अपेक्षा

Submitted by Swamini Chougule on 11 March, 2020 - 09:34

अपेक्षा असा शब्द आहे
ज्यापेक्षा मोठ ओझ नाही
दुसऱ्या कडून केली तर चूक आहे
आपल्या कडून केली बरोबर नाही

एकूण काय दोन्हीचा अर्थ एक आहे
शब्दांचा सगळा खेळ आहे
आहे आणि नाहीचा सगळा झोल आहे
पाहायला गेलं तर छोटासा शब्द आहे
©swamini chougule
पण या शब्दाचा अर्थ मात्र बोजड आहे
कोणी ,कोणाकडून काय ठेवावी
याला मात्र मर्यादा आहे
म्हणूनच तर या शब्दाला मात्र तुल आहे

अपेक्षा असा शब्द आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users