छंदिष्ट लोकांसाठी सुवर्णसंधी

Submitted by बुन्नु on 31 March, 2020 - 11:06

मंडळी सध्या आलेल्या कोरोना व्हायरस च्या संकटामुळे आपल्यापैकी बरेच लोक घरात अडकलेले असतील. काही लोक वफह करीत विरंगुळा शोधत असतील, किंवा काही लोक रिकामा वेळ कसा घालवायचा ह्या विचारात असतील. मोबाइल, टीव्ही बघून पण किती आणि काय बघणार कारण सगळीकडे त्याच चर्चा बहुतेक सगळ्या डिप्रेससिंग. काही लोकांचे घरातले डाळ तांदूळ मोजून पण झाले असतील. Happy

पण आपण जर हा वेळ काही नवीन शिकण्यासाठी, किंवा असलेला छंद जोपासण्यासाठी वापरू इच्छित असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी इथे शेअर करू इच्छितो.

माय ब्लूप्रिंट https://www.mybluprint.com या संकेतस्थळाने त्यांचे बहुतेक सर्व कोर्सेस ९ एप्रिल पर्यंत मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. तेव्हा ह्या संधीचा जरूर फायदा घ्या. चित्रकला, शिवणकाम, विणकाम, छायाचित्रण, बेकिंग या आणि अश्या अनेक विषयावरचे कोर्सेस आपण घेऊ शकता.

स्थिर वातावरणात मला हे वाक्य इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते..

“In a time of drastic change it is the learners who inherit the future. The learned usually find themselves equipped to live in a world that no longer exists.” – Eric Hoffer

तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या कुटूंबियांना नवीन काहीतरी शिकण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल अशी आशा करतो आणि आवरते घेतो.

~बन्नू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई. आणि मन्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आशा करतो की तुम्हाला तुमच्या आवडीचे काहीतरी नक्कीच मिळाले असेल. आता निक्कोन या कॅमेरे बनविणाऱ्या कंपनीने सुद्धा त्यांचे सर्वच कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा आणि रिकामा वेळ सत्कारणी लावावा. हे कोर्सेस संपूर्ण एप्रिल महिना मोफत आहेत. अधिक माहिती साठी खाली लिंक देत आहे.

https://www.nikonevents.com/us/live/nikon-school-online