इरफान खान.... दुःखद निधन

Submitted by ShitalKrishna on 29 April, 2020 - 04:23

बोटावर मोजण्याजोग्या कलाकारांपैकी एक आज सिनेसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांनी गमावला..

Screenshot_2020-04-29-13-46-59-35.pnghttps://www.google.com/amp/s/www.indiatvnews.com/amp/entertainment/celeb...

Group content visibility: 
Use group defaults

इरफान खान...!
तो उत्तमच काम करायचा यात काही वादच नाही, तरीही 'लंचबॉक्स', 'दि नेमसेक', 'लाईफ इन ए मेट्रो' आणि 'पिकू' मधलं त्याचं काम अतिशय आवडतं... will miss him a lot..!
श्रद्धांजली!!!

विश्वास बसत नाही, केवळ तो आहे म्हणून कित्येक सिनेमे पाहिले. त्याचे काम आणि तो एकदम प्रामाणिक वाटायचे. खूप आवडायचा. त्याला बरे वाटावे म्हणून मनापासून प्रार्थना केली होती. मला वाटत होते की तो बरा होत आहे, धक्कादायक आहे Sad .
श्रद्धांजली .

आताच वाचले की चार दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. खरेच देव कुटुंबाला बळ देवो Sad Sad

RIP

मला वाटलं नव्हतं मी इतकी रडेन त्यांच्या जाण्याने असं वाटतं की कुणी जवळचं व्यक्ती गेलंय.. खूप मिस करणार लव यू सर भावपूर्ण श्रद्धांजली

खूप वेदनादायक आहे हे. बातमी कळल्यापासून मन बैचेन आहे. इरफान खूप आवडता नट होता माझा, त्याचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट पाहिला असेल मी. त्याची देहबोली, संवादफेक, नजरेतून भाव व्यक्त करण्याची क्षमता याची खरंच जादू होती माझ्या मनावर. तो त्या त्या भूमिका जगायचा अक्षरशः... खरंच बरा होईल असं वाटलं होतं आणि ही दुर्दैवी बातमी अचानक आली. आज मुलाच्या हट्टानुसार गुलाबजाम करणार होते. पण काही गोडधोड करावंसं नाही वाटलं, सो नाही केले. असा नट होणे नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली...

त्याने खूप स्ट्रगल केले. आता कुठे चांगले रोल मिळायला लागले होते. वेब्सिरीजचे दालन खुले झाले असते तर अजून मजा आली असती, पण आपल्या नशिबात ते नव्हते. त्याचा आवाज आणि डोळे यात काही वेगळीच जादू होती. तो आवाज आता ऐकायला मिळणार नाही याचे खूप वाईट वाटत आहे.