Coronaचे साईड इफेक्ट्स

Submitted by Mandar Katre on 12 May, 2020 - 02:26

असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...

आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...

आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही लेखात उल्लेख केलेली मंडळी, अडचणीच्या काळात दोन महिने बसून खातील इतकेही सेव्हींग करु शकत नाहीत ?

अडचणीच्या प्रसंगी प्रवास करून या निष्काळजी व नालायक लोकांनी किती तरी निरपराध लोकांचे जीव यांनी संकटात टाकले आहेत याची जराही फिकीर त्यांना नाही.

तेव्हा या पळपुट्या लोकांना बद्दल जराही सहानभुती दाखवायची गरज नाही.

अडचणीच्या काळात दोन महिने बसून खातील इतकेही सेव्हींग करु शकत नाहीत ?
एक तर ह्या लोकांना बसून खायची सवय नसते, आणि पोटाला चिमटा घेऊन गावी पैसे पाठवतात. ठेकेदाराने वेळेवर आठवड्याचा पगार दिला नाही तर ह्या लोकांकडे खायला पैसे नसतात. आठवडा बाजार ह्या लोकांसाठी मॉल असतो.

अडचणीच्या काळात दोन महिने बसून खातील इतकेही सेव्हींग करु शकत नाहीत ?>>> दोन महिने उलटुन गेले. पुढे काय आता? काय प्लॅन? आत्मनिर्भर स्टेज आपोआप येणार की काय? Wink

दोन महिने उलटुन गेले. पुढे काय आता? काय प्लॅन? आत्मनिर्भर स्टेज आपोआप येणार की काय? Wink
नवीन Submitted by Filmy on 14 May, 2020 - 13:12
--
दोन महिने काय फक्त भय्या व बिहारींसाठीच उलटून गेले आहेत की काय ?

इतर भारतीय या संकटकाळाचा सामाना, मोठ्या हिंमतीने करत आहेत. ते काही पळत सुटले नाहीत.