सुटकेस ३

Submitted by जव्हेरगंज on 2 May, 2020 - 15:53

सुटकेस २
-------------------------------
चुर्रर..!
ऑम्लेटचा खमंग वास दरवळला आणि भूक भडकली. टिव्हीवर बातम्या कमी आणि जाहिरातींचा भडीमार सुरू झाला. पण साली आपण ही चूक केलीच कशी? एवढ्या रात्री परत तिकडे जायची काय अवदसा सुचली. देव देतो आणि कर्म नेते दुसरे काय!
चिऊ पळत आली. आणि हातात रिमोट देत म्हणाली. "घे.."
मी चॅनल बदलला. आणि कार्टून लावले. दुसरा काही मार्गच नव्हता. नाहीतर तिने आकाश पाताळ एक करायला कमी केले असते.
"अरे पण त्यांना तू वरती का नाही घेऊन आलास?" बायको किचनमधून म्हणाली.
"घाईत होते ते. लगेच गेले." मी टीव्हीवर मोगली नामक कार्ट्याच्या करामती बघत म्हणालो.
"तुझे कलिग होते का ते? आणि त्या सुटकेसमध्ये होतं तरी काय?"
"ऑफिसचे साहित्य आणि काही इन्स्ट्रुमेंट्स. बाकी काय असणार.!"
"इतकी कसली अर्जंन्सी! ऊद्या दिले तर चालले नसते का?"
"आता तुझ्या हिशोबाने ऑफिस चालणार आहे का?"

मग ती शांतच बसली. बायकांना किती प्रश्न पडतात रे देवा. पण उलटा प्रश्न विचारला कि त्या गप पडतात. जेवण उरकून गॅलरीत शांतपणे सिगारेट पेटवून बसलो. हे फार झाले, अजून किती दिवस मी तिला मी खोटं बोलणार आहे देव जाणे. पण आपली थाप पचतेय हे ही नसे थोडके.

रात्री सुमधूर हिंदी चित्रपटांची गाणी ऐकत झोपलो. दु:खी, करूणादायक, कशी नशिबाने थट्टा आज मांडली वगैरे.. आणि केव्हा झोपी गेलो कळलंच नाही.

सकाळी प्रसन्न जाग आली. आता नव्या उमेदीने नवी सुरुवात. कधी नव्हे ते बॉसला गुड मॉर्निंग म्हणून मेसेज पाठवला. 'काय? सुट्टी पाहिजे का?' म्हणून त्याने उलट विचारले. त्याला 'नाही हो' म्हणून रिप्लाय दिला. बॉसला अभिवादन करनेही जिकीरीचे काम असते.

मग भराभरा आवरुन खाली येऊन गाडीला किक मारली. अन शेजारीही कुणीतरी त्याच्या गाडीला किक मारली.
मी बाईक घेऊन बाहेर पडलो तर ही गाडी माझ्या मागेमागे. साला अजून हे कुठलं नवीन झेंगाट.
मग चौकात येऊन हायवेला जरावेळ उभारलो. तर मागून हा पठ्ठ्या शेजारी येऊन थांबला. मी त्याला नीट निरखून बघितले. हा तर तो दाढीवाला. रात्री ओढ्याजवळ दिसलेला. ज्याने जाताना माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहिलेले.
"क्या है?" मी त्याला विचारले.
"कुछ नही" तो बेफिकीरपणे म्हणाला.
"क्या तुम मेरा पिच्छा कर रहे हो?"
मग त्याने माझ्याकडे रोखून बघितले. तीच भेदक नजर. थरकाप उडवणारी.
"मेरे साथ साथ चल, बात करना है." म्हणून उत्तराची वाट न बघता तो पुढे निघून गेला.
मग मीही त्याच्या मागे मागे गेलो.

सकाळच्या प्रहरी अशा प्रसन्न वातावरणात नशीबाने पुढे काय वाढून ठेवले आहे याचा काही अंदाज येईना. तो दाढीवाला पुढे जाऊन कच्च्या रस्त्यावर थांबला. आणि तिथे एक शाही कार नुकतीच येऊन थांबली.
गाडी स्टँन्डला लावून मी त्याच्याकडे चाललो. "ये क्या नाटक लगा रखा है?" म्हणून त्याला विचारले.
त्याने तोंडावर बोट ठेवून मला "शूSss.." केले. "भाईसे बात कर " म्हणत शाही गाडीकडे बोट दाखवले.

गाडीचा दरवाजा उघडला गेला. आणि आतून एसीची थंड झुळूक बाहेर आली. जाडजूड मिश्या असणारा एक रूबाबदार पुरुष मागच्या सीटवर बसून तितक्याच थंड नजरेने माझ्याकडे पहात म्हणाला, "नाम क्या है तेरा"
"जगदीश खत्रे.." मी त्याला अर्धवट सलाम करत म्हणालो.
"तो जगदीश, देख रहा है ना ये क्या है?" तो त्याचं पिस्तुल नीटनेटकं करत खाली उतरला. "इसको तेरे भेजेमे उतारकर अभी तेरेको यहा खल्लास कर सकता हू"
पिस्तुल त्याने माझ्या आता कनपटीवर ठेवले. आणि दात ओठ खात म्हणाला.
"सच बोलना, वो सुटकेस तुनेही उठाया ना?"
"भाई मुझसे गलती हो गयी भाई, मुझे नही पता था इतना बडा कांड होगा.." मी प्राण कंठाशी आणून बोललो. कारण खरंच खूप टरकून गेलो.

"सचमे?" भाईने पिस्तुल बाजूला घेत म्हटले. आतमध्ये अजून तिघे चौघे बसले होते. तिकडे बघत तो म्हणाला, " साला इसनेही उठाया था.."
एकंदरीत सगळे एकदम रिलीफ झाल्यासारखे वाटले.

"सुटकेस किधर है अब" दाढीवाल्याने विचारले.
"क्या मतलब है किधर है? आपही के आदमीयोंको दिया कल."

आता मात्र गाडीतले सगळेच बाहेर आले.

"कौनसे आदमी?" एका हाताने माझा चेहरा पकडत भाई लालभडक डोळ्याने म्हणाला, "इनमेसे कोई था?"

"नही वो दोनो पतलेसे, टपोरी लडके थे" मी कसाबसा म्हणालो. कारण त्याची पकड आता गळ्यावरही पडली होती.
"राजनभाई का पैसा है वो समजा, ऐसे कोई कैसे ले जा सकता है?" भाई भडकला होता.

"कही वो उस्मान के आदमी तो नहीं?" चौघांपैकी कोणी एक बोलला. आणि भाईने मला सोडून बराच वेळ डोके धरून विचार करत बसला.

"हो सकता है. " अखेर बऱ्याच वेळाने तो बोलला. "उस्मानने लिया, तो सबकुछ गया.. कुछ भी वापस नही मिलेगा"
"तो अब क्या करे?" पुन्हा कोणीतरी एकजण म्हणाला.
"अब हम नही , ये करेगा" भाई माझ्याजवळ येऊन दिलखुलासपणे हसला.

"देखो बेटा जगदीश, प्लॅन सिंपल है, तुने हमारा पैसा चुराया. हमे वो वापिस चाहिये. तुने किसको क्या दिया हम कुछ नहीं जानते. उसमे एक करोड रुपय्या था. और चोबीस घंटे के अंदर वो हमे चाहिये."
"भाई लेकीन मै इतना सारा पैसा लाऊंगा कहासे? मै तो पहलेसेही कंगाल हू.."
"वो मेरा प्रॉब्लेम नही है. बँक लूट, डाका डाल, घर बेच. ऑप्शन बहोत है तेरे पास.."

मी भान हरपून त्याच्याकडे पाहात राहिलो.

"कल मिलते है. इसी वक्त. इसी जगाह.. तैयार रहना गुडबाय.." म्हणून तो गाडीत बसला. आणि ते सगळे हायवेने भरधाव निघून गेले.

क्षणभर मला कशाचंच भान राहिलं नाही. वेड्यासारखा तसाच उभा राहिलो. तेवढ्यात मोबाईल वाजला. बॉसचा मेसेज आला होता. 'आज इरादा आहे की नाही ऑफिसला यायचा?"
मी त्याला रिप्लाय दिला, "URGENT WORK. TAKING LEAVE"

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है.. ट्विस्ट वर ट्विस्ट.. पुढचा भाग लवकर टाका...

एक चांगला चित्रपट किंवा वेबसिरीज नक्की होऊ शकते ह्या कथेवर...

अय्यो... मला वाटलच होतं ते भलतेच लोकं असणार.. मी क्रमशः कधी वाचत नाही... समाप्त येईपर्यंत. पण तुमची वाचत आहे.

सह्ही!

बाकी काही साम्य नाही पण दोन टोळ्या, सुटकेस भरून पैसे, यात अडकलेला एक सामान्य माणूस यावरून बेटर कॉल सॉल आठवलं. सॉलच्या आयुष्यात सध्या हेच चाललंय.

काय माहीत का? पण हा कथानायकही साधाभोळा वाटत नाहीये पहिल्यापासूनच. नाहीतर जखमी माणसाला गाडीत सोडून बिनबोभाट सुटकेस उचलून आणणे, वर पुन्हा टेहळणी करायला जाणे हेही सोपे नाही.
पुभाप्र.

पण हा कथानायकही साधाभोळा वाटत नाहीये पहिल्यापासूनच.>>> हे आत्तापसून तुम्हाला कळलंय म्हणून सांगू नका. नाहीतर लेखक काहीतरी वेगळा ट्विस्ट घेण्यास वेळ घेतील.

आखिर वो सूटकेस गयी कहाँ ?
क्या इसमें आयइसआय का हाथ है ?
क्या यह भी एक चीन की मिली भगत है ?
कौंन है असली मुजरिम ?