मस्त नशीला वारा आला

Submitted by बेफ़िकीर on 6 May, 2020 - 13:16

मस्त नशीला वारा आला
देहाचा तिटकारा आला

हजारवेळा जात बदलली
त्यानंतर गाभारा आला

हात नेमका जेव्हा सुटला
रस्ताही अंधारा आला

वृद्धाश्रमचालक खुष आहे
एक नवा म्हातारा आला

असा स्वतःच्या घरी पोचलो
जणू कुणी वंजारा आला

हे कळण्यातच जन्म संपला
नजरेतून इशारा आला

इतके छान कुणीही नव्हते
कसा नभी हा तारा आला

आज केवढी मिळकत झाली
एक जुना सुस्कारा आला

'बेफिकीर' व्यामिश्र किती मन
रोमांचात शहारा आला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर... तुम्ही लिहीते झालात त्याबद्दल अनेक आभार.
गझल आवडली.
हजारवेळा जात बदलली
त्यानंतर गाभारा आला >>>>जबरदस्त.
व्यामिश्र = complex = गुंतागुंतीचे
शब्दाचा अर्थ गुगलच्या मदतीने शोधला.
धन्यवाद .

नेहमीप्रमाणेच सुंदर!

हजारवेळा
जात बदलली
त्यानंतर गाभारा
आला>>> हा शेर समजला नाही..

<< वृद्धाश्रमचालक खुष आहे
एक नवा म्हातारा आला >>
<< आज केवढी मिळकत झाली
एक जुना सुस्कारा आला >>
खिन्न झालो.