शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The day after everyday समजला नाही नीट... चित्रीकरण खूप अंधारात केलंय...हलणाऱ्या फ्रेम्स आहेत.

छुरी आणि चटणी मस्त आहेत... ज्यूस पण आवडली...
एका वाक्यात सारांश दिला तर बरे होईल यापुढे शॉफी चा...कोणी होरर शॉफी बघत नाही का

घर की मुर्गी छान आहे. पण मला शेवट नाही आवडला. >> मला पूर्वार्ध आवडला , म्हणजे तिचा दिनक्रम किती सहज दाखवला आहे .
शेवट मलाही आवडला नाहे , पण प्रॅक्टीकल वाटला नाहीतर अगदीच revolutionary वगैरे झाला असता . मूळात एक महिन्याच्या ब्रेक ऐवजी आठवडा - पंधरा दिवस चालले असते .
एक गोष्ट खटकली म्हणजे , ती लोक मदतनीस ठेवली तर किती खर्च येइइल तो हिशोब करत असतात तेन्व्हा शेवटी लेक म्हणते , ३१ हजार , पापा ये तो आपकी आधी सॅलरी हो गयी . मुम्मी ईतना बचाती थी .
लेकीला बाबाचा पगार माहित असणं , तीने पटकन असं री अ‍ॅक्ट खटकलं , पण जाउ दे
ती बीजी , त्या दहीवाल्या जाहिरातीतली(???) आहे ना . मुलगा आईला सांगतो पराठ्यासोबत दही नाही आहे , जरा खाली जाउन ये ?

मूळात एक महिन्याच्या ब्रेक ऐवजी आठवडा - पंधरा दिवस चालले असते .
एक गोष्ट खटकली म्हणजे , ती लोक मदतनीस ठेवली तर किती खर्च येइइल तो हिशोब करत असतात तेन्व्हा शेवटी लेक म्हणते , ३१ हजार , पापा ये तो आपकी आधी सॅलरी हो गयी . मुम्मी ईतना बचाती थी .
लेकीला बाबाचा पगार माहित असणं , तीने पटकन असं री अ‍ॅक्ट खटकलं , पण जाउ दे>>>>>> >>> पूर्णपणे सहमत!

काल रोगनजोश पाहिली.छान आहे.
पहिल्यांदा कळली नाही.मग त्याखालची पहिलीच कॉमेंट वाचली.तेव्हा हे बारकावे समजले.

शबाना आझमी ची आंटी जी शॉर्ट फिल्म पाहिली.
शबाना आणि मुलगी, दोघींची ऍकटींग मस्तच.
एखाद्याला 'समान संधी' आणि 'वेगळं असल्याचं सतत जाणवून देऊन संधी' यात फरक असतो.

https://youtu.be/2K0RFZrsO8A

मराठी शॉर्ट फिल्म FOOL'S MATE कोल्हापूरच्या नवोदित दिग्दर्शकाने बनवलीय. छान आहे.
कृपया पहा व प्रोत्साहन द्या:

https://www.mxplayer.in/movie/watch-fools-mate-short-film-movie-online-5...

तार! परवाच पाहिली. मस्त आहे. नागराज मंजुळे! फारच सहजसुंदर, वातावरण निर्मिती व पात्रे सुद्धा Happy
>>>>>
अगदी.. एक रुपयाची नोट पोस्टमनच्या हातात टेकवतानाचा सीन.. hat's off! त्या बाबांचा थरथरता हात त्यांचा अभिनय किती सांगून जातो..

तार! परवाच पाहिली. मस्त आहे. नागराज मंजुळे! फारच सहजसुंदर, वातावरण निर्मिती व पात्रे सुद्धा ... >>>>
खूपच आवडला ... पाहिली काल... छायाचित्रण फार सुरेख. सरळसाधा अभिनय की फिल्म न वाटता खरोखरच बघत आहोत असं वाटतं.
धन्यवाद अतुल व मन्या Happy !
मन्या ... रूपया सिन अगदी अगदी .... ह्रदयस्पर्शी Happy

लघुशंका पाहिली ( :अओ:) मला म्हणायचेय शॉर्ट फिल्म पाहिली .. ! या विषयावर अगदी सहज सुलभ संवाद साधत थोडक्यात कथा रंगविली आहे..
https://www.youtube.com/watch?v=UwL3HxCCZ7M

'बेहद' म्हणून एक पाकिस्तानी शॉर्ट फिल्म आहे. यू ट्यूब वर आहे. सर्वच कलाकारांचा सहजसुंदर संयत अभिनय , उत्तम दिग्दर्शन..

Pages