ताई ना? मग बरोबर, झण्ण टण्ण खण्ण सगळं वाटणार. सध्या कोविड मुळे सगळी ब्युटिपार्लर बंद आहेत ना? घाबरू नका ताई, आता कोविड गेला की पुन्हा नोकरी मिळेल तुम्हाला. आधीच्या पार्लरमध्ये नाही तर दुसर्‍या कोणत्या तरी. पण मिळेलच मिळेल. मग झण्ण जाईल आणि गल्ला खण्ण ख्ण्ण वाजत राहील.

अगो बाई बाई...मला वाटले की कोणीतरी कानाखाली लावून दिली की एकदाची तुमच्या. त्याचाच झण्ण आवाज. त्यावर पण लिहा.$$$$$$$$ ™℅¶©+११११
Lol