घाव

Submitted by Swamini Chougule on 22 March, 2020 - 00:37

किती शब्दांचे हृदयावर घाव झाले आहे
माझ्याच लोकांनी मज छळले आहे

कोणी नाही जगात तुझे वेळ फक्त आपली आहे
हे माझ्या अनुभवावरून मज कळले आहे

प्रत्येकाने चेहऱ्यावर आज मुखवटे चढवले आहे
म्हणूनच मी माझ्या भावनांना
उराशी कवटाळले आहे

मी स्वतःच आता माझा मार्ग चालत आहे
कारण मी माझ्या स्वप्नांना ही आता जाळले आहे

दुनियेत या आज मला एकाकी वाटते आहे
कारण माझ्याच माणसांनी माझ्या दुःखाला पाळले आहे

आता साथीची कोणाच्या अपेक्षा मी सोडली आहे
कारण मी आता स्वतःच स्वतःला सांभाळले आहे.

©स्वामिनी चौगुले

(गजल लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला. जाणकारांनी जमली का गजल ते नक्की सांग)

Group content visibility: 
Use group defaults

ही गजल नाही.
संकल्पना छान आहेत. अधिक माहिती साठी बेफिकीर यांचा धागा आहे गजल तंत्रावर तो वाचावा.

(अर्थात स्वयंघोषित गजल असेल तर मात्र काही हरकत नाही)

@अजिंक्य पाटील
धन्यवाद,हो पाच शेर हवेत म्हणजे गाजलेत पाच शेर असतात तर जास्त शेर आहेत म्हणून ती गजल नाही होऊ शकत. छोटा प्रयत्न केला हा प्रकार जमतो का पाहायला. आणि गजल स्वयंघोषित कशी असते ते काय मला ही माहीत नाही
Wink

शेर कितीही असू द्यात हो, पण त्यात मात्रा, रदिफ काफिया वगैरे गोष्टी असतात. या किमान 3 गोष्टी सांभाळल्या तरच त्याला गझल म्हणता येते.

स्वयंघोषित: जश्या तुम्ही स्वयंघोषित लेखिका आहात, तशीच ही स्वयंघोषित गझल असू शकते तुमच्या मते, म्हणून तसे लिहिले हो!

दिवसाच्या कोणत्याही वेळी,
उंटछाप बिडी पिताना,
न बोलावता अचानक येणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
काहीतरी वजनदार उचलल्यावर,
कधी तरी अरबट चरबट खाल्ल्यावर,
हवेबरोबर (नकळत) वाहणारी,
कळ उठवणारी,
हागवण...
कुणाचं तरी भलं होताना पाहून,
धाग्यावरले चांगले प्रतीसाद पाहून,
नकळतपणे पोटात येणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
आयुष्यात एखाद्या दुष्काळात सापडल्यावर,
आपल्याला त्याने टमरेल दिले असते,
ह्या विचाराने कुठंतरीच जाणवणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
>> ही कविता आठवली.

@आम्ही अज्ञातवाशी
Happy
भारी की पण ही अशी अजिंक्य पाटील यांनी केलेली व त्याची सुज्ञ बुद्धिमत्ता दाखवलेली कविता येथे टाकण्याचा उद्देश काय समजला नाही!
ते ही मी लिहलेल्या इतक्या छान गजल खाली बर रावपाटील ही कविता तरी आहे ना का त्यावर ही तुमची हरकत आहे
Wink
ट्रोल तर करणारच ते
बरोबर आहे तुमचं आपण काही चांगलं लिहल की इथे मात्र जरा जास्तच जाळ उठतो नाही का?

@अजिंक्य पाटील
मी हे जे लिहिलंय ना ते माझ्या एका लेखक व गजलकार मैत्रीणीच्या मार्गदर्शना खाली त्यामुळे यात ते काफ़िये वगैरे तिने पाहिले आहेत
आणि तुम्ही जर इतकेच जाणकार आहात गजलचे तर होऊन जाऊदे एक गजल तुमची म्हणजे मला ही कळेल गजल कशी असते ती
Wink
आणि हो आता स्वघोषित लेखिका ही ट्याग लाईन ही काढावी लागणार मला कारण मी आता लोकमान्य लेखिका झाले आहे कारण मला दोन पारितोषिके मिळाली आहेत एक इरा वेबसाईट कडून आणि तूर्तात प्रतिलिपी कडून
Happy

@ अज्ञातवाशी
Nice one

ती कविता त्यांच्या साठी होती. आरसा दाखवला त्यांना.
Wink

@आम्ही अज्ञातवाशी
Happy
भारी की पण ही अशी अजिंक्य पाटील यांनी केलेली व त्याची सुज्ञ बुद्धिमत्ता दाखवलेली कविता येथे टाकण्याचा उद्देश काय समजला नाही!
ते ही मी लिहलेल्या इतक्या छान कविते खाली बर रावपाटील ही कविता तरी आहे ना का त्यावर ही तुमची हरकत आहे
Wink
ट्रोल तर करणारच ते
बरोबर आहे तुमचं आपण काही चांगलं लिहल की इथे मात्र जरा जास्तच जाळ उठतो नाही का?
Submitted by Swamini Chougule on 22 March, 2020 - 15:08
>>>> थोडं कंफ्यूझन होतंय ...
एकदा तुम्ही बोलताय की (गजल लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला. जाणकारांनी जमली का गजल ते नक्की सांग) आणि रावपाटिल म्हणाले की ही गझल नाही तर त्यालासुद्धा आक्षेप घेताय ? नक्की कविता की गझल तुमच्या साइडने हिरवा कंदील येऊ दया.
__________________________
बाकी काहीही का असेना, काही ओळी खुप सुरेख लिहिल्यात. छान !!

@अज्ञानी
धन्यवाद,चूक दुरुस्त केली आहे मी चुकुन कविते खाली अस लिहले होते. मी ती गजल म्हणून लिहिली.आता तुम्हीच ठरवा ती गजल की कविता?आणि कन्फ्युजन तर रावपाटील यांनी निर्माण केले आहे. आणि गजल म्हणले काय आणि कविता म्हणले काय मला तसा फरक पडत नाही हो! आक्षेप घेणारे काय काही ही आक्षेप घेऊ शकतात ना! त्याला काही उपाय नाही. पण गजल शिकण्याचा मी प्रयत्न मात्र करत आहे. पाहू जमतंय का!
Happy

आमचा पिंड वाचकाचा.. त्याच भूमिकेतून पूर्वी एकदा तुम्हाला प्रतिसाद देऊन मनस्ताप करून घेतला होता, चिडून विडंबनदेखील केले होते. आताशा तुमच्यातली maturity थोडी वाढली असावी असा गैरसमज होऊन आज प्रतिसाद दिला. असो, चुकतो माणूस कधीकधी.

गझल लिहिण्याचा फुटकळ प्रयत्न मीदेखील केलेला आहे. इच्छा असल्यास आमच्या पाउलखुणांमध्ये जाऊन वाचून घ्या..

@ अजिंक्य पाटील
तोच फुटकळ प्रयत्न तरी दाखवा हो! मला तर वाटलं तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने ही गझल नाही असं म्हणालात म्हणजे तुम्ही गझल लिहिण्यात तरबेज असाल असा माझा (गैर)समाज झाला होता. मी तर बुवा आपल्याला ज्यातल काही कळत नाही त्यात फुकटचा सल्ला द्यायला जातच नाही काय आहे .फुकटची फजिती नको हो!
Wink

maturity ची भाषा तुम्ही करताय माझ्या कवितेचे इतके बाळबोध विडंबन करून! हे तर लहान मुलाने बोबडे बोलून मी मोठा झालो असे म्हणणे असे झाले
Happy

@मन्या
धन्यवाद
राव पाटील भारी लिहिलंय ओ तुम्ही मला गजल वगैरे अजून नीटस नाही कळत पण शब्द भारी आहेत तुमचे
मग टाकायची ना त्यातलीच एखादी मी पण कौतुकच केलं असत हो! तितक माझं मन मोठं आहे की! दुसऱ्याच्या चुका सहसा मी काढत नाही हो
Wink