‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती

Submitted by Dr Raju Kasambe on 4 April, 2020 - 00:25

‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती

गेले काही दिवस ‘कोरोना’ नावाच्या राक्षसाच्या भीतीने आम्ही स्वतःला घरात कोंडून घेतल्यामुळे आम्हाला वैराग्याची भावना प्राप्त व्हायला लागली. आम्ही आयुष्यातल्या बहुतेक सुखसुविधांचा त्याग केला. त्याचा आम्ही इतक्या सहजपणे त्याग करू शकू असे आम्हाला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. तेव्हा आता आपण आयुष्यातील पुढील वाटचाली बाबत ज्ञानी गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे असे अस्मादिकांच्या डोक्यात आले.

मेहेनत केल्यानंतर हिमालयातून तपस्या करून आलेले महान तपस्वी ओमशांती स्वामींची ऑनलाइन आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली. आम्ही घरासमोरचा रस्ता, हायवे, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा आदि सर्व सुखसुविधांचा त्याग केल्यामुळे आम्हाला दूसरा राजमार्ग नव्हता. गुरुजींसोबत झालेल्या आध्यात्मिक चर्चेचा इतीवृत्तान्त इथे थोडक्यात देतो आहे.

अज्ञानी बालक (म्हणजे मी): गुरुजी, मैने सब सुख सुविधाये त्याग कर दी है. पिछ्ले कई दिनो से केवल मै दो लघुवस्त्रोपे जी रहा हूँ. खाना भी एकदम सात्विक कर दिया है. सब्जी रोटी, सब्जी भाकरी, सब्जी चावल, बस. पत्नीजी केवल कफनी पेहेने हुये है. इतनाही नही, उसने इतने दिनो से मेकअप तक नही किया (ह्यामुळे आम्हाला तिच्या खर्‍या सौंदर्याचा म्हणजे मनाच्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला). बच्चे तो चड्डीयोमे घूमते कितने खुश नजर आ रहे है. कपडो की अलमारी खोलके देखना भी हमने बंद कर दिया है. मोह माया से हम कोसो दूर जा रहे है.

और हम सब हमारी सातवी मंजिल वाली छोटीसी गुफामे अध्ययन चिंतन कर रहे है. वही पे हमने सामाजिक बंधनोसे मुक्त होकर खुदको बंदिस्त बना के रखा है! एक दिन हम केवल आठ रोटीया और आठ जीबी डेटा पर काट रहे है. योगा करते है, ध्यान धारना करते है, ५२ पत्तो की धार्मिक किताब के पत्तीया देखते है, एक दुसरे को खुशिया बांटते है. कभी कभी खिडकीयो मे खडे होकर तालिया एवम बर्तन पिटते है. गुरुजी, हमे मार्गदर्शन करे! (मी एका दमात आमच्या अचिव्हमेंट सांगून टाकल्या. गुरुजींना इम्प्रेस करायचा चान्स मला सोडायचा नव्हता).

गुरुजी: ये बहोत अच्छी बात है. तूम बडीही देशसेवा कर रहे हो. बाहर रास्ते पर मोह, माया, स्वार्थ, खतरनाक रोग रूपी राक्षस घूम रहे है. जो भी अच्छा इंसान मिला उसे जकड लेते है.

मी: गुरूजी मुझे ऐसे लग रहा है की मुझे वैराग्य प्राप्त हूवा है! क्या मै हिमालय की तरफ प्रस्थान करू?’ (मी सरळ मुद्द्यालाच हात घातला).
गुरुजी: वत्स, तुम्हे ये करने की जरूरत नही. तुम्हे हिमालय की गूफा मे प्राप्त होने वाली सारी सुविधाये तुम्हारे घरपर ही मुहय्या कराई जाएगी. कही जाने की जरूरत नही!’

मी: वो कैसे गुरुजी?

गुरुजी: जैसे तुम्हे ध्यानधारना करनेके लीये शांती चाहीये - वो मिलेंगी. रोशनीसे मन विचलित होता है. उसे हम खत्म कर देंगे. अंधेरा भी मुहय्या कराएंगे. फिर तूम लकडी अथवा मोमबत्ती जलाकर रोशनी निर्माण करना. देखो तुम्हे कितनी आत्मशांती मिलती है.

मी: जी गुरुजी! मै विदर्भसे हूँ. इसका अच्छा साझा अनुभव है मेरे पास. तबसे ही मुझे वैराग्यकी ओढ खिचती आ रही है. हम कोई भी चीज कभी मांगते नही. मोह माया से दूर है हम.

गुरुजी: तुम्हे किसकी याद आती है? अपने माता पिता की?

मी: वो कामवाली! मतलब.... (घाणेरड्या सवई सहज जात नाहीत)

गुरुजी: अभी ये बात समझ लो की तूम स्वयंपूर्ण हो गये हो. खुद के सारे काम खुद कर रहे हो. तूम बापुजी के आदर्शो पर मार्गक्रमण कर रहे हो !!
(मी आयुष्यात एवढे काही अचिव्ह केले असेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते).

गुरुजी: वक्त कैसा बिताते हो? (गुरुजींनी आमची चौकशी केली).

मी: वो रामानंद सागर गुरुजी के रामायण की अध्यात्मपूर्ण मालिका देखता हूँ. तथा महाभारत के पुनःप्रसारण का भी लाभ उठा रहा हूँ! (मनातल्या मनात मी मा. सनी लीओनीजीच्या जल तथा रासक्रीडा तसेच नेटफ्लिक्स बद्दल बोलणारच होतो पण स्वतःला सांभाळले).

गुरुजी: और दवा पानी लेते हो? (पुन्हा चौकशी)

मी: जी पानी लेता हूँ. और डॉक्टरकी लिखि दवा लेता हूँ. बाकी हमारी ‘दवा’के ठेके तो बंद है. बस आपकी दुवा पे जिंदगी कट रही है !! हाँ, कटने से याद आया मेरे बाल तथा दाढी भी बढी हुई है. मै बिलकुल सन्यासी लग रहा हूँ, गुरुजी.

गुरुजी: बहोत बढिया. दारू, बिडी, सिगरेट ये बुरी लते है. लेकीन बाल बढनेसे या बढानेसे कोई सन्यासी नही होता. मुझे खुशी है की तुमने अपने मन की सारी कमजोरीयों पर विजय प्राप्त की है. अब तूम ये राजू नाम छोड दो. यह कुत्ते का नाम लगता है. आजसे राजतपस्वी स्वामी बन जाओ. तुम्हे अब गुमराह हुये लोगोंको मार्गदर्शन करना होगा. यही तुम्हारी देशभक्तीका परिचायक होगा. इन अच्छे दिनो के बारे मी तूम अखबरोमे, फेसबूक, इनस्टाग्राम तथा व्हाट्सअप यूनिवर्सिटीमे लिखो. मेरे देशवासी भाईयो और बहनो को इन उपलब्धीयोंका एहसास होना चाहीये.

मी: जी गुरुजी! अभी शुरू करता हूँ. नमो नमः! नमो नमः!!

(टिप: मित्रांनो विनोद करणे वेगळी गोष्ट आहे. आज ह्या मानव जातीवर ओढवलेल्या संकटाच्या घडीला सर्वांनी घरातच राहून कोरोनाचा मुकाबला करायचा आहे. तीच खरी देशसेवा ठरेल. कुणीही शानपट्टी करून तकलीफी जमातीत सहभागी होऊ नये – फटके पडतील).

डॉ. राजू कसंबे,
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

राजू सर वैराग्याच्या शुभेच्छा. आम्ही पण या वैराग्याचा अनुभव घेत आहोत. पण हाय रे अपनी किस्मत, हे वैराग्य ,"त्रिदंडी वैराग्य " आहे. अगदी अर्जुनाच्या संन्यासा सारखे.

राजतपस्वी महाराज की जय हो !
यदि गुरुवर्य आग्ग्या (हो हो आग्ग्याच) दे तो उगते सुर्यके समान आभा रखनेवाले (भगवे हो) वस्त्र एवं वैराग्यके सामग्री का आयोजन करें !