©राक्षसमंदिर - १

Submitted by अज्ञातवासी on 10 April, 2020 - 09:10

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

प्रथम भाग -
https://www.maayboli.com/node/74084

द्वितीय भाग -
https://www.maayboli.com/node/74090#new

तृतीय भाग -
https://www.maayboli.com/node/74100

चतुर्थ भाग -
https://www.maayboli.com/node/74111

पंचम भाग -
https://www.maayboli.com/node/74116

अंतिम भाग -
https://www.maayboli.com/node/74122

रटरटत्या उन्हात मल्लापाची भट्टी अजूनच रसरसली होती. कोळशाना वारा घालण्याचं काम अम्मा करत होती.
"अम्मा, पाणी मिळेल काय?"
अम्माने वर बघितले. आडव्या गंधाच्या रेषा ओढलेल्या, काळाकुट्ट चेहरा तिच्या समोर उभा होता.
"हं." अम्मा हुंकारली, आणि आत गेली.
त्या माणसाने तिथेच ठाण मांडलं आणि त्याच्या जवळची पोतडी उघडली. पोतडीतून त्याने एक डबी काढली. तिच्यातून चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात चुना मिसळला. ती तंबाखू हातावर खसाखसा मळली. तेवढ्यात त्याचं मल्लापाकडे लक्ष गेलं.
"घेणार काय?"
मल्लापाने हातानेच नकार दिला.
अम्मीने तांब्याभर पाणी आणलं... त्याने ओशाळून तंबाखू बाजूला पोतडीवर ओतली. आणि तांब्या हातात घेऊन आधी खसाखसा चूळ भरली, मग घोटभर पाणी घेऊन पुन्हा तंबाखू हातात घेतली.
"राक्षसमंदिराकडे जावायाचे होते," तो बार भरता भरता म्हणाला.
"ये राक्षसा..." अम्माचे डोळे विस्फारले, तिने घाईघाईने तांब्या हिसकावला, बाहेर जाऊन थुंकली, तो तांब्या तसाच भट्टीच्या कोळशावर फेकला, आणि काहीतरी पुटपुटू लागली.
"उठ आणि चालायला लाग!" मल्लापा शांतपणे म्हणाला.
तो वाटसरू जागचा हालला नाही, उलट जरा जास्तच रेलून बसला.
"मल्लापा, हाकलून लाव त्याला," अम्मा ओरडली.
"अम्मा, लक्ष्मीपुत्राला हाकलून लावतायेत तुम्ही थोडा विचार तर करा." त्याने अम्माच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं.
अम्मा जागीच थबकली. मल्लापाचेही डोळे लकाकले.
"तू आणि लक्ष्मीपुत्र? " अम्मा विषण्ण हसली
अम्मा माझ्या रूपावर जातात आणि लोक फसतात. थांबा तुम्हाला गमजा दाखवतो.
त्याने त्याची पोतडी उघडली, त्यातून एक लहानशी पेटी बाहेर काढली, आणि तिच्यातून एक छोटीशी चकाकणारी गोळी काढली.
"हे घ्या, तुमच्या पाण्याचा मोबदला. पण हे क्षय आहे. जे मी तुम्हाला देणार होतो ते अक्षय, अविनाशी होतं."
त्याने ती गोळी तिथेच ठेवली, व तो जायला निघाला.
तेवढ्यात मल्लापाने त्याला अडवले.
"कुठे निघालास? तुला काय हवंय ते तर सांग. आणि राक्षसमंदिराची अपकीर्ती तुला माहिती नाही?"
अम्माचा चेहरा भीतीने काळवंडला.
"अपकीर्ती नव्हे, तर दंतकथा. या दंतकथा पसरवल्या जातात त्या त्या जागेला अबाधित ठेवण्यासाठी."
"अरे मूर्ख, दंतकथा नाही. जो राक्षसमंदिरात जाईल, त्याच्या घरादाराची राखरांगोळी होईल, असा शाप आहे. तिथे सोन्याच्या राशी असतील, पण तिथे जाऊन आल्यावर माणूस भ्रमिष्ट होऊन मरतो हे तुला कुणी सांगितलं नाही?"
"तुम्ही बघितलय कुणाला, जाऊन येताना?" तो हसला.
अम्माकडे याचं उत्तर नव्हतं.
"दंतकथा, अम्मा दंतकथा!" आता माझं ऐका.
वाटसरुने सांगायला सुरुवात केली.
"माझं नाव अधीरराज. तुम्ही काटीपूर गाव ऐकलं असेलच."
"हो, खोबऱ्यासाठी त्या गावात जातात." मल्लापा म्हणाला.
"तिथले जमीनदार अरण्यवदन यांचा मी सगळ्यात लहान नातू. गेल्याच वर्षी ते वयाच्या एकशे सहाव्या वर्षी वारले. ते गेल्यानंतर माझ्याकडे अमाप संपत्ती आली. मात्र त्यांनी जाताना माझ्या कानात काहीतरी मोठे रहस्य सांगितले. जे रहस्य मलाही तर सुरुवातीला खोटे वाटले, पण शेवटी मला त्याचा अर्थ उमजला. "
"तू हे सगळं आम्हाला का सांगतोय?"
"सांगतो, मल्लराजा, सांगतो. कथा अथवा घटना पूर्ण ऐकल्याशिवाय प्रश्न विचारू नये असं शास्त्रवचन आहे."
"आजोबांनी मला सांगितल्याप्रमाणे, मी आमच्या देवखोलीत गेलो. तिथून देवतांच्या मुर्त्या बाजूला करून मी त्याखाली असलेलं फडताळ उघडलं, आणि त्यात ही पोतडी सापडली."
"मग..." मल्लापाने विचारलं आणि जीभ चावली.
अधीरराज हसला.
"त्यात एक छोटीशी पोथी होती. मी पोथी अधीरतेने वाचायला सुरुवात केली.
अनेक वर्षांपूर्वी माझे आजोबा हे गाव, म्हणजेच राक्षसभुवन येथे आले. तेव्हा त्यांचं वय बरच झालं होतं. इथे येऊन ते सर्वप्रथम तुमच्या वडिलांना भेटले. रात्री अम्मानी त्यांना ज्वारीच्या भाकऱ्या आणि सुरणाची भाजी खाऊ घातली होती."
"नराधम, निघ इथून." अम्मा त्याच्या अंगावर धावली.
"अम्मा, मला मारावयचा तुम्हास पूर्ण अधिकार आहे. पण लक्षात घ्या, ती घटना घडली तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता."
मल्लापा चकित होऊन त्याच्याकडे बघू लागला.
अधीरराजाने सुरुवात केली.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या बाव्हलीच्या भुताच बघा की राव आधी... तळेगाव दाभाडेच्या पुढे गेलेली नाय...

आता ही दुसरी.. सुरवात चांगली हाय पर समदी लिवून काढा...

@पाफा - जशी तुमची आज्ञा
@मन्या - धन्यवाद! प्रतीक्षा संपलेली आहे Happy
@धनुडी - धन्यवाद! पुढचा भाग आलेला आहे.
@कटप्पा -अपने कॅरेक्टर को ठीक से निभाओ कटप्पा! Lol
@जयश्री - भारी धमकी Proud पण हीच कथा सगळ्यात आधी पूर्ण झाली तर Wink
@आसा - धन्यवाद आबासाहेब
@मी माझा - लिहू की, त्यात काय. Happy
@प्रज्ञा - धन्यवाद. होप तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही

@बोकलत - धन्यवाद
@पद्म - धन्यवाद
@किल्ली - आमच्याकडे गोदावरी नदी आहे. गंगेची उपनदी. तिच्यावर गंगापूर धरण बांधलंय. समस्त शहराला त्यातून पाणीपुरवठा होतो. मी दररोज त्याच पाण्याने अंघोळ करतो. ...
...गंगेच्या पाण्याने अंघोळ केल्याने सर्व पापे धुतली जातात. असं शास्त्र सांगते. Lol
धन्यवाद!

@पाफा - अरेरे, आमच्या एरियातलं वापरलेलं पाणी तुमच्याकडे शुद्ध म्हणून सोडत असतील असं वाटलं नव्हतं.
धिक्कार, निषेध Proud

भारी धमकी Proud पण हीच कथा सगळ्यात आधी पूर्ण झाली तर Wink

तरी मी नाही वाचणार ही... आधी ती पूर्ण करा मग ती वाचून झाली की मग ही वाचेल

धन्यवाद आदीश्री!
सर्व भागांच्या लिंक हेडर मध्ये अपडेट केल्या आहेत.

हि कथा पण बहुधा अपूर्ण राहिली आहे का?

लेखक महाशय सध्या अंमली मधे गुंतलेत, आशा आहे की ती लवकर पूर्णत्वास जाईल

अज्ञातवासी सीजन २ एका चांगल्या टप्प्यावर आणून सोडली आहे

लेखक महाशय..एक विनंती आहे, तुमच्या कथा आम्ही आवडीने वाचतो, मायबोली मुळे अगदी फुकटात. तूम्ही (आणि मायबोली चे सर्व लेखक) छान कथा इथे पोस्ट करता. पण गरीब वाचकांचा जीव असा टांगणीला लावू नका. तुमच्या इतर कार्यामुळे पुढचे भाग यायला कधी उशीर होतो हे समजतो आम्ही, पण कृपया कथा पूर्ण केल्यात तर बर होईल.
अंमली नंतर अज्ञातवासी ला अजून थोडा वेळ विश्रंती दया आणि जमलं तर ह्या पूर्वीच्या कथा (बाहुलीच्या खेळातील दाभाडे पण वाट बघतायत) पूर्ण करायच बघा जरा

... ह्या कथेचा अंतिम भाग सापडला.....
धन्यवाद

@च्रप्स - धन्यवाद! बऱ्याच दिवसांनी हा धागा वर आला.
@केशवकूल - धन्यवाद Happy
@manya - खरचं सध्या खूप बिझी स्केड्युल चालू आहे, म्हणून मनापासून माफी. आणि धन्यवाद Happy