हा खेळ बाहुल्यांचा! - भाग ९ (नवीन भाग)

Submitted by अज्ञातवासी on 13 April, 2020 - 07:31

याआधीचे भाग!

भाग ८
https://www.maayboli.com/node/71963

भाग ७
https://www.maayboli.com/node/71844

भाग ६
https://www.maayboli.com/node/70390

भाग ५
https://www.maayboli.com/node/70293

भाग ४
https://www.maayboli.com/node/70257

भाग ३ 
https://www.maayboli.com/node/70202

भाग २
https://www.maayboli.com/node/70182

भाग १

https://www.maayboli.com/node/70130

वाडा भरपूर मोठा होता. निरनिराळ्या खोल्यांमध्ये सगळ्यांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती.
हंसराज जातीने सर्व खोल्यांची व्यवस्था बघत होता.
"सूर्याजीमामा, सर्व व्यवस्था चोख आहे ना?"
"हो मालक."
"पाचव्या पालखीची व्यवस्था?"
"कोपऱ्यावर केलीये मालक. दाभाडेना वाटलं तरीही पोहोचायला अर्धा तास लागलं." सूर्याजीमामांनी डोळा बारीक केला.
हंसराज समाधानाने हसला.
"मामा, खूप केलंत."
त्याने हातातलं सोन्याचं कडं काढलं, व त्यांच्या हातावर टेकवलं.
"मालक???" सुर्याजीचा स्वर कातर झाला.
"यापुढे भेट नाही मामा. यापुढे भेट नाही."
"मालक अजूनही विचार करा. दाभाडेची खांडोळी करायला मला वेळ नाही लागणार."
"गरज नाही मामा. मात्र आता तुम्ही निघा, लांबवर निघून जा... पुन्हा या वाड्यात पाऊल टाकू नका. जा!"
सुर्याजीने डोळे पुसले, व तो तिथून चालता झाला.
तो आपल्या खोलीत आला. त्याने चेहरा स्वच्छ धुतला. रंगरंगोटी काढली. एक सफेद अंगरखा घालून तो कोपऱ्यावरच्या खोलीकडे निघाला.
त्या खोलीपर्यंत पोहोचायला त्याला मुळीच वेळ लागला नाही, मात्र नवीन माणूस नक्कीच ती खोली लवकर शोधू शकला नसता.
खोली उघडीच होती, एक मंद दिवा तेवढा तेवत होता.
हंसराज आत गेला...
"आपण याल याची खात्री होती." एका स्त्रीचा आवाज ऐकू आला.
हंसराज पुढे गेला, व आवेगाने तिला मिठी मारली.
"अविचार नको. दाभाडे ठिकठिकाणी कान पेरून ठेवतात. सावध राहायला हवं."
"चार बायका आहेत, दाभाड्याच्या, तरीही तुझ्या सारख्या तरुणीवर नजर. तुझा बाप याला तयार कसा झाला?"
"एका साध्या पाटलाची मुलगी सरदारसाहेबांकडे जातेय म्हटल्यावर कोण तयार होणार नाही? ती विषण्ण हसली."
हंसराजही शांत झाला.
"मधुकर???"
"नाही राधा, हे नाव चुकूनही उच्चरू नकोस. हे नाव फार मागे गेलंय."
"मधुकर, माझ्यासाठी हे नाव कायम असेन. या नावासाठी मी माझ्या प्रेमाची आहुती देऊन, या म्हाताऱ्या सरदाराची बायको झाले. फक्त तुझ्यासाठी."
दोघांनी एकमेकांना मिठी मारली, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर थांबत नव्हता.
दुःखावेग ओसरल्यावर हंसराजने तिला विचारले.
"वस्तू आणलीय?"
"हो."
तिने एक केसांचा झुपका हंसराजासमोर ठेवला.
"दुसरी वस्तू?"
"ही वस्तू जमवायला फार कष्ट पडले हंसराज."
तिने त्याच्यासमोर एक बंदिस्त पात्र ठेवलं.
"आज रात्री या सगळ्याचा अंत होईल राधा. मी आता अनुष्ठानाला बसेन, पण एक लक्षात ठेव. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं, आणि तुलाही काही अपाय करण्याचा प्रयत्न झाला तर..."
त्याने समोरच एक कपाट उघडलं. त्यातून एक भलीमोठी बाहुली बाहेर काढली.
"तर फक्त या बाहुलीचा उजवा हात तुझ्या डाव्या हातात घेऊन प्राण दे."
हंसराजाने केसांचा झुपका उचलला, ते पात्र उचललं आणि तो चालता झाला.
-----
वाड्याच्या सगळ्यात मागच्या बाजूला अडगळीची खोली होती. तिथे कायम कुलूप असे.
हंसराज खोलीजवळ गेला, व त्याने ते कुलूप उघडले. करकर असा आवाज झाला. त्या रात्रीच्या अंधारात तो आवाज फार भेसूर वाटला.
आत गेल्यावर त्याने मशाल पेटवली. समोर एक
विझलेलं अग्निकुंड होतं. तिथेच एक भलीमोठी गाठोडी पडलेली होती.
त्याने गाठोडी उघडली. त्यातून मोहोरी काढली, व तिच्याने स्वतःभोवती एक भलंमोठं वर्तुळ बनवलं. तिच्यातून व्याघ्रजीन काढून ते अंथरल. एक माळ काढून गळ्यात घातली. घोड्याच्या दातांची माळ...
समोरचं यज्ञकुंड त्याने बाभळीच्या काट्यानी खचाखच भरलं. त्यावर विविध प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेलं तेल भसभसा ओतलं. मानवी हात कोरून बनवलेली पळी त्याने डाव्या हाताला घेतली.
राधेने दिलेलं पात्र त्याने उघडलं, व त्यातला द्रव एका मानवी कवटीत ओतला.
ते रक्त होतं... सरदार दाभाडे यांचं रक्त...
ते रक्त बघून तो खुशीत हसला.
त्याने आणलेली मशाल समोरच्या कुंडात भिरकावली.
...त्या कुंडात धगधगत्या ज्वाळा उठल्या...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@जुई - धन्यवाद!
@प्रज्ञा - धन्यवाद!
@मी माझा - धन्यवाद!

पुढील भाग पोस्ट केला आहे...