बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

Submitted by अत्रुप्त आत्मा on 9 March, 2020 - 03:12

ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी.

त्या:- खुरुजीईईईईईई..
मी:- खाय? (आपलं ते हे..)काय?
त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!!
मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका!
त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का?
मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही!
त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!)
मी:- विचारा! (प्लेड!)
त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!)
मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स)
त्या:- हु हु हु हु हु हु! तसं नै, एक धार्मिक कार्यक्रम आहे. (गुगली)
मी:- असं का!(वेल लेफ्ट)
त्या:- त्यात मला एक मदत हवी होती. मंजे सल्ला हवाय!
मी:- (अश्या काही महिलांचे पूर्वानुभव गृहीत धरून!) प्रतिसल्ला 200 रुपये दर पडेल.
त्या:- (आश्चर्याने..) हो का!?
मी:- हो!
त्या:- (दर पाहून महिलेने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला..)माझ्या मुलाची अमुक अमुक जननशांत आहे. त्याला मी नऊवारी घातली तर चालेल का?
मी:- (हल्ली हा असलाही गुरुजींना विचारायचा खास प्रश्न असू असतो,हे गृहीत धरून..) धुतलेले कोणतेही कपडे चालतील.
त्या:- पण ते सोवळ्यात (पूजेला) चालतील का?
मी:- स्वच्छ , धुतलेले तेच सोवळे, असं (बाहेर वादात ) आपण सांगतो की नै?
त्या:- हो..
मी:- मग झालं तर!
त्या:- पण नऊ-वारीत जास्त शक्ती असते ना?(टणाटण मेंदूफ्राय संघटना)
मी:- (ही प्रकरणे समजवण्या बाहेरची असतात,या कचकाऊन आलेल्या पूर्वानुभवाला स्मरून..) आहो साधी नाही,विद्युतशक्ति असते. तुम्ही नऊवारी फिक्स करा.
त्या:- (काहीसे मो-हरून!) माझी रेशमी-सिल्कची आहे..चालते ना?
मी:- आता आधी पैसे द्या मग पुढे बाकीची माहिती(अकाउंट डिटेल्स देतो..व 150च रुपये जमा होतात,50शेवटी हे आम्हाला कळते)
त्या:- बसायला लोकरीचे आसन घेतात ना?( त्याच सं-घटनेची किरपा,म्हणून हे प्रश्न!)
मी:- हो हो, लोकरच.(ब्याद लवकरात लवकर जावी म्हणून..) पण बसण्यापूर्वी आधी दोरीच्या उड्या मारायच्या असतात!
त्या:- अय्या!
मी:-अय्या नाही,उड्या
त्या:-किती?
मी:-(इथेही धार्मिक संख्याच सांगावी हे होतकरू नवपुरोहितानी लक्षात ठेवावे!) 10,28, कींवा 108!
त्या:- मी 108 मारीन
मी:-(मनात- 1008 सांगायला हव्या होत्या!) उत्तम,फक्त नन्तर आसनावर बसलात की पूजेला आलेले गुरुजी सोडून कुणाच्याही बोटाला बोट नखाकडून पूर्व-पश्चिम स्पर्श करा.
त्या:- त्यांनी काय होईल..?
मी:-विद्युतशक्तिचा अनुभव येईल.
त्या:- बरं बरं! ठीक आहे. ठेंक्यु!
मी:- 50रुपये?
त्या:- हे काय , पाठवले की!
मी:-(जाता जाता..) हो..आणि नऊवारी घालू नका,नेसा हं!!!
----------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults