कुत्र्याचा नर्क

Submitted by शुभम् on 4 May, 2020 - 10:05

तो दार ढकलत आत आला .
गोल , लालसर काळपट , लबलबीत , चिपचिपीत , पुर्ण वाढ झालेल्या माणसाच्या मस्तका एवढा होता तो गोळा . पांढरा व चिकट द्रव त्यामधून स्त्रवत होता . अचानक त्याला लालभडक असे माणसासारखे दोन ओठ फुटले . ते एक तोंड होते . त्या तोंडातुन रंगहीन लाळ टपकत होती . तोंडात पांढरेशुभ्र दात होते . ती जीभ मात्र सापासारखी दोन तुकड्यात विभागलेली होती .
" तु मेलाय , "
स्स्स्स..... असा आवाज पार्श्वभूमीवर करत तो मला म्हणाला . " खाली बघशील का जरा..." . मी खाली पाहिलं . चार पाय असलेलं माझं शरिर रस्तावर चपटं होउन पडलं होतं . मी तर घरात होतो , इथे कसा आलो ....

" हे तुझ्या आठवणींचं जग आहे , तुला जे आठवेल , ते तु पुन्हा अनुभवशील , ऐक माझं भलतं सलतं आठवु नको..

लगेच माझ्या मनात विचार आला , मी नक्की मेलो कसा...

" हाड् हाड् ..."
कुणीतरी दगड मारला , माझ्या पाठीला जखम झाली . तो माणुस काटी घेउन माझ्या मागं येत होता . तोडांत माझ्या जिलेबीनं भरलेली पिशवी होती . त्याला सापडू नये म्हणून मी गडबडीने रस्त्यापलीकडे जाउ लागलो. माझं लक्ष मागे त्या माणसाकडेच होतं . गाडी माझ्या अंगावरून गेली होती , मला माझं मरण दिसत होतं . मरताना माझ्या जुन्या मालकाच्या घरातील ती खोली आठवली , ज्यात मी पडुन असायचो...

मी खोलीत बसलो होतो . दार उघडुन तो गोळा आत आला . लालसर , काळपट , लिबलिबीत , चिपचिपीत , छोट्या हत्तीच्या मस्तकाएवढा तो आकार होता . त्यातुन पाढरा द्रव स्त्रवत होता . अचानक त्याला माणसासारखे लालभडक ओठ फुटले .
" हे बघ , तु काही आठवण्याचा प्रयत्न करू नको , तु मेलाय , आणि हे आठवणीचं जग आहे , तु जे आठवतो , ते तु पुन्हा जगतो , आणि तुला जर त्या चक्रातुन सुटायचं असेल तर मला खाउन टाक...

तो गोळा त्याचे ओठ हलवत बोलला . ते दात पांढरे व अनकुचीदार होते . त्या गोळ्याचं मांस चवदार असणार यात शंका नव्हती , पण हा काय बोलत होता कि मेलोय. आणि मला आठवलं...

त्या जिलेबी फारच चविष्ट दिसत होत्या . मला वास आला . माझा जुना मालक मरून आता माणसे म्हणतात तशी तीन वर्षे झाली . मालक मेल्यापासुन मी रस्त्यावरच फिरतो. इकडे तिकडे फिरुन मिळेल तिथे तोंड मारतो . बाजार दिवशी खरंच माझी चांदी असते . बाजाराबाहेर उभारतो आणि लोकांच्या हातातल्या पिशव्या पळवतो . तसा मी हुशार आहे. ती जिलेबीने भरलेली पिशवी घेउन तो जातोय , मी पिशवी घेतली आणि आता मी पळतोय , माझं लक्ष मागच्या माणसाकडेच आहे , गाडी अंगावरून गेलीय , माझं आतडी बाहेर आली आहेत . माझं मरण मला दिसतंय , तेव्हाच मला माझ्या आयुष्यातील ते सुखाचे दिवस आठवतात .

मी खोलीत माझ्या उशीवर बसलोय , दार उघडुन तो लालसर मांसाचा गोळा आत आला . तो चक्क बोलु लागला...
" तु मेलाय , माझ्याबरोबर यायचं असेल तर मला खाउन टाक , नाहीतर याच नरकात राहशील , वारंवार तुझं मरण जगत बसशील....

तो गोळा चविष्ट होता , पण फारच विचित्र होता . मी कसा मरेन...

मी बाजाराच्या वाटेला उभा आहे , तो जिलेबीनं भरलेली पिशवी घेउन येत आहे , मी ती माझ्या दातात पकडली व पळतोय. रस्ता पार करतानाही माझं लक्ष त्या माणसावरतीच आहे . माझ्यावरून गाडी गेली आहे व माझ्या आतड्या बाहेर आल्या आहेत. मरताना आयुष्यातील सुखद दिवस आठवतात...

मी खोलीत बसलोय . दार उघडुन तो गोळा आत आला .

समाप्त..

खऱ्या

कल्पना नवी नाही । फक्त कुत्रा नवा आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users