मक्केचा नेक बंदा

Submitted by Theurbannomad on 13 March, 2020 - 02:49

" मी या केकला हात लावू शकणार नाही. मला तू केक देतोयस यासाठी तुझे आभार मानतो, पण मी तो खाऊ शकणार नाही." फादी मला नम्रपणे पण ठाम शब्दात नकार देत होता. आजूबाजूचे माझे मित्र मला ' कशाला त्याच्या फंदात पाडतोयस.....सोड ना......' सारखे सल्ले देत मला बाजूला ओढत होते. ऑफिसमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून मी सगळ्यांना वाटत होतो. बाकी कोणीही काहीही कुरबूर केली नाही, पण हा मात्र अडून बसला. शेवटी जास्त मस्का मारण्यापेक्षा सरळ निघावं असा विचार करून मी इतरांकडे गेलो. त्याने मला ' माफ कर....गैरसमज नको करून घेऊस ' असं पुन्हा एकदा सांगितलं. मी नाखुशीनेच त्याला ' ठीक आहे' छापाचं उत्तर दिलं आणि ' गेला उडत' असा मनोमन म्हणत बाकीच्यांबरोबर दिवस साजरा केला.

संध्याकाळी खाली उतरल्यावर गाडीत बसताना मागून मला याचा आवाज ऐकू आला " थांब....मला बोलायचंय "

'फादी? केक संपला केव्हाच....'

' नाही, त्यासाठी नाही. तुला गैरसमज नको म्हणून सांगतोय, माझ्या धर्मात वाढदिवस आणि केक या गोष्टींना महत्व नाही, म्हणून मी माझ्या घरी सुद्धा हे सगळं करत नाही. माझी ४ मुलं कधीही वाढदिवस साजरा करत नाहीत, केक कापत नाहीत आणि मेणबत्त्या फुंकून विझवत नाहीत. हे सगळे पाश्चात्य चाळे माझ्या धर्माला मान्य नाहीत.'

' अरे, ऑफिस मधले कितीतरी लोक जे अरब आहेत, तुझ्याच धर्माचे आहेत आणि रोज पाच वेळा न चुकता नमाज पढनारे आहेत, ते सुद्धा इतके ताठर नाही वागत रे....पण मी सगळ्या धर्मांचा आणि त्या धर्मांमध्ये दिल्या गेलेल्या शिकवणुकीचा मनापासून सन्मान करतो। तुला तुझ्या धर्माचं पालन तुला योग्य वाटेल तसं करता आलाच पाहिजे.....मी तुला कधीच जबरदस्ती नाही करणार। मला खरंच वाईट नाही वाटलं. '

माझ्या या उत्तराने तो थोडा सुखावला। हसून ' thank you ' म्हणत आपल्या वाटेल निघाला. ऑफिस मध्ये हा घुम्या, एकलकोंडा, कामाव्यतिरिक्त एकही अक्षर न बोलणारा आणि स्वतःचं खाजगी आयुष्य कायम जगापासून लपवून ठेवणारा म्हणून का प्रसिद्ध आहे हे मला आज कळलेलं होतं. ऑफिस मधले काही लोक तर त्याला खाजगीत काहीही बोलायचे. एकूणच काय, सगळ्यांचा नावडता आणि एकंदरीत माणूसघाणा असा हा प्राणी आमच्या ऑफिसमध्ये काहीसा विजोड वाटायचा.

एका कामानिमित्त फादी माझ्या 'टीम' मध्ये सामील झाला. बाकी कसाही असला तरीही कामाला चोख असल्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करताना काहीही अडचण आली नाही. त्याचे कामाच्या बाबतीतले नियम पक्के होते। दिवसाच्या सुरुवातीला १० मिनिटं तो दिवसभराच्या कामाचा आराखडा आखून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात बाकीच्या लोकांना कामं नेमून द्यायचा. मग जेवणाच्या वेळेपर्यंत आपली कामं मन लावून करायचा। मध्ये मी त्याला कधीही कॉफी प्यायला, धूम्रपान करायला किंवा नुसत्याच टिवल्या बावल्या करायला उठलेलं पाहिलं नाही. उठायचा तो फक्त नमाजाची वेळ झाली की. तो त्याने कधीही चुकवला नाही। दुपारनंतर कामाचा आढावा , मीटिंग, क्लायंटला पाठवायचे इ-मेल, फोनेवरची संभाषणं या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि जायच्या आधी दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी टेबलवर ठेवून तो निघायचा. हातात जपमाळ सतत असायची. या माणसाला बोलता कसा करायचा, हे माझ्यापुढचं आव्हान होतं, कारण बाकीचे लोक ' हा कंटाळवाणा माणूस नको आपल्यात' अशा पद्धतीची तक्रारवजा विनंती नेहेमी करायचे.

एके दिवशी आम्ही दोघे क्लायंटकडे निघालेलो असताना एका विचित्र प्रसंगाला आम्हाला तोंड द्यावं लागलं. काहीशा वेगात जात असलेल्या एका गाडीने आमच्या गाडीला बाजूने धडक मारली. दुबईला अशा वेळी पोलीस बोलावून पंचनामा करणं बंधनकारक आहे. त्याप्रमाणे पोलीस आल्यावर त्याने नेहेमीप्रमाणे त्या दुसऱ्या गाडीच्या चालकाला आणि मला अपघातासंबंधी प्रश्न विचारले. त्या गाडीच्या चालकाने अरबी भाषेत चूक माझी आहे आणि मी गाडी धडकावली अशी खोटी थाप ठोकून दिली. मला अरबी भाषा येत नसल्यामुळे मला तो प्रकार कळलं नाही आणि अचानक आत्तापर्यंत शांत असलेला फादी आपणहून समोर आला. त्याने पोलिसाला सगळ्या प्रसंगाचा नीट वर्णन करून तो खोटारडेपणा उघडकीस आणला आणि त्या खोटारड्या मनुष्याला ' लाज बाळग, अल्लाह माफ करेल का तुला यासाठी?' अशा शब्दात त्याने दटावलं। सगळे सोपस्कर होऊन आम्ही पुन्हा आमच्या वाटेवर निघालो आणि मी फादीला मनापासून धन्यवाद दिले.

' अरे त्यात काय.....तो खोटं कसं काय बोलू शकतो? अल्लाहची पण त्याला भीती नाही वाटत?' फादी जरा बोलता झाला.

' सोड ना.....त्याची पापं तो बघून घेईल'

' ते तर झालंच....'

' पण तू खरंच खूप मदत केलीस....नाहीतर मलाच दंड भरावा लागलं असता'

' नाही.....नक्कीच नाही. आणि तू भरला असतास तर त्याच्या दुप्पट पैसे तुला अल्लाहने दिले असते आणि त्या खोटारड्याकडून दसपट पैसे अल्लाहने घेतले असते. तुझी चूक नसेल तर अल्लाह तुला काहीही त्रास होऊ देणारं नाही'

धर्माच्या बाबतीत काटेकोर असला तरी फादी खरा होता आणि इतरांच्या धर्माचा सन्मान करणारा होता हे या निमित्ताने मला समजला आणि मला मनापासून आनंद झाला. आता याला थोडा अजून बोलता करूया असा विचार करून मी मुद्दाम त्याला संभाषणात गुंतवायचं ठरवलं.

' मला थोडा सांग न तुझ्याबद्दल....अर्थात तुझ्या मनाविरुद्ध नाही......तुला वाटलं तर सांग.....'

' ठीक आहे....काय सांगू? मला माहित आहे कि मी फारसा कोणाला आवडत नाही...लोकांना मी कंटाळवाणा माणूस वाटतो पण काय करू? मी ज्या वातावरणात वाढलो, त्याचं परिणाम आहे हा....कदाचित माझं मूळ स्वभावच थोडा एकलकोंडा असेल....जे पण कारण असेल,, इतका नक्की कि मी काही कोणाला मित्र म्हणून जवळचा वाटायच्या लायकीचा नाहीये.'

' अरे असा का म्हणतोस? तो तुझा स्वभाव आहे.....मला तू मित्र म्हणून आवडतोस'

' खरं? ' ' नक्कीच.....तुझे चांगले गुण कितीतरी आहेत.....कामात तू चोख आहेस, विश्वासू आहेस, कोणाचा नवा पैसे तू कधी ठेवलेला मी बघितलेला नाहीये, ऑफिसमध्ये तू एकटा असा आहेस जो स्वतःची कॉफी स्वतः विकत घेतोस, बनवतोस आणि कप सुद्धा विसळून ठेवतोस.....किती लोक हे करतात? मला सुद्धा नाही सुचत हे सगळं......'

' कारण मला काहीही करताना मनात एकमेव विचार हा येतो, कि अल्लाह माझ्याजकडे बघतोय....मी हि कृती केली तर त्याला काय वाटेल.....म्हणून मग माझ्याकडून काहीही वाईट गोष्ट न घडण्याच्या दृष्टीने मी जे जे शल्य होईल ते ते स्वतः करतो. '

' तुझा देश, तुझं कुटुंब याबद्दल सांग न थोडंसं....'

' मी सौदी अरेबियाचा नागरिक.रियाधहून पदवी घेऊन पुढे जर्मनीला पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि काम करायला इथे आलो।माझ्या घरी माझ्या वडिलांनी तीन लग्न केली, त्यामुळे घरात आम्हा सक्ख्या आणि सावत्र भावंडांमध्ये सतत असूया , वाद, बखेडे होत होते.....मला ते सगळं नकोच आहे.....त्यामुळे एकच लग्न केलं मी आणि आता ४ मुलांचा बाप आहे मी. माझ्या बायकोला मी लग्नानंतर पदवीचा शिक्षण पूर्ण करायला लावलं. माझ्या दोन मुलींना सुद्धा माझ्या मुलांसारखंच शिकवणार आहे मी .'

काही बाबतीत अतिशय कट्टर आणि काही बाबतीत आधुनिक असं हे काहीतरी विचित्र रसायन होतं. जो माणूस केक घ्यायला आणि वाढदिवस साजरा करायला इतका नकार देतो, त्याचा मुलीकडे आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका पुढारलेला आहे हे माझ्यासाठी नवल होतं.

' आमच्या देशात अमेरिकेने पाय ठेवला आणि आमची सगळी रयाच गेली. राजे फैसल होते, तेव्हा त्यांनी या पाश्चात्य देशांना मस्त धडा शिकवला होता. अमेरिका पेट्रोलसाठी रडत आलेली आमच्या दाराशी....पण नंतर सगळं बदललं. तुला माहित आहे का, माझ्या वडिलांचा स्वतःचं विमान आहे. मला नोकरी करायची गरज नाहीये पण वडिलांचा पैसा उडवून जगलो तर अल्लाह काय म्हणेल.....म्हणून मी स्वतः मेहेनत करतो आणि माझ्या मेहेनतीचाच खातो.'

माझं कानांवर विश्वास बसेना. हा माणूस मनात आणलं तर आमच्या ऑफिसला विकत घेईल! इतकी श्रीमंती याच्याकडे आहे, पण तरीही हा स्वाभिमानाने जगतोय हे माझ्यासाठी धक्कादायक होतं.

हळूहळू पुढच्या काही दिवसात याच्याबरोबर जमेल तसं मी बोलत गेलो. काहीसा मनस्वी असलेला हा प्राणी कधी कधी एकदम चिडीचूप असायचा आणि कधी कधी अगदी हळू आवाजात पण बोलायचा. त्यातूनच याच्या आयुष्याचे काही विलक्षण पदर उकलले गेले आणि मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटायला लागला. कोट्याधीश असलेल्या या मनुष्याने पन्नास लाख रियालची भक्कम देणगी मक्केमध्ये एक सुंदर धर्मशाळा उभारण्यासाठी दिली होती. गरीब यात्रेकरूंना तो तिथे मोफत राहू आणि खाऊ-पिऊ द्यायचा. वेळप्रसंगी कैकांना त्याने या न त्या रूपाने अनेक गोष्टींसाठी सढळ हाताने मदत केली होती. मोबदल्यात एका पैची अपेक्षा न ठेवता त्याने अनेक मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती.

' अरे, पण कोणी तुला फसवून तुझ्याकडून पैसे घेतले तर तुला कसं कळणार?'

' माझं काम आहे मदत करणं. मी पैसे दिले, अल्लाहने मला नेमून दिलेलं काम मी मनापासून केलं. त्याने मला फसवलं तर जेव्हा कयामत होईल आणि तो आणि अल्लाह समोर येतील तेव्हा त्याला त्याच्या कर्मांची सजा मिळेल.' इतक्या स्पष्टपणे आणि स्वच्छपणे काम करणारा हा माणूस इतकं तितकं काम करून त्याचे जगभर ढोल बडवणाऱ्या अनेकांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होता.

धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या हिंसेला त्याचं मनापासून विरोध होता. ' सच्च मुसलमान तो, त्याच्या आजूबाजूच्या हजार घरांना तो असल्यामुळे सुरक्षित वाटेल......आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात आधी माझं जीव मी धोक्यात घालेन' हे त्याचं तत्व माझ्या मते धर्मांधळ्या लोकांसाठी - मग ते कोणत्याही धर्माचे का असोत - डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. आपल्या धार्मिक आचार-विचारांना जीवापाड जपणारा हा फादी इतरांच्या धार्मिक बाबतीत कधीही ढवळाढवळ करत नसे. त्याला इतरांच्या त्याच स्वातंत्र्याचा मनापासून आदर होता. रमझान महिन्यात तो अतिशय काटेकोरपणे रोझे पाळायचा, पण सूर्यास्तानंतर जेवण करताना कधीही एकटा आपल्या घरच्यांबरोबर जेवायचं नाही। त्या महिन्यात घराजवळच्या मशिदीत त्याच्या घरून कमीत कमी पन्नास माणसांना पुरेल इतकं जेवण रोज न चुकता जायचं.

दर वर्षी न चुकता तो मक्केच्या त्या आपल्या धर्मशाळेला भेट द्यायचा, सगळ्या गोष्टी नीट आहेत कि नाही याची खातरजमा आपल्या बाजूने करायचा आणि काही नव्या गोष्टींची भर घालून असलेल्या सुविधा अधिकाधिक चांगल्या होतील याची खबरदारी घ्यायचा. मनात राग असेल म्हणून कदाचित, पण जगभर फिरूनही कधी अमेरिकेला आणि इंग्लंडला गेला नाही. त्याच्या मते या दोन देशांनी अक्ख्या जगाची वाट लावली आणि म्हणून त्या देशांमध्ये जाणं त्याच्या मनाला कधीच पटलं नाही. आपल्या वडिलांच्या शस्त्रक्रियेनिमित्त भारतात गेला होता आणि तेव्हा त्याने काहीशा अशांत वातावरणातही काश्मीरच्या हजरतबलला जाणून प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र केसाचं दर्शन घेतलं होतं. पुन्हा एकदा भारतात जायचंय आणि अजमेर शरीफच्या दर्ग्याला भेट घ्यायचीय असा त्याने एकदा मला सांगितलं होतं.

एके दिवशी आमच्या ऑफिसने त्याची बदली शारजा ऑफिसमधून थेट बाहरेनला केल्याची बातमी आली. यूएई मधलं आपलं २० वर्षाचा वास्तव्य संपवून तो नव्या जागी निघाला.जाताना अर्थात सगळ्यांना भेटायचे सोपस्कर त्याने पार पडले आणि मला पाच मिनिटं खाली येऊन भेटायला सांगितलं. मी गेलो, तेव्हा त्याने आपल्या खिशातून एक छोटी काचेची बाटली काढून माझ्या हातात दिली. ' मक्केच्या झमझम विहिरीचा पाणी आहे. घरात ठेव, कोणत्याही वाईट शक्ती कधीच तुझा काही वाकड नाही करू शकणार' तो बोलला.

' एका अटीवर, यापुढे माझ्या वाढदिवसाचा केक घ्यायचा.' मी हसत हसत त्याला सांगितलं. एक क्षण विचार करून त्याने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, ' सगळ्यांसमोर नाही घेणार.....गपचूप घेईन....तुझ्याकडून घ्यायला हरकत नाही....' त्या क्षणी माझ्यासाठी मक्केचा तो नेक बंदा खर्या अर्थाने माझा मित्र झाला !

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे. आवडला लेख.

बाकी कुराण कसे आहे, अमेरिका-इंग्लंड कसे आहेत ही त्या व्यक्तीची मते आहेत, तेव्हा ती तितक्याच सिरीयसली घेतलेली बरी. (नाहीतर माझ्या मते तो ज्या जर्मनीत शिकला त्या जर्मनीने अमेरिका/इंग्लंड पेक्षा जास्त वाट जगाची लावली आहे. दोनदा)

लेख आवडला.

तुमचा प्रतिसादही आवडला. हे एक व्यक्ती चित्रण आहे आणि त्याच पद्धतीने ते घ्यावे.

बाकी धर्मावर चर्चा करायला पायलीचे पन्नास धागे पडलेले आहेत.

Theurbannomad यांचे बाकीचे लेखही वाचलेत आणि एन्जॉय केलेत. खरंच चांगलच लिहिलंय. या लेखात अगदी नावापासून धार्मिक बाबींचा अतिरेक झालेला आहे. त्यामुळे मी वरील प्रकारचे प्रतिसाद दिलेत. मक्केचा नेक बंदा आणि सर्वधर्मसमभाव या विरुद्धार्थी गोष्टी आहेत एवढंच मला सांगायचे आहे. बाकी चालू द्या...

मुस्लिम व्यक्ती स्वभावाने चांगल्या नसतात असे माझे अजिबात मत नाही. फक्त त्यांची संख्या वाढली आणि आसपास शरिया कायदा नसेल तर काय होते हे डोळे नीट उघडे ठेवून पहावे आणि अनुभव घ्यावा या मताचा मी आहे... कारण संख्या वाढली किंवा कट्टरता वाढली की अचानक "चांगल्या स्वभावाच्या" व्यक्ती कुठेतरी गायब होउन जातात...

कारण संख्या वाढली किंवा कट्टरता वाढली की अचानक "चांगल्या स्वभावाच्या" व्यक्ती कुठेतरी गायब होउन जातात...
+७८६

एक व्यक्ती परिचय इथ पर्यंत ठीक आहे.
पण त्याची मतं ही धर्माधारीत आहेत हा मुद्दा काही लोकांनी इथे उपस्थित केला आहे त्याच्याशी मी सहमत आहे.
एक उदाहरण देतो, रमजान ईद हा मुस्लिमांचा एक सण असे मी मानतो. रमजानचा उपवास सोडल्यानंतर आमच्या कार्यालयात मुस्लिम कर्मचारी शिरखुर्मा ते बिर्याणी असे पदार्थ सामाजिक सौदार्ह या नावाखाली आणत होती आणि इतर धर्मीय लोक त्याचा आस्वाद घेत होती इथपर्यंत मी अनुभवले आहे.
पण गणपतीच्या प्रसादाचा मोदक, पेढा मुस्लिमांना देऊन पहा....
यासाठी खरंच एक वेगळा लेख लिहावा लागेल. पण आता मात्र तो लिहावाच लागेल असे वाटते.

एक व्यक्ती परिचय इथ पर्यंत ठीक आहे. >>>

त्यांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात आधी माझं जीव मी धोक्यात घालेन' हे त्याचं तत्व माझ्या मते धर्मांधळ्या लोकांसाठी - मग ते कोणत्याही धर्माचे का असोत - डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे

हे असं काही लिहिलं गेलं नसतं तर कदाचित मी प्रतिसाद दिलेही नसते. पण सरसकटीकरण होताना दिसलं की उत्तर द्यावच लागतं..

Happy , सरसकटीकरण नाही दिसलं का तुम्हाला? बरं मग, त्याच्या तत्वाकडे पाहून मुस्लिमेतर धर्मातील धर्मांधळ्या वा नॉर्मल लोकांनी नक्की काय बोध घ्यावा असं तुम्ही व धागा लेखक सुचवाल?

तसे तर ह्याचा हातचा चहा नकोबी, त्याला पाणी नाही द्यायचे वगैरे रानटी प्रकार होतेच , त्यापेक्षा नाही म्हणणे जास्त सुसांस्कृत आहे

blackcat, म्हणजे मूळचे अरब हिंदी मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे म्हणतात तसे सुसंस्कृत की काय? बाकी अरबस्तानात असलेले मुस्लिम म्हणजेच प्रथम दर्जाचे मुस्लिम असं खुद्द कुराणात लिहिलंय हे तुला माहित नसाव असं दिसतंय. गम्मत म्हणजे ते आता कधी बदलताही येणार नाही !

आपल्या धार्मिक आचार-विचारांना जीवापाड जपणारा हा फादी इतरांच्या धार्मिक बाबतीत कधीही ढवळाढवळ करत नसे. >>> हे सर्व लिखाण फादी बाबत आहे.
त्यामुळे हे एक व्यक्ती चित्रण आहे आणि त्याच पद्धतीने ते घ्यावे ह्याला मम.

'संख्या वाढली की कट्टरता वाढते आणि अचानक "चांगल्या स्वभावाच्या" व्यक्ती कुठेतरी गायब होउन जातात' हे होताना पाहिले आहे. समुहाचे मानसशास्त्र ( हे त्यातल्या व्यक्तींच्या एकेकट्याच्या मानसशास्त्रापेक्षा) वेगळेच असते हे टिळकांचे वाक्यही प्रसिद्ध आहेच. हे माणसाबाबत सार्वकालीन सत्य आहे.

मी माझा,
' अरे, पण कोणी तुला फसवून तुझ्याकडून पैसे घेतले तर तुला कसं कळणार?'
' माझं काम आहे मदत करणं. मी पैसे दिले, अल्लाहने मला नेमून दिलेलं काम मी मनापासून केलं. त्याने मला फसवलं तर जेव्हा कयामत होईल आणि तो आणि अल्लाह समोर येतील तेव्हा त्याला त्याच्या कर्मांची सजा मिळेल.'

'मला नेमून दिलेलं काम' म्हणजेच धर्म ; रिलिजन वाला नव्हे तर धर्मो रक्षती रक्षितः वाला. तस्मात कर्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवावा. आपण कसे (धर्मानुसार) वागावे हे आपल्या हातात आहे. आपले भविष्य आपल्या हातात आहे. आपल्या भल्याबुर्‍या कर्मांची फळे आपल्याला भोगायला मिळतीलच याचे भान राखावे.

'नक्की काय बोध घ्यावा' विचारलं म्हणून सांगीतलं नाहीतर ही काही बोधकथा नाही.

रुन्मेषला सांगून नवा धागा उघडा आणि तिकडे चर्चा करा

रीया Proud

ऋन्मेषला वर्क फ्रॉम होम मुळे आता मायबोलीवर धागे काढता यायचे नाहीत Wink
अवांतराबद्दल सॉरी दअर्बननोमाड

नक्की काय बोध घ्यावा' विचारलं म्हणून सांगीतलं नाहीतर ही काही बोधकथा नाही.

नवीन Submitted by हर्पेन on 17 March, 2020 - 10:39. >>>

माझ्या मते डोळ्यात झणझणीत अंजन पडणे म्हणजे काहीतरी बोध होणे असा अर्थ होतो. तुमच्या डिक्शनरीत कदाचित वेगळा अर्थ असावा.

मला वाटतं एखाद्या धर्माचा अंदाज त्या धर्मातील पुस्तकांतून घ्यावा, काही व्यक्तींकडे पाहून नाही. तसेच एक व्यक्ती चांगला वागतो म्हणून इतर धर्मियांच्या डोळ्यांत अंजन पडते असे म्हणणे चुकीचे आहे.
पण प्रत्यक्षात कुराण वाचून माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन पडलं, कारण माणसाचे "समूहाची मानसिकता" हे सर्वकालीन सत्य त्यात "कायदा" व धर्माधिष्ठित "आचरण" म्हणून येतं. यावर बराच वाद घालता येईल पण धागा लेखकांचा लिखणामागाचा शुद्ध हेतू पाहता आणखी वाद या धाग्यावर करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हाला जमलं तर "आपला कट्टा" वर याबाबत चर्चा करुया.

मी पुन्हा एकदा नमूद करतो, कि सगळ्याचा इथे खूप जास्त विपर्यास होतोय.

फादी हा माणूस म्हणून मला जितका कळला, त्याच्या वागण्या-बोलण्यातला जो भाग मला भावला तो मी शब्दबद्ध केला. कोणताही माणूस १००% योग्य अथवा अयोग्य नसतो. फादी या माणसाला त्याने आकलन केलेलं कुराण जसं कळलं आणि त्याबद्दल त्याने मला जे सांगितलं ते मी लिहिलेलं आहे. तो माणूस कुराणाचा सखोल अभ्यास करून लोकांना उपदेश करणारा धर्मगुरू सुद्धा झाला नाही की लोकांना बळजबरीने धर्मपरिवर्तन करायला लावणारा धर्मान्धळा सुद्धा झाला नाही, उलट 'आजूबाजूच्या १००० लोकांना' हा कुराणाचा अर्थ लावताना त्याने 'आजूबाजूच्या फक्त मुस्लिम लोकांना' हे नं म्हंटल्यामुळे मला त्याची विचार करायची पद्धत आवडली.

जरा इतर धर्माचा विचार सुद्धा करूया। मुस्लिम लोकांप्रमाणे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणारे ख्रिस्ती लोक सुद्धा आहेतच ना ? इतकाच का, कटू वाटलं तरी हे सत्य आहेच, की 'अमुक अमुक माणसाने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्याला ठार मारा, इतकं इनाम देतो' सारख्या मूर्खपणाला आपल्याकडचेही 'हिंदू' म्हणवणारे अनेक संघटनाप्रमुख खतपाणी घालतातच। शांततेचा संदेश देणारे बौद्ध म्यानमार , श्रीलंका आणि कंबोडिया मध्ये किती हिंसक झाले हे आपण बघितलेलं असेलच. त्यामुळे मुळात 'धर्म' चुकीचा नसून त्याचा कालसुसंगत अर्थ न लावता केवळ त्याचा अंधानुकरण करणारे 'मेंदू असून नसलेले' मनुष्य हेच सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे.

इस्लाम धर्म ज्यू आणि ख्रिस्ती धर्मास निपजलेला असल्यामुळे आणि या तीन धर्मीयांमध्ये सतत चढाओढीसाठी युद्ध होत असल्यामुळे तिन्ही धर्मियांनी आपली संख्या वाढवायला 'आपल्या धर्मातला तो आपला, बाकीचे जिवंतच नाही राहता कामा' अशी भूमिका घेतलेली होती. त्यात इस्लाम धर्म जिथे वाढला, तिथे युरोपप्रमाणे 'सांस्कृतिक उत्क्रांती' कधीही झाली नाही आणि ज्यू आपल्या देशातूनच हजजारो वर्ष परागंदा झाले असल्यामुळे ते आपला धर्म 'वाढवू' शकले नाहीत, हा इतिहास आहे. आज इस्लामच्या जगतात सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत, इस्लामचे ही अनेक लोक आपल्या कालबाह्य गोष्टींना बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे मी बघितलंय, अनुभवलंय आणि समजूनही घेतलंय. कदाचित ५०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये जे घडलं, ते आता इस्लाम धर्मात घडेल, कोणास ठाऊक? पण या सगळ्याचा विचार करायची हि जागा नक्कीच नाही, इथे लेक ज्या कारणासाठी लिहिले आहेत, त्याच नजरेने ते वाचले जावेत अशी माझी विनंती आहे.

माणसाकडे माणूस म्हणून बघायची माझी सवय आहे, ज्यामुळे मला त्या त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आवडतात आणि त्या इतरांना कळण्यासाठी मी त्या लिहितो. मला त्यातून जे वाटतं ते मी माझ्या कुवतीनुसार शब्दात मांडतो. ' बहाई फकीर ' लेखात मला असाच भेटलेला रुस्तम त्याच्या बहाई पंथाच्या ( जो मुस्लिम धर्मातून निपजलेला सुफी पंथासारखाच एक आहे ) शिकवणुकीचा जो अर्थ त्याने काढलेला होता त्यामुळे भावला, तसाच ' बंडखोर' लेखातला श्रीराम एका वेगळ्या कारणासाठी ' हिंदू ' धर्माच्या ' काही ' रूढीवादी गोष्टींच्या विरुद्ध जाऊन आपलं अस्तित्व शोधताना दिसला आणि म्हणून भावला.

धर्माबद्दल कृपा करून येथे चर्चाच नको, कारण माझ्या लेखांचा मूळ उद्देश 'व्यक्ती' हाच आणि इतकाच आहे. त्या व्यक्तीच्या संदर्भात लिहिलेल्या माझ्या एका वाक्याने १०००० वर्ष जुन्या धर्मावर काही ओरखडा उमटेल, असं मला नक्कीच वाटत नाही. ' धार्मिक उन्माद घालणारे' आणि ' सगळ्या धर्मांचा आदर करून आपला धर्म खाजगीत सांभाळणारे' अशा दोनच प्रकारांमध्ये मी माणसांची विभागणी करतो. शब्दांचा अयोग्य अर्थ काढून वाद वाढवणं हे कोणत्याही 'धर्मात' नक्कीच बसत नाही, या एका गोष्टीवर तरी सर्वांचं एकमत व्हावं अशी माझी आशा आहे. याउप्पर सुज्ञास अधिक सांगणे ना लगे.....

मला वाटतं एखाद्या धर्माचा अंदाज त्या धर्मातील पुस्तकांतून घ्यावा, काही व्यक्तींकडे पाहून नाही.
हिंदू धर्माचा अंदाज मनुस्मृती वाचून घेतला तर चालेल काय??

एक व्यक्ती परिचय इथ पर्यंत ठीक आहे.
पण त्याची मतं ही धर्माधारीत आहेत हा मुद्दा काही लोकांनी इथे उपस्थित केला आहे त्याच्याशी मी सहमत आहे.
एक उदाहरण देतो, रमजान ईद हा मुस्लिमांचा एक सण असे मी मानतो. रमजानचा उपवास सोडल्यानंतर आमच्या कार्यालयात मुस्लिम कर्मचारी शिरखुर्मा ते बिर्याणी असे पदार्थ सामाजिक सौदार्ह या नावाखाली आणत होती आणि इतर धर्मीय लोक त्याचा आस्वाद घेत होती इथपर्यंत मी अनुभवले आहे.
पण गणपतीच्या प्रसादाचा मोदक, पेढा मुस्लिमांना देऊन पहा.... >>> + ००१११११११११ माझे सुद्धा हेच निरीक्षण आहे

यासाठी खरंच एक वेगळा लेख लिहावा लागेल. पण आता मात्र तो लिहावाच लागेल असे वाटते. >>> प्लिज लिहा लेख, मला वाचायला आवडेल. मी नेहमी विचार करते की या मागे त्यांची नक्की काय मानसिकता असावी

नवीन Submitted by जिंदादिल. on 16 March, 2020 - 21:35

हिंदू धर्माचा अंदाज मनुस्मृती वाचून घेतला तर चालेल काय??

नवीन Submitted by झम्प्या दामले on 17 March, 2020 - 13:49 >>

घे की मग भावा.. फक्त मनुस्मृती कशाला? वेद, उपनिषदे, गीता सगळंच वाच. तेव्हढ वाचून झाली की मनुस्मृतीत सगळ्यात शेवटी असलेल्या अध्याय काय सांगतो ते इथे सर्वांना सांग..

Theurbannomad
तुम्ही त्या माणसाचे यथातथ्य वर्णन केले आहे मग तो चूक का बरोबर हे ठरवण्याची गरजच नाही.
माणूस ज्या परिस्थितीत जन्माला येतो आणि वाढवला जातो त्यानुसारच त्याचे वर्तन असते. तो प्रामाणिक आहे की दांभिक आहे इतकेच जाणून घेणे आवश्यक असते.
माझ्या वर्गात चार मुसलमान होते. माझा पार्टनर पण (खान -अकारविल्हे आल्यामुळे ) पण मुसलमान होता. चारही जण सुन्नी होते पण वेगवेगळ्या मनोवृत्तीचे होते. देवभोळे पासून दांभिक पर्यंत सर्व विविधता होती

जोवर धर्म हा आपल्या वैयक्तिक जागी असतो तोवर कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

मला विचारले तर भोळा मुसलमान हा दांभिक पुरोगाम्यांपेक्षा शतपटीने चांगला असतो असा माझा अनुभव आहे.

हिंदू धर्मातील साहित्य विचारले की पुरोगाम्यांना फक्त मनुस्मृतीतील आक्षेपार्ह भागच आठवतो. उपनिषदे भगवतगीता इ आठवत नाही.

काय करणार डुकराच्या स्वप्नात फक्त उकिरडा च असतो.

आपले लेखन प्रामाणिक आणि यथातथ्य आहे. तुम्ही लिहीत चला.

चार लोक काय म्हणतात याची चिंता करू नये.
कारण शेवटी एक लक्षात ठेवा चार लोक फक्त रामनाम सत्य आहे असेच म्हणतात.

लिहिणारा शारजाचा , ज्याच्याबद्दल लिहिले तोही सौदी , जर्मनी वगैरे फिरलेला,
तुमचे मनुस्मृती आणि रामनाम त्याला कुठून ठाऊक असणार ?

मुसलमान वाईट असतात , असा निष्कर्ष तयारच आहे , तर पुन्हा वाद कशाला ?
तुमच्या निष्कर्षाबद्दल मी तरी सतत आदरच दाखवला आहे , आणि ह्या कथेतील पात्र तर ह्या सर्व चर्चेबद्दल अनभिज्ञच रहाणार आहे. नाहीतर त्यानेही तुमच्या निष्कर्षाबद्दल आदरच दर्शवला असता.
खा , प्या , झोपा, पाडवा , ईस्टर मग रमजान सगळे सण ओळीने येत आहेत. कुठे इथे वाद घालत बसले ?

ला इलाहा इल्लला
शब्बाखैर

मला विचारले तर भोळा मुसलमान हा दांभिक पुरोगाम्यांपेक्षा शतपटीने चांगला असतो
मी म्हणेन बाईली कारणं देऊन कर्तव्यांपासून पाळणारा हिंदू हा सश्रद्ध मुसलमानापेक्षा जास्त दांभिक असतो.

मी म्हणेन बाईली कारणं देऊन कर्तव्यांपासून पाळणारा हिंदू हा सश्रद्ध मुसलमानापेक्षा जास्त दांभिक असतो.

नवीन Submitted by झम्प्या दामले on 18 March, 2020 - 13:25. >>

काही उदाहरण वगैरे????