मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> शामरात मेरी खाये लात वो यार मेरा सैंया सैया, चल छैया छैया छैया छैया चल छैया छैया छैया छैया....<<<<
मुळ बोल काय आहेत?
मला, ते ‘कायनात’ आहे वाटतं सुरुवातीला.... पण नंतरचे बोल कळलेच नाहीत.

>> शामरात मेरी खाये लात

Rofl

१. लहानपणी गावातल्या मंदिरात दणक्यात भजन सुरु असायचे. नक्की शब्द काय आहेत ते माहित असण्याचे ते वय नव्हते. तेंव्हा ऐकायला यायचे: नॅनो मामा होऽऽऽली तुकाराम

२. रेडीओवर कोलगेट च्या एका जाहिरातीत शब्द ऐकायला यायचे: कोलगेट का असर ढाळ ढाळ...

लहानपणी गावातल्या मंदिरात दणक्यात भजन सुरु असायचे. नक्की शब्द काय आहेत ते माहित असण्याचे ते वय नव्हते. तेंव्हा ऐकायला यायचे: नॅनो मामा होऽऽऽली तुकाराम>>>
Lol
मला ते शब्द लाल लाल तुकाराम, मनोबा तुकाराम असे यायचे ऐकायला Proud

लहानपणापासुन हे गाणं माहित आहे पण एकाजागी खरा शब्द काय आहे ते आता रिमिक्स मुळे कळलं.
सोना नही चांदी नही यार को मिला असं मला आजवर माहित होतं.
जे खरंतर सोना नही चांदी नही यार तो मिला असं आहे. Happy

हेमा मालिनी चे "दुनिया का मेला" गाणे "दुनिया का मेला, मेले मिलन के..." असेच ऐकत होतो अगदी गुगल युटूयब येईपर्यंत

काल एक गाणं तुनळीवर पाहताना , लक्षात आलं अरे या गाण्याचे बोल आपण चुकीचे ऐकत होतो.
यह मुलाकात तो ईक बहाना है,
प्यार का सिलसिला पुराना है.
त.टी. पाहत असताना कारण गाण्याचे बोल त्यावेळी तिथे उमटत होते.
मी ऐकायचो प्यार कातिल बडा पुराना है.

सध्या माझ्या ७ वर्षाच्या मुलाला बॉलिवुडी गाण्यांचं भयंकर वेड लागलं आहे.
त्याने वॉरमधलं जय जय शिवशंकर खूप वेळा ऐकलं आहे आणी गुणगुणताना नेहमी "ओ मुडीये दो" "ओ मुडीये दो" म्हणत असतो. किती वेळा रंग ऊडने दो सांगितलं तरी त्याला असंच ऐकू येतं .

परवा एक गाणं कानावर पडलं, ' खंडोबा जेजुरी चराया, खंडोबा जेजुरी चराया '

जरा नीट कान देऊन ऐकल्यावर समजलं,, ' खंडोबा जेजुरीचा राया ' Lol

पाईप, गटार, डोसे, पॉटी, शामरात मेरी खाये लात Lol Lol
भयंकर ..हसू आवरत नाहीये.. Lol>>>>>>> Rofl नोकरी जातेय आज माझी Lol मेले हसून हसून. उगीच उघडला हा धागा, देवा. आता कधी सरळ म्हणू शकणार नाही हि गाणी.

Pages