धर्माला दोष देऊ नकोस मित्रा

Submitted by atmaramvitekar@... on 21 March, 2020 - 08:31

धर्माला दोष देऊ नकोस मित्रा
नसेल मिळाली मनासारखी बायको
तर बनू नकोस तू सायको
नसेल पैसा पुरवाया चोचले
नशीब तूझे एकदम फुटले
त्यासाठी नको धरुस वेठीला
धर्म आणि त्या देवाला
धर्म सांगे कराया सत्कर्म
ठावे ना तूला धर्माचं मर्म
वंचना होता इंद्रियसुखाची
झाली तूझी मोठी गोची
विसरलास कर्तव्य अन् त्याग
मनात तूझ्या पेटली आग
सरला विवेक बुद्धी फिरली
धर्म देवाची महती न कळली
धावतोस मृगजळामागे
अमृताला टाकून मागे
जायचं तिकडे खुशाल जा
हवी तूजला ती कर मजा
पण धर्माला दोष देऊ नकोस
मित्रा देवाला दोष देऊ नकोस
दैवाला दोष देऊ नकोस मित्रा

Group content visibility: 
Use group defaults

छान

विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्या पासून कधीतरी जाणार; निदान आपल्याला तरी एक दिवस त्यांच्यापासून दूर जावे लागणार. दूसरी गोष्ट म्हणजे,विषयाचे सुख इंद्रयाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते, आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते.
...... श्रीमहाराज