First Impression

Submitted by Rohan_Gawande on 14 March, 2020 - 23:03

मोहित नी कॅफे कॉफी डे चा बोर्ड बघितला आणि हलकीच bike उजव्या बाजूला, कॅफे च्या पार्किंग मध्ये घेतली. रविवार ची सकाळ असल्या मुळे पार्किंग भेटणं थोडं कठीण होत. तरी एका कोपऱ्यात दोन गाड्यांची जागा त्याला दिसली, bike लावून तो कॅफे कडे चालू लागला. bike थोडी तिरपी लागल्याच त्याच्या लक्षात आलं पण तरी दुर्लक्ष करून तो निघून गेला. कॅफे बऱ्यापैकी फुललेला होता, सुंदर जोडपी आपापल्या गप्पांमध्ये मश्गुल होती. मोहित नी एक कोपर्यातली जागा बघितली आणि तिथे जाऊन स्थिरावला. त्याने फोन काढून परत एकदा तिचा फोटो बघितला. आजच्या काळात हा असा जुना फोटोशॉप केलेला फोटो कोण पाठवत, फोटो क्लिअर पण नाही. जाऊ दे माझाच कुठला नॉर्मल फोटो काढला आहे आई बाबांनी. येईलच आता ती थोड्या वेळात बहुदा. तितक्यात मोहितचा मोबाइल वाजतो,
"बोला बाबा"
"अरे उद्या अजून एक मुलगी बघून घे, श्रेया"
"अहो बाबा उद्या दुसरी मुलगी कशी बघून घेऊ आज इथे प्रिया ला भेटायला आलो आहे ना मी.. नाही जो पर्यंत माझं प्रिया विषयी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही अजून biodata पाठवू नका, आणि २००६ आहे बाबा हे, एखादा क्लिअर फोटो तरी पाठवत जाहो, किंवा ई-मेल करत जा. ठेवतो मी... माझ्या bike ला कोणी तरी बाहेर काढत आहे.. ठेवतो मी फोन "

मोहित उठून बाहेर आला आणि त्याच्या bike जवळ गेला. एक मुलगी त्याची bike काढून तिची scooty लावत होती.

"excuse me! तुम्ही काय करताय" मोहित नी जरा चिडलेल्या स्वरात विचारल.
"सॉरी मी लावते ही bike परत, बघाना कोण्यातरी मूर्खानी ही bike तिरपी लावली होती, एक तर पार्किंग नाही इथे" मुलीनी मागे वळून न पाहता उत्तर दिलं.
"I am sorry, माझीच bike आहे, मी लावतो परत, द्या मला" मोहित नी bike हातात घेतली आणि मुलीला बघून चमकला
"तू प्रिया का !!"
"ओह्ह तू मोहित का, सॉरी मी बघितल नाही आणि मूर्ख म्हणाली तुला, तुझा फोटो पण नव्हता, मी कॉल करणारच होती आता तुला.." प्रिया अगदी निरागसपणे खूप काही बोलून गेली
"इट्स ओके, चूक माझीच होती, जायच का आत आपण? " मोहित प्रियाला कॅफे च्या दिशेने घेऊन गेला. प्रिया साठी हलकच दार उघडून तो आत आला.
दिसायला तर छान आहे पण first impression ची वाट लागली, फोटो मध्ये कशी होती आठवत पण नाही. मनात म्हणत असेल साधी गाडी लावता येत नाही आणि हा काय.."
"तुझ ऑफिस जवळ आहे ना इथून" प्रियाच्या गोड आवाजाने मोहित ची तंद्री तुटली
"हो, तुला कसा माहित " मोहितनी थोड्या आश्चर्याने विचारल
"तुझा biodata बघितला मी ... तू बघितला ना माझा" प्रिया च्या चेहऱ्यावरचं प्रश्नार्थक चिन्ह बघून, मोहित जरा सारवासारव करत म्हणाला,
"हो हो , बघितला ना, तू Infy ला आहे ना बघितल मी"
"मी HCL मध्ये आहे रे" आता मात्र प्रिया खरंच गोंधळून गेली होती
"तू मोहितच ना"
"हो ग मी मोहितच, पण बाबा इतके biodata पाठवतात ना, की गोंधळ उडतो"
"तू कॉफी कुठली घेणार" मोहित नी विषय बदलून तिच्या हातात मेनू कार्ड दिल. मेनू कार्ड मध्ये डोकावणारी, ती गोंधळलेली प्रिया कुठेतरी मोहित च्या मनाला एक, आपलासा स्पर्श करून गेली होती, कदाचित त्याच्याच सारखी वेन्धळी आहे म्हणून किंवा, मनात आलं ते बोलून गेली म्हणून.
कॉफी machine च्या त्या वाफ सोडणाऱ्या आवाजाने, आणि त्या कॉफी च्या उबदार सुगंधाने वातावरण अजूनच मोहक होऊन गेल होत. इतक्यात रेडिओवर गाणं बदललं आणि किशोर कुमार मदतीला धावून आले, मंद आवाजात गाणं सुरु झालं "दिलबर मेरे कब तक मुझे ऐसेही ताडापाओगे, मै आग दिल मी लागा दूंगा वो की पल मे पिघल जाओगे" मोहितच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटल
"मी फ्रॅप्पे घेईल " प्रियाच्या आवाजाने मोहित परत शुद्धीत आला
"ठीक आहे मी एक हॉट कॉफी सांगतो"

मोहित ची ऑर्डर ऐकून प्रिया विचार करू लागली, ह्याला काही वेळच लागत नाही ऑर्डर ठरवायला, सगळं काय ठरवून आला आहे का? काय बोलणार मी, एक तर पहिल्यांदाच हे असं मुलगा वगैरे बघायला आले मी. आणि त्यात हे दिलबर मेरे वगैरे लावल ह्यांनी, अजूनच रोमँटिक. तसा दिसायला चांगला आहे, आणि स्वभाव पण छान वाटतो आहे, पण गाडी नाही लावता येत अजून, जाऊ दे सॉरी म्हणाला ना, दार पण उघडल माझ्या साठी कॅफेचं, आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी असं दार उघडल माझ्यासाठी.. काय बोलू, मला तर काही सुचतच नाही, पण मग हा का बोलत नाही?

"कसं सुरु आहे ऑफिस ?" मोहित नी संभाषण सुरु केल.
"नको!.. i mean.. खर सांगू, ऑफिसचा सोडून दुसऱ्या विषयावर बोलूया का" प्रिया म्हणाली
"ठीक आहे " मोहित सोफ्यावरून थोडा पुढे येऊन म्हणाला
"कुठल्या विषयावर बोलायला आवडत तुला ? movies?"
"नको! मी नाही बघत जास्त movies" प्रियानी परत त्याच निरागस चेहऱ्यांनी उत्तर दिल
"मग पॉलिटिक्स"
"नको! बिलकुल नको! ते पॉलिटिक्स, मला तर अजिबात आवडत नाही ते पॉलिटिक्स "
"okay.. मग literature, बुक्स वाचते का तू "
"नको! मी नाही वाचत जास्तं पुस्तकं, engineering ला वाचली बस झाला नाही का.. हाहाहा" करत प्रिया हसून गेली.
"मला आवडत पुस्तक वाचायला, खूप वाचली आहेत मी, आणि सिनेमा मी खूप बघतो, किंवा असा म्हण, सिनेमा मी जगतो, फिरायला पण आवडता मला खूप हिमालय वगैरे नाही पण एकटाच निघतो चालत आणि वीकेण्ड ला पूर्ण पुणं शहर पालथ घालतो, मला स्केचिंग पण आवडत, फिरता फिरता वाटलं तिथे थांबतो आणि स्केचेस काढतो, गार्डन बस स्टॉप कुठेही, खूप मजा येते"
"खरंच!! मला दाखवशील तुझे स्केचेस" प्रिया ताडकन म्हणाली
"नक्की!!” मोहित नी मान डोलवली ,
“अस गोड चेहरा करून “नको” किंवा “खरंच” म्हणण्याशिवाय तू काय करतेस वीकएंड ला" मोहित नी हिम्मत करून प्रियाशी जरा flirt करत विचारलं.
प्रिया हलकीच लाजत म्हणाली,
“मी असं काही खूप करत नाही पण लोक्कांनी चुकीच्या लावलेल्या bikes नक्की ठीक करते ... हाहाहा..” म्हणत प्रिया मनसोक्त हसू लागली..

बास आणि त्या एका हास्याबरोबर मोहित प्रेमात पडला होता. हसून हसून पाणी आलेल्या त्या कोरीव डोळ्यांमध्ये मोहित एकसारखा बघू लागला.
"हॅलो " प्रिया नी मोहितच्या डोळ्यांपुढे हात फिरवून त्याला परत शुद्धीवर आणल.
"मग कसा होणार आपल लग्न झालं तर, ना मी पुस्तक वाचते ना मी, आर्टिस्ट आहे , ना सिनेमा बघते, तुला बोर नाही होणार" प्रिया हातातली बांगडी फिरवत म्हणाली
"मला आवडेल तुला घेऊन हे सगळं करायला"

"excuse me प्रिया!"
अचानक समोर आलेल्या एका भलत्याच मुलामुळे प्रिया गोंधळली,
"Yes मी प्रिया"
" अग मी मोहित काकडे, तुझी खूप वेळ झाला वाट बघतोय, शेवटी कॅफे मध्ये नजर फिरवली तेव्हा वाटलं तूच आहे प्रिया"
" पण मग हा मोहित"
"excuse me, मोहित जगताप!" एका सलवार कमीज मधील मुलीने मोहित कडे बघत विचारल
"Yes मी मोहित जगताप"
"मी प्रिया देशमुख "
"आणि मी प्रिया इंगळे" असं म्हणत प्रिया नी मोहितकडे डोळे रोखून पाहिलं, खूप वेदना होत्या त्या डोळ्यांमध्ये, प्रियाचे डोळे इतके बोलके होते की तिच्या मनाची साद स्पष्टपणे मोहित ला ऐकू येत होती. नावामुळे झालेला घोळ मोहित आणि प्रियाच्या लक्षात आला होता.

"let's go म्हणत प्रिया जाऊ लागली" इतक्यात मोहित म्हणाला
"प्रिया एक नवीन सिनेमा आला आहे, उद्या evening च्या शो ला, ऑफिस नंतर, येशील.. ?"
प्रिया नी हलकच हसत होकार दिला आणि मोहितच्या हातात कॅफे चा tissue देऊन निघून गेली.
मोहित नी tissue पेपर उघडला, त्यात त्याच सिनेमाच नाव आणि प्रिया चा नंबर होता
सिनेमाच नाव होतं..
"विवाह"

Rohan Gawande

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती मस्त आहे कथा Happy
खरं जीवनातही असेच काही घडत असेल तर किती सॉलिड अनुभव असेल तो !

मस्त हा कथा अगदी... आणि ते ठरवुन प्रेम करण्या पेक्षा असे काही अनपेक्षित घडले तरच मज्जा आहे खरी