देणं - भाग ५ - अंतिम भाग

Submitted by jpradnya on 29 March, 2020 - 08:13

देणं भाग ४
https://www.maayboli.com/node/73899

देणं भाग ५
“वूड यू लाइक एनीथिंग टु ड्रिंक मा’म ? “
“ ब्लॅक कॉफी प्लीज. नो शुगर नो मिल्क “
“ शुअर .. अँड हाऊ अबाऊट यू सर ? “
“ ब्लॅक टी प्लीज. नो शुगर नो मिल्क “ यश ने एयर हॉस्टेस् ला सांगताच दीप्ती ने रागाने त्याच्या कडे बघितले
“ व्हॉट? डू यू माइंड? “
“ येस आय डू! काय चाललंय हे तुझं? लहान आहेस का तू असली चिडवाचिडवी करायला? “
“ चिडवाचिडवी करायला मोठ्यांना अलाउड नसतं असं कोणी म्हटलंय ? अँड बाय द वे मी अजिबात तुला चिडवलेलं वगरे नाहीये. धिस इज हाऊ आय लाइक माय टी. समजलं ? “
“ व्हॉटएवर ! तुझ्या शी बोलण्यात काय अर्थ आहे ..”
“ बरोब्बर! म्हणूनच पुढले ३ तास एकदम हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बस शहाण्या मुलीसारखी अँड फॉर गॉड’स् सेक स्पेअर मी ! “ म्हणून यश ने हेड फोनस् कानाला लावले आणि डोळे मिटले
डेलॉईट बरोबर ची फायनल मीटिंग आटपून दोघे बंगलोर वरून मुंबई ला परतत होते आणि दुर्दैवाने त्यांच्या सीट्स शेजारी शेजारी होत्या.
पण हे तीन तास दीप्ती ला वाया घालवायचे नव्हते
“ यश .. यश म्हात्रे ! मला तुझ्या शी बोलायचं आहे” त्याच्या खांद्यावर थापटी मारून दीप्ती ने त्याला उठवले
“ अररे आत्ताच आपण गप्प बसण्याचा करार केला ना पण?”
“आय आम सिरियस ! “
“ दॅट यू ऑल्वेज आर! नवीन काय त्यात ..बोला मॅडम आता मी काय घोडं मारलं तुमचं ?”
“माझ्या फॅमिली शी जवळीक करण्या चा हा जो सपाटा लावला आहेस ना तू तो ताबडतोप बंद कर. तुझा जो काही प्लान आहे तो मी सक्सेसफुल होऊ देणार नाही लक्षात ठेव. “ सरळ सरळ धमकी!
तिचा तो आक्रमक पवित्रा बघून यश गंभीर झाला
“माझा काहीएक प्लॅन वगरे नाहीये दीप्ती. मला फक्त आवडतं तुझ्या घरी. तुझी माणसं आवडतात मला खूप. एस्पेशल्ली आदी. आणि मला माहितीए त्याला ही मी खूप आवडतो “
“ आदी पासून दूर रहा तू समजलं ? “
“ त्याला माझी गरज आहे दीप्ती “
“ आदी ला तुझी गरज ? तू स्वतःला काय समजतोस? चारपाच महीने खेळलास काय त्याच्याशी तर तुला वाटतं त्याला तुझी गरज आहे? “
“ तुझा गैरसमज होतोय दीप्ती. आदी ला एका फादर फिगर ची गरज आहे..” डोकं आणि आवाज शक्य तितका जागेवर ठेवून यश दीप्ती ला समजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता
“ आदी ला सांभाळायला मी समर्थ आहे. आणि तुला काय माहीत आहे रे आदी बद्दल एवढं की त्याच्या गरजा तुला कळायला लागल्या ? डू यू ईवन नो व्हॉट ही हॅज बीन थ्रू? “ दीप्ती काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती आणि तिचं आवाज वाक्या गणिक चढतच होता
“ कारण मी सुद्धा आदी च्या जागी होतो २५ वर्षांपूर्वी कळलं? आय ऑल्सो लॉस्ट माय पेरेंट्स इन अन अॅक्सिडेंट ऑन द स्पॉट ! काही पडला का डोक्यात प्रकाश की अजून डिटेल्स देऊ माझ्या भयंकर एकलकोंडया लहानपणाचे? “
यश चा आवाज आता दीप्ति च्या ही वरच्या पट्टीत गेला होता .. डोळे लालबुंद झाले होते आणि कधी नव्हे ते त्यातून पाणी वाहायला लागले होते
ताडकन उठून तो रेस्टरूम मध्ये गेला आणि दीप्ती अवाक् आणि हतबुद्ध होऊन बसून राहिली
पुढील मागील सीट वरचे पॅसेंजर तिच्या कडे पाहू लागले तेव्हा ती चांगलीच वरमली होती
..
लॅंडींग ची वेळ झाली तेव्हा यश ला सीट वर परत यावच लागलं
अनिच्छेने तो दीप्ती शेजारी बसला आणि सीटबेल्ट लावून दीप्ती च्या विरुद्ध दिशेने पाहू लागला. दीप्ती मात्र त्याच्या कडे बघत होती. आज पर्यन्त टी ज्याला एक बडे बापका बिगडा हुअा बेटा समजत होती त्याच्यातला सहृदय माणूस तिला आज पहिल्यांदा दिसला होता. आणि हा त्याचा ‘स्टेज्ड परफॉर्मेंस’ नाहीये हे ही तिला खोलवर जाणवलं.
काहीच नं बोलता आपांपलं सामान घेऊन ते एयरपोर्ट बाहेर आले. रात्रीचा १ वाजला होता. एरवी दीप्ती कुणाच्या बापाला न घाबरता टॅक्सी पकडून घरी गेली असती. पण आज ..
“ मला घरी सोडशील प्लीज ? “ असं तिने विचारल्यावर यश च्या चेहऱ्यावर उमटलेलं आश्चर्य लपलं नाही
तो काही बोलला नाही पण ड्रायवेर ने समोर आणलेल्या गाडी चं मागचं दार त्याने उघडून ठेवले आणि तो ड्रायवर जवळच्या सीट वर जाऊन बसला.
“ हिंदू कॉलॉनीला घ्या आधी..” त्याने ड्रायवर ला सांगितले आणि गाडी सुरू झाली. गाडीत रेडियो वर गाणं लागलं होतं “ सो गया ये जहा.. सो गया ************************************************************************************************************************************

“ आय कांट स्टँड हर के एल “ पिचर मधली बीयर अर्धी संपली तशी यश ची भीड चेपली
“ दॅट’स् नॉट माय प्रॉब्लेम. तिच्या कामात मला कधीही काहीही फॉल्ट दिसलेला नाहीये. शी इज अॅन अॅसेट टु अवर कंपनी “ व्हिस्कि चे २ मोठे पेग रिचवून सुद्धा के एल मात्र त्यांचा मुद्दा सोडत नव्हते
ओवर अ ड्रिंक त्यांच्या गप्पा सुरू असताना हा विषय निघालाच
“ मला तिच्या कामा बद्दल नाही तिच्या अॅटीटयूड शी प्रॉब्लेम आहे पण. मी कंपनी मध्ये काम करावं असं वाटत असेल तर तुम्हाला तिला फायर करावं लागेल”
“ दीप्ती दीक्षित ला फायर करू म्हणतोस? ती किती जबाबदार आहे माहीत तरी आहे का तुला? तुझ्याच वयाची असेल पण एक अॅक्सिडेंट मध्ये तिची बहीण आणि जिजा वारला आणि तेव्हा पासून ती एकटी आई, पॅरलाईजड् वडील आणि बहिणीच्या लहान मुलाला सांभाळते. ३ वर्षात कधी ही तिच्या चेहऱ्या वर मी तक्रार पहिली नाहीये आणि तिच्या कामात कसलीही चूक. नोकरी करता करता जमनलाल बजाज मधून एक्झिक्युटिव एमबीए ला टॉप करणं सोपं वाटलं? शी इज ब्रिलियंट अँड डिसेरविंग”
ही सगळं ऐकून यश क्षणभर गांगरला. दीप्ती बद्दल उगीचच ‘करीयर साठी नवऱ्याला सोडलेली सिंगल पेरेंट’ असा ग्रह त्याने करून घेतला होता. तिच्या बद्दलचं ही सत्य त्याला कुठेतरी आत जबरदस्त धक्का देऊन गेलं
“ तिच्या पर्सनल लाईफ शी तुमचा आणि माझा काय संबंध के एल ?
“ खरंच काही संबंध वाटत नाही तुला? “
“ आय डोन्ट नो व्हॉट यू आर आसकिनग मी फॉर ..”
“ ऑल आय आम अा स्किंग इज टु कॉ-एक्सइस्ट अँड कॉ-ऑपरेट विथ हर “
“ ...वी ओ धिस टु अवर पास्ट .. अँड वुई मस्ट पे इट फॉरवर्ड “ के एल कुठेतरी खोलात बघत म्हणाले
ह्या प्रसंगानंतर दुसऱ्याच आठवड्यात दीप्ती चं लिफ्ट मध्ये पडलेलं वॉलेट यश ला मिळालं ..
************************************************************************************************************************************
दीप्ती चा राजीनामा यश ला अपेक्षितच होता. एखादं कोडं सुटावं अशी ती त्याला समजायला लागली होती. त्याने काय गमावलं होतं ही आत्ता पर्यन्त त्याला कळलं सुद्धा नव्हतं. होसटेल्स मध्ये राहताना इतर मुलांची चिडवंचिडवी तेवढी आठवे. कॉलेज मध्ये असताना झालेल्या पहिल्या प्रेमभंगाचं सांत्वन करायला कुणीही त्याच्या जवळ नव्हतं. नंतर दूर होतील ह्या भीतीने त्याने कधी कुठल्या मित्राला जवळ केलंच नाही. आणि त्याच भीतीने कधी आजोबांना ही जीव लावला नाही. त्याचं आत्तापर्यन्त सगळंच आयुष ही निव्वळ दिखाव्या च्या वस्तू अन अर्थहीन नात्यांची ओझी उचलण्यात गेलं होतं.
दीक्षितांच्या घरातली ती माये ची ऊब, सुषमा ताईंच्या हातच्या जेवणाची चव, आदी च्या लाघवी मिठी चा स्पर्श, त्याची बोबडी बडबड , भिंतीवरच्या कोलाज मध्ये जपलेला प्रीती आणि भरत चा आदी च्या जन्मानंतरचा हॉस्पिटल मधला फोटो, दीप्ती च्या कडवटपणात दडलेली तिची घुसमट आणि तिच्या कर्तबगार व्यक्तिमत्तवामागे असलेलं तिचं आभाळाएवढं मन आणि ह्या सर्वांकडे तटस्थ पणे बघणारी सुरेश दीक्षितांची कोरडी, वाट पहाणारी नजर... सगळं सगळं त्याला आपलसं वाटायला लागलं.
कितीतरी वेळ तो भिंतीवर टांगलेल्या त्याच्या आई बाबांच्या फोटो कडे पाहत बसला आणि स्वतःशी काही निर्धार करून त्याने दोन फोन लावले. पहिला के एल ना आणि दूसरा त्याच्या सिमरन असं फिल्मी नाव धारण केलेल्या सध्या च्या गर्लफ्रेंड ला.
******************************************************************************** ************************************************************************************************************************************

“ आय डोन्ट वॉन्ट यू हियर यश .. प्लीज इथून जा ..” बाहेरच्या जाळीदार दरवाज्यातूनच दीप्ती कळकळीने यश ला म्हणाली
“ मला तुमच्या संगळ्यांशी बोलायचंय दीप्ती .. आय आम अनेबल टु ब्रीद ईवन राइट नाऊ ..प्लीज एकदा .. एकदा मला आत येऊ दे ”
अनिछ्छे ने दीप्ती ने दार उघडलं. आदी आत झोपला होता आणि सुषमा ताई टेबल वर भाजी निवडत बसलेल्या त्याला पाहून उठल्या. सुरेश दीक्षितांची व्हीलचेअर त्यांच्या जवळच होती पण आज त्यांची नजर मात्र यश वर खिळलेली होती.
यश त्यांच्या व्हीलचेअर समोर जाऊन गुढ्ग्यांवर बसला. सुरेश दीक्षितांची नजर तरी ही यश वरच होती. हळुवारपाणे त्याने त्यांचा हात हातात घेतला. सुषमाताई आणि आणि दीप्ती ला काहीच उमगत नव्हतं.
“ टुडे आय हॅव कम टु सीक यॉर पर्मिशन टु आस्क यॉर डॉटर’स् हँड इन मॅरेज अँड ऑल्सो टु अडॉप्ट यॉर ग्रँड सन अॅज माय ओन... मे आय प्लीज हॅव धिस ऑनर सर? आय प्रॉमिस आय वोन’ट लेट यू डाऊन. इट्स वन मॅन्स् वर्ड टु अनादर “
“ गेट आऊट ..” दीप्ती गरजली
“ मी तुझ्याशी बोलत नाहीये. मला तुझ्या बाबांकडून नकार हवाय तरंच मी इथून जाईन” सुरेश दीक्षितांचा हात हातात तसाच ठेवून यश कणखरपणे म्हणाला आणि त्याच्या दिशेने निघालेल्या दीप्तीला सुषमाताईंनी हाताने थांबवलं.
“ तुम्ही मला सिग्नल द्या बाबा. तुम्हाला कळलंय ना मी किती प्रेम करतो तुम्हा संगळ्यांवर ? आय वॉन्ट टु बी अ पार्ट ऑफ यॉर फॅमिली जस्ट आस यू आर ऑलरेडी अ पार्ट ऑफ माय लाईफ. आय वॉन्ट टु टेक केअर ऑफ यू ऑल. बाय डूइंग धिस वी विल फॉर्मलाईज अवर रिलेशनशिप. मी जिवात जीव असेपर्यंत तुम्हा कोणाला काही कमी पडू देणार नाही. वुई ऑल डिसर्व धिस. वुई ऑल डिसर्व टु बी हॅप्पी अगेन. अँड वी कॅन ऑल टु दॅट टुगेदर .. प्लीज बाबा .. मला ही संधी द्या..”
आणि एक अशक्य गोष्ट घडली. यश चं जिवाच्या आकांताने घातलेलं सांकडं बाबानपर्यंत पोचलं आणि आणि थरथरत्या हाताने त्यांनी यश चा हात दाबला. तब्बल साडेचार वर्षांपासून कोरड्या पडलेल्या त्यांच्या नजरेत आज पाणी तरळले!
थक्क होऊन दीप्ती आणि सुषमाताई बघतच राहिल्या आणि इतक्यातच
“ बी एम दबलूsss ..” म्हणत नुकताच जागा झालेला आदी यश ला येऊन बिलगला
*******************************************************************************

प्रीती च्या लग्नाच्या आधीची रात्र. एरवी अत्यंत फाजीलपणा करत फिरणारी दीप्ती आज मात्र शांत होती. दोघी त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. दिवसभराच्या कार्यक्रमांनी थकून प्रीती चा डोळा लागणार इतक्यात दीप्ती तिच्या पलंगवरून प्रीती च्या पलंगावर तिच्या पांघरूणात जाऊन घुसली.
“ आता तरी सेंटी झाली आहेस को अजूनही टाइम पासच करणार आहेस ? “ दीप्ती च्या डोक्यावर डोके टेकवत प्रीती म्हणाली
“ नाही यार आता फायनली सेंटी झाले असं वाटतंय. तू खरंच उद्या चाललीस प्रीतेश?”
“ कोई शक या सवाल ? “
“ मग माझा यूनायटेड कलर ऑफ Benetton चा शर्ट मला परत दे “
“ यूजलेस ..” प्रीती कटकटली
“ आणि तू माझं रक्त परत दे .. रीमेम्बर यू हॅड माय ब्लड फॉर लंच इन हिंदुजा ?
“ यू विल गेट दॅट इन monthly installments “ असं म्हणत स्वतःच्याच वाह्यात जोकवर जाम खूश होऊन हसत सुटली..
“ ईऊऊऊ .. यककक् .. यू आर डिसगसटिंग गेट ऑफ मी “ म्हणत प्रीती ने तिला पलंगावरून खाली ढकलले आणि दोघी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत राहिल्या.
शांत झाल्यावर दीप्ती ने पुन्हा अॅक्सिडेंट करू नये म्हणून असावं बहुतेक पण अचानक प्रीती म्हणून गेली ..
“ तेरेपास मेरा खून छोडके जा रही हूं. उसका खयाल रखोगी ना? तू देणं लागतेस मला.. “
..

आज ६ वर्षांनी तेच देणं द्यायला दीप्ती सज्ज झाली होती ..
|| समाप्त ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी तुमच्या उत्तेजनामुळेच ही कथा लिहू शकले.
मी होऊ कशी उतराई?
हा शेवटचा भाग तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानून ही ६ भागांची कहाणी ५ भागात पूर्ण करते!

अज्ञानी +१
जरी शेवटी काय होईल याचा अंदाज आला असला तरी तुमच्या लेखनकौशल्यामुळे कथा उत्कंठावर्धक झाली. आणि फार ताणली नाहीत तेही बरं केलंत. सगळी व्यक्तिमत्त्वं छान उभी केलीत.

छान. शेवट लवकर झाला असं वाटलं मात्र. अजून २-३ भाग चालले असते. Happy लिहीत रहा! अजून वाचायला आवडेल तुमच्या हातचं.>>>>>> अगदि मनातल

सगळ्यांना पुनःपुन्हा धन्यवाद ! मी लिहू शकते का इथपासून सुद्धा शंका होती. आता प्रयत्न करण्याची उमेद नक्कीच मिळाली आहे... पाहू काही जमतय का ते -:)

ता. क .(Open)
कथा फार च predictable झाली अशा feedback ची नोंद केली आहे

ता. क. (Silent)
मायबोलीकर फारच हुशार आहेत.. फक्त निव्वळ फोडणीच्या साहित्यावरून कुठली डाळ बनणार ते बरोबर ओळखतात

मस्तच.... आवडली
पण खूप लवकर संपली असं वाटलं
लिहत रहा

@अज्ञानी : पॉइंट टेकन ! मायबोलीकरांसामोर नाद करायचा नाय !!!

खूप खूप बरं वाटतंय तुमचे प्रतिसाद वाचून. घरात अडकल्यामुळे हाती घेतलेलं एक दुष्काळी काम म्हणजे पुष्कळ वर्ष डोक्यात घोळणारी ही कथा होती. दीप्ती यश च्या कहाणी चा पुढला टप्पा म्हणजे त्यांचा होऊ घातलेला संसार! जो आवेगाच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाईतका सरळसोट नक्कीच नसतो. कशी उलगडेल ही नात्यांची गुंफण पुढच्या काळात ? मलाच उत्सुकता लागून राहिली आहे. तुम्हाला जाणून घेण्यात इंट्रेस्ट असेल का?

बघायचा का देणं -सीझन २ ?
कळवा म्हणजे तसा वेळ काढून लिहायला बरं !
शेवटी वाचणारे दर्दी वाचक मिळाले तरंच लिहायला मजा येते नाही का?
नाहीतर माझ्या लॅपटॉप बरोबरच माझ्या कथा ही केव्हातरी फॉरमॅट च होणार..

आवडली कथा. फारसा फापटपसारा नाही लावला ते बरं झालं. थोडक्यात गोडी.
ताजी भाषा आणि चटपटीत प्रसंगांची पेरणी यामुळे अधिक आवडली.
यापुढची कथा लिहायला घ्या लवकर.

छान झाली आहे कथा ‌, आणि विशेष म्हणजे पटापट सगळे भाग टाकले आहेत.
इथे काही लेखक मंडळी २-३ भाग टाकले की, डायरेक्ट पुढच्या वर्षीच तीसरा भाग टाकतात. Lol Lol Lol

लवकर येऊ दे सिझन २ Happy
लेखनासाठी (wfh सांभाळत टायपण्यासाठी) शुभेच्छा !