विसंगती!

Submitted by राघव_ on 20 April, 2020 - 08:33

फुललेल्या पळसाच्या सौदर्याची बात न्यारी!
पण पळसाला आस, तेव्हा पानांचीच खरी..

झाड तुटे - तुटे जीव, घरटीही उलथती..
मी, नुसताच बघ्या.. सल लागतो जिव्हारी..

विसंगती जीवनास पाचवीला पुजलेली..
कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्या(च) उरी..

वादळाचा तिढा, आता कुणी कसा सोडवावा..
पणतीस तेवतांना बघण्याची ईच्छा धरी !!

भुकेल्यास अन्न देता मनी नाही समाधान..
हिशेबात पुण्य येई.. अशी मनाची पायरी..
--
हसू राखतो जरासे.. तडजोड जगण्याशी..
पण रोकडे सवाल.. ओघळती गालांवरी..

राघव

टीपः
कविता इतरत्र अगोदर प्रकाशित.

Group content visibility: 
Use group defaults

>>>>>वादळाचा तिढा, आता कुणी कसा सोडवावा..
पणतीस तेवतांना बघण्याची ईच्छा धरी !!

भुकेल्यास अन्न देता मनी नाही समाधान..
हिशेबात पुण्य येई.. अशी मनाची पायरी..>>>>

क्या बात है दोन्ही शेर अप्रतिम आहेत.