चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

जे चायनीज वस्तुंवर बहि ष्कार टाकायचे म्हणत आहेत त्यांच्यसाठी माहिती: कमी किंमतीच्या वस्तू आयात करुन विकणारे आपले छोटे उद्योजक व्यापारी आहेत. त्यांच्या पोटावर पाय येइल. फिनिश्ड गुड घेणार नाही पण चीन मधून जो कच्चा माल निर्यात होतो तो अनेकविध वस्तुंमध्ये जातो. त्या पण सोडाव्या लागतील.

व्यापारावर व दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांवर निगो शिएट करून निर्बंध सेट करून व्यापार करण्यावर लक्ष केंद्रित केले तर खरे म्हण जे इयु सारखे एशिअन इकॉ नॉमिक झोन बनव णे शक्य आहे. त्यामुळे सर्वांचाच आर्थिक फायदा व एक प्रकारची स्टॅबिलिटी नांदेल. उगीच भावनिक आपील करून अस्थिरता वाढवण्यात काही अर्थ नाही. पण लक्षात कोण घेतो.

भारतीय उद्योगांना हानी पोचावी ह्या हेतू नी Cost of production पेक्षा काही किमतीत चीन जर त्याच्या वस्तू भारतीय बाजार पेठेत विकत असेल तर ते गंभीर आणि गुन्हेगारी कृत्य आहे.(सरकारी मदतीने किंवा भांडवलाच्या जोरावर )
आणि तसे करत नसेल तर चीन च्या मालावर आपण बहिष्कार कसा काय घालणार.
आपल्या येथील किती तरी आयटी professional,doctor,aani baki uchh shikshit मंडळी पगार जास्त मिळतो म्हणून विदेशात जातात किंवा विदेशी कंपनी बरोबर काम करत आहेत ना.
मग ग्राहकाला वस्तू स्वस्त मिळत असेल तर त्याला तू. ती वस्तू घेवू नको असे कसे सांगणार

लसुण असतो म्हणे चाइनाचा

हो चीन चा लसूण बाजारात आहे .
आकाराने भारतीय लसाना पेक्षा मोठा असतो.
जे जास्त माणसाचे जेवण बनवतात त्यांना हा लसूण भारी प्रिय असतो .
सोलयला त्रास कमी असतो.
आणि ज्या गृहिणी कामचोर असतात त्यांना पण प्रिय असतो .
पण भारतीय लसणाच्या चवीची तो बरोबरी करू शकत नाही.

मानवतेच्या दृष्टीकोनातून पडलेला एक मूलभूत प्रश्न -
जर मी, आपण सर्व भारतीय आणि सारे जग आपापल्या परीने चीनवर आणि त्यांच्या मालावर बहिष्कार टाकतो तर त्यांची वाताहत होईल आणि याचा फटका अर्थातच तेथील सामान्य जनतेला बसेल. तळागाळातले कदाचित उपासमारीने मरतीलही.
तर मुळातच असे करावे का?
हा बदला का घ्यावा?
कोरोना विषाणू पसरवणे हे चीनचे कारस्थान आहे हे अजून सिद्ध झाले नाही. कदाचित त्यांचा हलगर्जीपणा हि चूक असावी. पण म्हणून ईतका टोकाचा निर्णय घ्यावा का?

समजा उद्या हे लोन पसरले तर हे तिसरया महायुद्धाला कारणीभूत ठरू शकते हा धोकाही आहेच.

चीन आजवर आपला राजकीय शत्रूच राहिला आहे. पण आजवर सारे व्यापार आपल्या जागी चालूच होते. मग अचानक कोरोनाबाबत चीनला गुन्हेगार ठरवत हा निर्णय घ्यायची घाई का?

- पोस्ट क्रमांक १००

३रे महायुद्ध ऑलरेडी आखातापासून सुरु झालेलंच आहे फक्त त्याची व्याप्ती स्ट्रिंग ऑफ़ पर्ल पर्यन्त नको यायला ... पण येणाऱ्या काळात सर्वच कठीण असणार

चिनी माल न ठेवून भारतीय व्यापाऱ्यांच्या पोटावर कसा पाय येईल हे कळले नाही. माझ्या मते काही थोडेसे अपवाद सोडले तर चीन अश्याच गोष्टींची निर्यात करते ज्या आपल्याकडेपण सहज तयार होतात आणि नसतीलच तर तयार करता येतात किंवा दुसऱ्या देशातून आयात करता येतात. फक्त त्या थोड्या महाग असतात. पण व्यापाऱ्यांनी ठरवून चिनी वस्तू ठेवल्याचं नाहीत तर आपोआपच इथले ग्राहक भारतीय वस्तू विकत घेतील. उद्या मी ठरवले की दिवाळीला दिव्यांची माळ आणायची तर चीनची ६० रु ची माळ बाजारात नसेलच तर मी आपसूकच १०० रु ची भारतीय बनावटीची माळ घेईन. जोपर्यंत चिनी माल भारतीय बाजारात नव्हता तेंव्हा लोक भारतीय माळ खरेदी करत होतेच. परंतु स्वस्तात वस्तू उपलब्ध झाल्यामुळे लोक त्याकडे वळले. अश्या वेळी पुन्हा एकजुटीने ठरवून व्यापाऱ्यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला तर ज्याला वस्तू हवी आहे तो थोडेसे पैसे जास्त देऊन इथलाच माळ घेईल.
ग्राहक घेतो म्हणून व्यापारी ठेवतो आणि व्यापारी ठेऊन स्वस्तात पर्यंत उपलब्ध करून देतो म्हणून ग्राहक घेतो. अश्या वेळी ही साखळी तोडायची असेल तर ग्राहक आणि व्यापारी दोघांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु आपल्याकडे ग्राहक संख्या प्रचंड असल्यामुळे सर्वजणच चिनी माल घेणार नाही असे ठरवू शकत नाहीत. अश्या वेळी व्यापाऱ्यांनी सुरुवातीला कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. पुढे आपसूकच त्याची सवय होईल आणि चिनीं मालाची मागणी कमी होईल. दरम्यान ज्या गोष्टींना चिनी पर्याय नाही त्याचे उत्पादन इथे स्वस्तात कसे करता येईल याबाबतीपण प्रयत्न व्हावेत.
मध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला माल निर्यात करणे बंद केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी मलेशियाचा भारतविरोधी सूर पाहून मलेशियाकडून पाम तेल घेणेदेखील बंद केले होते त्याऐवजी थोडे महागात का होईना पण इंडोनेशियातून आयात केले. तसे चीन च्या बाबतील का करता येऊ नये? चिनी माल हा काय अणुबॉंब चे तंत्रज्ञान नाही की तिथून नसेल तर इतर कोठूनपण मिळणार नाही किंवा आपल्याकडे तयार करता येणार नाही.

ईस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार पाहुन खरे कसे कळणार.
एखद्या भ्रष्ट अधिकार्याने थोडी चान्दी मधल्याम्ध्ये स्वतः ढापुन शिवाजी महाराजांच्यावर खापर फोडले असु शकते.
आपल्याला फक्त एवढे कळते की त्याने तसा आरोप केला.
जर कंपनीचा विश्वास नसता तर त्यानी तो वजनकाटा वापरायचे मान्यच केले नसते.

तेच की
आणि रायगड़ावरुन मनुष्य येणे जाणे अवघड
तिथे इतक्या टनाची धातु ने आण कोण करेल

मुळातच असे करावे का?

@ ऋन्मेष

हा खरंच बाळबोध प्रश्न आहे कि खोचकपणे विचारत आहात?

चीनने भारताच्या सर्वच्या सर्व शेजार्यांना वेठीस धरून तुमच्या चारी बाजूनी आपले लष्करी तळ तयार करून तुमचा गळा आवळायला सुरुवात केली आहे.

ग्वाडर बंदर (पाकिस्तान), हंबनटोटा बंदर( श्रीलंका), कोको बेट(म्यानमार) याबद्दल माहिती गुगलून पहा.

रोहिंग्याना आणि म्यानमारमधील इतर फुटीरतावादी गटांना छुपे साहाय्य देऊन म्यानमार अशांत ठेवून आपले व्यापारी फायदे उचलण्याचे धंदे चीन करीतच आहे.

मधून मधून चिनी लष्कर डोकलाम, अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत घुसून येत असते.

चीनने आपल्या सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगितलेला आहे.

पुर्वांचलात नागाप्रदेश, मिझोराम मध्ये माओवादी लोकांना आणि तेथील इतर फुटीरतावादी गटांना सहाय्य देऊन त्यांच्याकडून देशविरोधी कारवाया करून तो भाग कायमचा अशांत ठेवलेला आहे. आणि या प्रकाराला भारतीय कम्युनिस्टांचा छुपा पाठिंबा असतो.

आजच नव्हे तर पूर्वी सुद्धा चीन हा आपला शत्रू क्रमांक एक आहे असे श्री जॉर्ज फर्नांडिस म्हणाले होते. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/china-pote...

अजूनही आपल्याकडचे लाल छत्रीवाले( बीजिंग मध्ये पाऊस पडला तर इकडे छत्री उघडणारे) वाममार्गी लोक चीनला पाठिंबा देताना पहिले कि संताप होतो.

आज जगभर चीनविरुद्ध असलेल्या जनमताचा जास्तीत जास्त फायदा भारताने उठवला पाहिजे. मग तो कोव्हीडमुळे असो कि कशामुळेही. आणि त्यात चीन निर्दोष असो कि दोषी.

रथचक्र जमिनीने गिळले असताना अर्जुनाने कर्णाचा वध केला हे महाभारतातील उदाहरण आपण कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे.

राष्ट्रहित प्रथम
. धर्म अधर्म बाजूला ठेवा.

राष्ट्रहित प्रथम. धर्म अधर्म बाजूला ठेवा.
Submitted by सुबोध खरे on 20 April, 2020 - 20:24
>>>>

माझ्यासाठी मानवता याच्या आधी येते. प्रत्येकाचे विचर वेगळे असूच शकतात.
असो तो वेगळा विषय झाला.
बाकी चीन आपला शत्रू आहे हे मी माझ्या पोस्टम्ध्ये म्हटलेच आहे. तरी त्यांनी आपल्या काय कुरापती काढल्यात हे सांगितलेत त्यात हरकत नाही.
पण माझा प्रश्न हाच आहे की हे घडत असताना वा आधी हे घडले असतानही आपला चीनशी व्यापार चालूच होता ना? तो का? आणि मग आज अचनक का नाही?

व्यापारावर चर्चा करण्याआधी सर्वांनी भारतासंदर्भात चीनच्या सिपेक कॉरिडॉर, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणि थेअरी ऑफ स्ट्रिंग ऑफ पर्ल्स चा थोडा अभ्यास करावा. त्यांनतर सर्व चित्र सुस्पष्ट होईल

जास्त मोठा परिणाम होऊ नये म्हणून भारताने फक्त देशाच्या सीमेला लागून असलेल्या राष्ट्रांसाठी indirect and direct investment rules बदललेत.

चीनने भारतातील अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

बिग बास्केट,Paytm आणि ओला यांसारख्या अनेक स्टार्ट‌अप्स मध्ये Alibaba व Tencent या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

Think tank Gateway House च्या फेब्रुवारी मधील रिपोर्ट नुसार चीनने 4 बिलियन डॉलर्स ची गुंतवणूक भारतीय स्टार्ट‌अप्स मध्ये केली आहे,त्यात
Byju’s, MakeMyTrip, Zomato व Swiggy यांचा समावेश आहे.

थेट विदेशी गुंतवणूकीसाठी आता केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे.याचा परिणाम काय होतो ते येणाऱ्या काळात समजेल.

https://www.livemint.com/news/india/china-fdi-constraints-may-put-tech-s...

हे म्हणजे क्रोनाच्या विमानबन्दीगत झाले
2-4 देशानाच बन्दी
आणि मग सगलिकड़ून घुसले

राजीव गांधीची डिग्री क़ाय आहे ?
एंटायर पोलोटिकल सायन्स शिकुनही एंटायर बंदी घालता येत नाही ?!

जास्त मोठा परिणाम होऊ नये म्हणून भारताने फक्त देशाच्या सीमेला लागून असलेल्या राष्ट्रांसाठी indirect and direct investment rules बदललेत.
>>>>>>
हो .याचा आपल्याला फायदाच होणार आहे.

हे म्हणजे क्रोनाच्या विमानबन्दीगत झाले
2-4 देशानाच बन्दी
आणि मग सगलिकड़ून घुसले
>>>>>>>>>>>
याची भीती आहेच.पण केंद्र सरकारने त्यावर काहीतरी उपाय केला असेल अशी आशा आहे.

ष्ट्रहित प्रथम. धर्म अधर्म बाजूला ठेवा.
Submitted by सुबोध खरे on 20 April, 2020 - 20:24
>>>>

माझ्यासाठी मानवता याच्या आधी येते. >>>>>>>>>>>>>.

ऋन्मेऽऽष, चिनी बनावटीच्या मालामुळे आपल्या देशातील अनेक उद्योग बुडालेत, अनेकांच्या पोटावर पाय आलेत तेंव्हा देशी बनावटीचा माल वापरून देशातील लोकांचे भले करणे यातसुद्धा मानवता आलीच ना.

ऋन्मेष
मानवता धर्म जो तुमचा आहे.
शत्रू हित पाहिले आपलं नंतर ही तुमच्या मानवता धर्माची शिक्षा आहे.
मला हे विचाऱ्यचे होते तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात मानवता धर्म पाळता का.
रिक्षावाल्याने शिव्या घातल्या दोन कानाखाली जरी मारल्या तरी त्याच्या पोटावर पाय येवू नये म्हणून त्याच रिक्षात जाणे
असे कधी केले आहे.
वाणी सर्व बनावट माल तुम्हाला देत आहे तरी त्याचे दुकान चालावे म्हणून तिथूनच खरेदी करत आहेत.
पगार न घेता महिनाभर काम केले आहे कंपनी ची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून

सार्वजनिक वाहनात अत्यंत manner hin माणसाला बसायला जागा दिली आहे का.
त्याचे पाय दुखतील उभे राहून म्हणून.
प्रामाणिक,गरीब,न्याय प्रिय व्यक्ती वर मानवता दाखवावी
गुंड, फसवणूक करणारे देश ह्यांच्या वर नाही.
आपले अस्तित्व जो पुसायचा विचार करत आहे अशा बद्द्ल तर कधीच मानवता दाखवायची गरज नाही.
ते फक्त पुस्तकात वाचायला आणि दुसऱ्यांना सांगायला एवढ्याच कामाचे आहे

इस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्यातरी व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या नावावर काहीतरी खपवलेले असावे. शिवाजी महाराज असले काही करतील असे अजिबात वाटत नाही - विशेषतः खराब काट्यावर वजन वगैरे. बाकी वाट पाहायला लावणे वगैरे व्यापारी मुत्सद्दीपणाचा भाग असेल. बाकी अमितव व आशूचॅम्प ने लिहीले आहे ते ही विचार करण्यासारखे आहे. तसेच असले काही करून त्या कंपनीचे सत्ता मिळवण्याचे मार्ग रोखता येतील हे ही शिवाजी महाराजांना माहीत होते वगैरे खूपच ताणलेले लॉजिक आहे.

बाकी वैयक्तिक लेव्हलला लोकांनी चायनीज माल वापरायचा नाही ठरवले तर त्यात काही चूक नाही. त्यावरून आठवले. अमेरिकेत आल्याच्या सुरूवातीच्या दिवसांत नाइकी चे शूज डील वगैरे बघून आम्ही घ्यायचो. भारतातही भेट म्हणून न्यायचो. मात्र ऑफिसमधले व इतरत्र अनेक गोर्‍यांच्या पायात न्यू बॅलन्स चे शूज दिसत. हा ब्रॅण्ड भारतात फारसा ऐकला नव्हता. नंतर एकाकडून कळाले की न्यू बॅलन्स हा अमेरिकेत बनतो व कदाचित त्यामुळे अनेक लोक ते घेतात. ते कारण कितपत खरे होते माहीत नाही. पण आत्ताही चेक केले तर न्यू बॅलन्स ७०% अमेरिकेतच बनतो व त्यामुळे ते Made in USA टॅग लावू शकतात.

Pages